नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत मॅग्नस कार्लसनचा पराभव करून विश्वविजेता डी गुकेशने अखेर त्याचा बदला घेतला. नॉर्वे बुद्धिबळ २०२५ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत डोमराजू गुकेशने मॅग्नस कार्लसनवर आश्चर्यकारक विजय मिळवला. डी गुकेशचा मॅग्नस कार्लसनविरुद्धचा विजय ऐतिहासिक होता कारण त्याने पराभवाच्या छायेत असतानाच हा विजय खेचून आणला. या विजयानंतर मात्र कार्लसने पराभवाचा राग व्यक्त केला ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. गुकेशकडून पराभूत झाल्यानंतर कार्लसने जोरात चेस टेबलवर आपला हात आदळला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.जीवनात कोणत्याही क्षेत्रातील अपयश देखील खिलाडूवृत्तीने स्विकारता यायला हवे. जीवनात संयम हा सर्वात मोठा गुरू आहे अन स्वतःतील उणीव स्वीकारण्याची मानसिकता मनुष्याला प्रगतीपथावर नेऊ शकते हा दृष्टिकोन शालेय जीवनापासूनच अभ्यास असो ,खेळ असो वा स्पर्धा असो या प्रत्येक ठिकाणी पालकांनी आपल्या मुलांत व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांत विकसित करायलाच हवा. अन्यथा अपयशावर मात करू न शकणारी व्यक्ती निराशेच्या गर्तेत जाऊन स्वतःला,समाजाला किंवा व्यवस्थेला दोषी ठरवत याविरुद्ध विघातक निर्णय घेते. विद्यार्थी आत्महत्या ,गुन्हेगारी, व्यसनाधीनता हा याचाच परिणाम म्हणता येईल. http://suvarnvilas.blogspot.com
--✍🏻 सुनिल अस्वले.(सुवर्णविलास)
पदवीधर शिक्षक -केंद्रशाळा दळवेवाडी,ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर
व्हाट्सअप्प -9049211785