शनिवार, ३० नोव्हेंबर, २०२४
माझे कार्य -माझी प्रेरणा
कुलदेवता श्री जोतिबा च्या आशीर्वादाने 13 वर्षांपूर्वी (01/12/2011) जोतिबा डोंगर,ता.पन्हाळा शाळेतून विद्या मंदिर पोहाळे/आळते,ता पन्हाळा शाळेत पदोन्नतीने पात्र पदवीधर शिक्षक पदावर रुजू झालो. हा शैक्षणिक प्रवास तसा आव्हानात्मक होता पण पालकांचा विश्वास ,उपक्रमशीलता,कालसुसंगतता यामुळे हा प्रवास आनंददायी व ऊर्जावान ठरला.आज केंद्रशाळा दळवेवाडी, ता.पन्हाळा शाळेत कार्यरत असताना या पदावरील 13 वर्षांची कारकीर्द निर्विघ्नपणे पूर्तता झाली.या कालावधीत गेली 5 वर्षे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात कोणताही अडथळा न येता दळवेवाडी, केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून अतिरिक्त कार्यभार पार पडण्याची व त्यातून प्रशासकीय कामकाज शिकण्याची संधी मला मिळाली. या भूमिकेत माझ्या या केंद्रातील सर्व गुरुवर्य शिक्षक बंधू -भगिनी,मित्र परिवाराचे अमूल्य सहकार्य,विश्वास व पाठबळ मला लाभले व लाभत आहे.सेवेशी सतत प्रामाणिक राहून केलेल्या कार्याचे फलित अनेक विद्यार्थ्यांच्या यशातून प्राप्त होत असतानाच अनेक संस्थांनी 2019 पासून आदर्श शिक्षक म्हणून कार्याचा गौरव केला. प्रशासनाने देखील शैक्षणिक कार्याची दखल घेत ऋग्वेद आदर्श शिक्षक- २०२३-२४ या मानाच्या पुरस्कारासाठी मला पात्र ठरवले.यंदा २०२४-२५ साठी जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्काराचे तालुका स्तर सर्व निकष पार पाडून जिल्हा स्तरावर मुलाखती पर्यंतचा प्रवास निश्चितपणे सुखावणारा आणि पुढील शैक्षणिक कार्यास अधिक प्रेरणा अन बळ देणारा आहे. या प्रवासात मला लाभलेले सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक व कार्याशी प्रामाणिक असलेले सर्व सहकारी गुरुवर्य,कार्याची प्रेरणा देणारे प्रशासनात लाभलेले सर्व अधिकारी , कर्मचारी वर्ग या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद! ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्याला आकार मिळाला ते माझे दैवत माझे आई -पप्पा(सुवर्णविलास),माझी भावंडे ,जिचा मला परीसस्पर्श लाभला ती माझी पत्नी, माझी मुले या सर्वाचे मनस्वी धन्यवाद!आपल्या सर्वांच्या शुभेच्छा अन आशीर्वादाने निर्विघ्नपणे एकंदरीत केंद्रशाळा कोलोली ,ता.पन्हाळा येथून 2000 साली सुरू झालेला हा 25 वर्षाचा (Silver Jubilee) सेवा कालावधी आनंददायी पार पडत आहे. अशीच साथ लाभो हीच मनोकामना! सर्वांच्या शुभेच्छा व शुभाशीर्वाद हीच माझी कार्यप्रेरणा!🙏🙏
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)