रविवार, २७ ऑगस्ट, २०१७

चारोळी

प्राजक्ताच्या फुलासम
असावा जन्म आपला
दरवळून आसमंत सारा
अलगद व्हावे बाजुला

✍ सुवर्णविलास

सकारात्मक नि नकारात्मक दृष्टिकोन

🍂🍁🍃🍁🍂🍃🍁🍂🍃🍁🍂🍃
                *सुचलेले काही*
🍂🍁🍃🍁🍂🍃🍁🍂🍃🍁🍂🍃

              *सकारात्मकता नि नकारात्मकता*
मानवी जीवनात व्यक्तीच्या दृष्टिकोनाबाबत सकारात्मक दृष्टिकोन नि नकारात्मक दृष्टिकोन या शब्दांची प्रामुख्याने चर्चा होते. सकारात्मक दृष्टिकोन म्हणजेच positive attitude हा प्रत्येक सजीव घटकाला *ऊर्जा,चेतना,आनंद,उत्साह,सृजनशीलता,*
*सर्जनशीलता* या गुणांनी परिपूर्ण करतो.अशा सर्वच गोष्टी इतरांना प्रेरीत करतात.व्यक्तिबाबत विचार केला तर सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीच्या चेह-यावरच एक विशिष्ट प्रकारचे प्रेरणात्मक तेज दिसून येते. अशा व्यक्ती आपल्या अस्तित्वाने सभोवताली चैतन्य निर्माण करतात.ही व्यक्ती प्रत्येकाला हवी-हवीशी वाटते.*तिच्या चेह-यातून,देहबोलीतुन,कार्यतत्परतेतून,
विचारांतून क्षणोक्षणी सकारात्मक उर्जेची स्पंदने,वलये निर्माण होतात.* नि या वलयांत येणा-या प्रत्येक व्यक्ती ही जिवनातील प्रत्येक बाबींबाबत सकारात्मकच विचार करते. तिचा जीवनविषयक दृष्टिकोन सकारात्मक बनतोच.सकारात्मक दृष्टिकोन जोपासणारी व्यक्तिमत्वे आयुष्यात सदैव यशाला गवसणी घालतात.
अशी माणसे *सुस्वभावी,निगर्वी,परोपकरी,सेवाभावी,निस्वार्थी ,संवेदनशील,प्रामाणिक* असतात.नि हे त्यांच्या चेह-यावरील तेजस्वीतेतून प्रतीत होते.छत्रपति शिवाजी महाराज,स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सुभाषचंद्र बोस,राजर्षी शाहू महाराज, महाराणी जिजाऊ ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलें पासून कल्पना चावला पर्यंत या नि अशा कितीतरी निस्वार्थी व्यक्तिंच्या चेह-यावरील तेज हे त्यांच्यातील सकारात्मक विचारांचीच देणगी आहे.या माणसांना महापुरुषाचा,महात्मा पदाचा सन्मान त्यांच्या सकारात्मक दृष्टिने लाभला नि या वलयात येणा-या प्रत्येक व्यक्तीचे ,जीवनाचे फक्त नि फक्त उन्नयन घडले.
                याऊलट *नकारात्मक दृष्टिकोन प्रत्येक सजीव घटकाचा विकास बाधित करतो.*नकारात्मक दृष्टिकोन असलेली व्यक्ती आपल्या सभोवताली  *अचेतना,निरूत्साह,निराशा,दुःख,अविश्वास, द्वेष,मत्सर अशी सर्व नकारात्मक वलये,स्पंदने निर्माण करतो.* नि या वलयात,गर्तेत स्वत: अडकुन इतरांनाही अडकवतो.या वलयाचा प्रभाव तसा फारच असतो.*कपट,स्वार्थ,गर्व,खोटारडेपणा,अस्थिर-चंचल बुद्धि,अस्वस्थ वृत्तीची ही माणसे स्वतःबरोबर इतरांनाही डुबवतात.काही काही माणसे  माकडिणीच्या कथेतील माकडिणी जसे स्वतःच्या जिवावर बेतले असता पिल्लांचा बळी देते तशी नकारात्मक वृत्तीची  *ही माणसे स्वतःच्या स्वार्थाकरीता सभोवतालच्या सद्गोष्टिंचा ,सदाचाराचा,प्रामाणिकतेचा बळी देतात.*या व्यक्तीचा चेहराच त्याच्या मनातील कपटी,दृष्ट, स्वार्थी,अप्रामाणिक बुद्धीचे दर्शन सहज घडवतो. दहशतवादी,भ्रष्टाचारी,पेशाशी अप्रामाणिक ही माणसे त्यांच्या वलयातील व्यक्तींचा ,घटकाचा फक्त नि फक्त विनाशच घडवतात.  सध्याच्या समाजात अशा नकारात्मक व्यक्तिंची संख्या अधिक असल्याचे जाणवते.अशा व्यक्तींसोबत राहण्यापेक्षा केव्हाही एकटे राहणे योग्य. एक सद्गुण हजारो दुर्गुणांवर मात करू शकतो तसे सकारात्मक दृष्टि  ही सुद्धा नकारात्मक दृष्टिची वलये छेदून तिचा विनाश करु शकते. फक्त व्यक्ती नि तिचा दृष्टिकोन सकारात्मक हवा.
        पहा पटतंय का! सकारात्मक बना,बनू दया.
*जीवनात नकारात्मकतेला,नकारात्मक व्यक्ती,घटकाला थारा देऊ नका.* सकारात्मक दृष्टिकोन सच्चा जीवनानंद मिळवून देतो. लक्षात ठेवा Impossible have i m possible!      
                              🙏मनस्वी धन्यवाद!🙏

🍂🍁🍃🍁🍂🍃🍁🍂🍃🍁🍂🍃 🍂🍁🍃

✍ *श्री.सुनील विलास अस्वले,पदवीधर अध्यापक,विदयामंदिर पोहाळे/आळते,ता.पन्हाळा. whatsapp 9049211785
दि.27/07/2017

🍂🍁🍃🍁🍂🍃🍁🍂🍃🍁🍂🍃 🍂🍁🍃