*सुचलेले काही*
☘🍁🍂🍃☘🍁🍂
काही माणसं मोकळ्या मनाची असतात.त्यांना जे जसं वाटते ते ते खुलेपणाने बोलतात.या बोलण्यापाठीमागे त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची गैरभावना असत नाही.दिलखुलास बोलणे हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो.अशी व्यक्ती रागाने बोलली तरी त्यांच्या मनात प्रेमाचीच भावना असते.अशी मने हळवी असतात.आपल्या निर्हेतुक बोलण्यातून समोरची व्यक्ती दुखावली,नाराज झाली,रागावली तर यांच्या मनाला त्याचे वाईट वाटते.वरवर फक्त चांगले बोलणे यांच्या स्वभावात नसते त्यामुळे अशा व्यक्तींबद्दल आपलेपणाची भावना फार कमी जणांना असते.पण याच व्यक्ती खऱ्या अर्थाने आपल्या असतात.
🍁🍂🍃🍁🍂🍃🍁
✍ सुवर्णविलास
दि.18/11/2018
🍁🍂🍃🍁🍂🍃
*सुचलेले काही*
🍁🍃🍂☘🍁🍃🍂
परस्परांशी स्नेहभावना जपत आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने घालवणे यालाच जीवन म्हणतात. जीवनात आपण ज्यांच्याशी स्नेह जपतो त्यांच्याशी काही प्रसंगात ,काही मुद्द्यांवरून मतभेद निर्माण झाले तरी त्याबाबत परस्परांशी संवादातून मनातील मतभेद दूर करावेत.गैरसमज करून घेऊन,अचानक अबोल राहणे दुरावा निर्माण करणे हा मतभेदावरील उपाय होत नाही. मतभेदातून मनभेद होऊ नये याची काळजी घ्यावी. काहीवेळा तुमच्या समोरील व्यक्ती चुकीची असूही शकते पण त्याला त्याच्या चुकीची जाणीव होऊन ती पुनश्च तुमच्याशी पूर्वीप्रमाणे स्नेह जपत असते.आपण त्यास प्रतिसाद दिला पाहिजे.शेवटी या अशाश्वत जीवनात परस्पर स्नेहच जगण्याला जगणे बनवतो.
🍁🍃🍂☘🍁🍃🍂
✍©सुवर्णविलास.
दि.19/11/2018
www.suvarnvilas.blogspot.com