सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१८

सुचलेले काही

*सुचलेले काही*
☘🍁🍂🍃☘🍁🍂

काही माणसं मोकळ्या मनाची असतात.त्यांना जे जसं वाटते ते ते खुलेपणाने बोलतात.या बोलण्यापाठीमागे त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची गैरभावना असत नाही.दिलखुलास बोलणे हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो.अशी व्यक्ती रागाने बोलली तरी त्यांच्या मनात प्रेमाचीच भावना असते.अशी मने हळवी असतात.आपल्या निर्हेतुक बोलण्यातून समोरची व्यक्ती दुखावली,नाराज झाली,रागावली तर यांच्या मनाला त्याचे वाईट वाटते.वरवर फक्त चांगले बोलणे यांच्या स्वभावात नसते त्यामुळे अशा व्यक्तींबद्दल आपलेपणाची भावना फार कमी जणांना असते.पण याच व्यक्ती खऱ्या अर्थाने आपल्या असतात.

🍁🍂🍃🍁🍂🍃🍁

✍ सुवर्णविलास
     दि.18/11/2018

🍁🍂🍃🍁🍂🍃
*सुचलेले काही*
🍁🍃🍂☘🍁🍃🍂
परस्परांशी स्नेहभावना जपत आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने घालवणे यालाच जीवन म्हणतात. जीवनात आपण ज्यांच्याशी स्नेह जपतो त्यांच्याशी काही प्रसंगात ,काही  मुद्द्यांवरून मतभेद निर्माण झाले तरी त्याबाबत परस्परांशी संवादातून मनातील मतभेद दूर करावेत.गैरसमज करून घेऊन,अचानक अबोल राहणे दुरावा निर्माण करणे हा मतभेदावरील उपाय होत नाही. मतभेदातून मनभेद होऊ नये याची काळजी घ्यावी. काहीवेळा तुमच्या समोरील व्यक्ती चुकीची असूही शकते पण त्याला त्याच्या चुकीची जाणीव होऊन ती पुनश्च तुमच्याशी पूर्वीप्रमाणे स्नेह जपत असते.आपण त्यास प्रतिसाद दिला पाहिजे.शेवटी या अशाश्वत जीवनात परस्पर स्नेहच जगण्याला जगणे बनवतो.
🍁🍃🍂☘🍁🍃🍂
✍©सुवर्णविलास.
दि.19/11/2018
www.suvarnvilas.blogspot.com

गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१८

आम्ही बच्चन वेडे

*बच्चन वेडे कोल्हापुरी - एक आनंदानुभव*

बच्चन वेडे कोल्हापुरी ग्रुप मार्फत आज शालेय मुलांच्या महानायक अमिताभ बच्चन यांचे व्यक्तीचित्र रेखाटन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. बच्चन वेडे असलेल्या या ग्रुप मधील प्रत्येक सदस्यांची अमिताभ बच्चन यांच्या बद्दल असणारी आत्मीयता  क्षणोक्षणी जाणवत होती. उद्घाटन कार्यक्रमापासून अमिताभ बच्चन यांच्या डायलॉग चे सादरीकरण गाण्यावर थिरकत  बच्चन यांचेबद्दलचे उत्कट प्रेम ही मंडळी व्यक्त करताना दिसत होती. अमिताभ बच्चन यांचेवर चित्रित खयके पान बनारसवाला,मच गया शोर ... यासारख्या गाण्यांवर पद,वय विसरून दूरस्थ राहून बच्चनजींबद्दल प्रेम व्यक्त करणारी ही मंडळी पाहून जीवनात आंनदाचे क्षण कसे येत असतात व ते कसे उपभोगायचे असतात याची ही एक अनुभूतीच ठरली. *नित्याच्या जगण्याच्या धावण्यातून उसंत घेऊन स्वतःसाठी काही वेळ देऊन मुळातच आयुष्यात असलेले पण जगण्याच्या खोट्या संकल्पनेत स्वतःला गुरफुटून आंनदाचे क्षण विसरत चाललेले व नित्य नूतन तणावात अमूल्य जीवन व्यर्थ घालवणारे आपण असे क्षण एन्जॉय करू शकलो तर खऱ्या अर्थाने जगलो म्हणता येईल.*
शेवटी  मी या ग्रुप सदस्यांबद्दल इतकेच म्हणेन
बच्चन वेडे कोल्हापुरी तुम्ही
जीवनाचे सच्चे महानायक तुम्ही
वेड पाहून तुमचे
करतो मी सलाम तुम्हांस नि महानायक अमिताभास...

© सुनील अस्वले.

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०१८

सुचलेले काही

[1/29, 6:06 PM] सुवर्णविलास: *मनापासून जोडली गेलेली मित्रत्त्वाची नाती आयुष्यात एकदाच निर्माण होतात.* ती टाळून जगणे म्हणजे दिव्याने वातीशिवाय प्रकाश देणे असल्यासारखे आहे.प्रकाशाशिवाय सूर्य,पाण्याशिवाय समुद्र,ममतेशिवाय मातृत्व जसे अशक्य तसे भावनेशिवाय मन नि नात्यांशिवाय आयुष्य अशक्य.ही
बहीणाबाईंच्या या काव्यपंक्तित मानवी मनाचे यथार्थ दर्शन घडते. *नाती मनापासून जपली तरच आयुष्य आयुष्य असते* नाती जपणा-या अशा मनास कितीही नात्यांपासून किती ही हाकलं तरी त्यांन फिरून ,परतुनी नात्याजवळ यावे हेच खरे जीवन!

          ✍-- सुनील अस्वले(सुवर्णविलास)
           *whatsapp* 9049211785
[1/30, 5:27 PM] सुवर्णविलास: माणसाने जीवनात सर्वच बाबतीत व्यवहारी असावं. भावनिक असूच नये.भावनिक असण,एखाद्यबद्दल हळवं असण  हा खरेतर एक शापच आहे..शेवटी सोबत काय नेणार आहे माझ्यासारखी मानस  शापच.. कालच abp माझावर नाना म्हणाला ते 100% खरं आहे. नात्यात फक्त सोय राहिलीय...😌 ..मला व्यवहारी नाही होता येणार..
[2/1, 12:45 PM] सुवर्णविलास: गैरसमजातुन कोणी स्वतःचे व इतरांचे मन दुखावत असेल तर तो त्याचा स्वतःचा दोष असतो..यात त्या व्यक्तीने स्वतःला बदलायला हवे. आपण काही गैर करत नाही हा विश्वास आपल्या मनात असेल तर जीवनात कोणत्याही गोष्टिची लपवाछपव करण्याची गरजच उरत नाही.निखळ मनाने आपण करत असलेली आपली प्रत्येक कृती योग्यच असते.आपल्यास आपल्या कृतीच्या प्रामाणिकतेबदद्ल भरवसा असला तर गैरसमजातून आपल्याबद्दल शंका व्यक्त करणा-या व्यक्तीचा फारसा विचार करू नये.आपण आपली कृती निर्भयपणे करत राहावी.असे राहताना गैरसमजातून अशा व्यक्तीने आपल्या कृतीबद्दल शंका घेतलीच तर आपण स्वतःला कधीच दोष देऊ नये.नि आपल्या कार्यापासून परावृत्त होऊ नये...
✍ सुनील अस्वले 01/02/2018
[2/1, 8:40 PM] सुवर्णविलास: *माणूस घर बांधू शकतो पण घराचे घरपण नाही.*
घराचे घरपण हे त्या घरात राहणा-या माणसांच्या परस्पर  प्रेम,जिव्हाळा,नात्यांतील आपुलकी,ओढ नि विश्वास यांवर अवलंबून असते. केवळ भौतिक सुख-सुविधांनी समृद्ध झालेले आयुष्य हे आनंदी असतेच असे नाही. आनंदी आयुष्याकरीता नात्यांतील ओलावा आजन्म टिकून राहणे गरजेचे असते.नाना पाटेकर यांनी म्हटल्याप्रमाणे आजकाल बदलत्या सुखाच्या कल्पनेत *नात्यांत फक्त सोय राहिलीय.कुटुंबातील एकोपा हरवत चालला आहे.*प्रत्येकाची सुखाची कल्पना स्वतंत्र बनली आहे.संवेदना हरवत चाललेल्या या मखमली दुनियेत माणूस माणुसकी हरवत आहे. यांतून प्रत्येकाच्याच वाट्याला *मनाचे पोरकेपण* येत चालले आहे.आभासी जीवनाच्या ओढीने माणूस ख-याखु-या नात्यांपासून दुरावत चालला आहे.
                 भौतिक सुखाच्या गाजरापासून जितके दूर राहू नि *नात्यांतील प्रेम जितके जपू तितके आपण खरे श्रीमंत नि सुखी होऊ.*
✍ सुनील अस्वले(सुवर्णविलास) दि.01/02/2017
[2/2, 4:19 PM] सुवर्णविलास: जेवणाच्या डब्याकडे पाहून आज मला माणुस आणि त्याच्या मनाचा विचार डोक्यात आला. जेवणाचा वरील डबा किती किंमती किंवा सुंदर आहे अथवा मजबूत आहे यापेक्षा त्याच्या आतील जेवण कसे आहे व त्यातून शरीराला मिळणारी उर्जा किती उपयुक्त आहे हे अधिक महत्वाचे असते. जेवण करणा-याचे आनंदी ,उत्साही ,प्रेमाने ओतप्रोत भरलेले,आपुलकीचे मन त्यात असेल तर ते जेवण अधिक रुचकर नि शरीराला बल देणारे ठरते. अगदी असेच माणसाच्या शरीर नि मनाचे आहे.. बाहेरून नटलेले,किंमती पोशाखाने सजलेले शरीर महत्त्वाचे नसून या शरीरात विसावलेले मन हे डब्यातील अन्नपदार्थाप्रमाणे महत्त्वाचे असते. हे जितके रुचकर (आनंदी),पौष्टिक(उत्साही)  तितका माणूस निरोगी.या मनालाही रुचकर करण्यासाठी त्याला जपणे महत्त्वाचे असते. आनंदी ,उत्साही ,प्रेमाने ओतप्रोत भरलेले,आपुलकीचे मनच मनाला रुचकर नि पौष्टिक करू शकते.
✍ श्री.सुनील अस्वले(सुवर्णविलास) दि.02/02/2018
[2/3, 6:24 PM] सुवर्णविलास: माणसाच्या जीवनात आनंदाचे - दुःखाचे क्षण हे नात्यांतुन निर्माण होत असतात.आपले कुटूंब,नातेवाईक,समाज व मित्र-मैत्रिणी यांतील प्रत्येकाशी असणारे आपले नाते व त्या नात्यांत असलेला परस्पर स्नेह,विश्वास,आपुलकी ,श्रद्धा यांवर प्रत्येकाच्या जीवनातील आनंद नि दुःख अवलंबून राहते. जन्मत: प्राप्त व कालपरत्वे आपसूक जोडल्या गेलेल्या नात्यांतील माधुर्य नि कटूता या माणसाच्या मनावर अवलंबून असतात. नाती ही खरेतर मना-मनाचे बंध असतात.ती अतूट रहावीत नि त्यांतून जीवनानंद लाभावा हेच खरे आयुष्य जगणे असते.
✍ sunil aswale .
www.suvarnvilas.blogspot.com
[2/4, 8:11 PM] सुवर्णविलास: एखाद्या व्यक्तीची त्याच्या पश्चात निंदा करणे हा मानवी प्रवृतीचा एक भाग आहे. जिथे तिथे हे आहे.निंदा ही दोन्ही प्रकारच्या व्यक्तीची केली जाते. एक जो जीवनातील प्रत्येक कार्याशी अप्रामाणिक व स्वार्थी प्रवृत्तीचा असतो त्याची त्याच्या पश्चात त्याच्या या कुकर्तृत्त्वाची चर्चा होऊन त्याबद्दल त्याला दोष दिला जातो ,त्याची निंदा होते.ही निंदा होणे स्वाभाविक आहे. अशा प्रवृत्तीच्या लोकांनी वेळीच शहाणे होणे व आपल्या कार्यशैलीत  बदल घडवणे यातच त्यांचे हित असते.
                   दुस-या प्रकारात सद्प्रवृत्तीच्या लोकांचीही त्यांचे पश्चात त्यांच्या कार्यातील प्रामाणिकपणा,त्यांची निस्वार्थ वृत्ती यामुळे त्यांची; त्यांच्या या सद्प्रवृत्तीचा त्रास होणा-या अप्रामाणिक,स्वार्थी लोकांच्या टोळक्यांकडून निंदा होत राहते.अतिशहाणा,विद्वान,हरीशचंद्राचा अवतार अशी विशेषणे हे निंदक या दुस-या प्रकारच्या व्यक्तीची निंदा करताना बिनदिक्तपणे जोडतात.. या अशा निंदेचा कार्याशी प्रामाणिक,निस्वार्थ लोकांनी फार विचार करू नये. आपण या वृत्तीपासून स्वतःला अलिप्त ठेवावे ... निंदकाचे घर असावे शेजारी हे लक्षात घ्यावे..  जेव्हा तुमच्यातील चांगुलपणा,प्रामाणिकता याबद्दल तुमची तुमच्या पश्चात निंदा होत असेल तर समजावे तुमचा उत्कर्ष होतोय..

✍© सुनील अस्वले.  whatsapp 9049211785
            www.suvarnvilas.blogspot.com
[2/7, 9:24 AM] सुवर्णविलास: जितके क्षण तुमचे मन संताप करते,तितके क्षण तुमच्या  आयुष्यातील कमी झालेतच म्हणून समजा.... ✍ सुवर्णविलास.
[2/7, 6:54 PM] सुवर्णविलास: खळाळून हसण आणि स्माईल करण या दोन गोष्टी मला नेहमीच भिन्न वाटतात. बेभान होऊन खळाळून हसणारा आंतरिक आनंदी  असतो. पण स्माईल करणारा मनापासून करतो असे नाही. असा माणूस उसने हसू ओठावर आणून आंतरिक दुःख लपवत नसेल कशावरून... ✍ सुवर्णविलास
[2/7, 7:06 PM] सुवर्णविलास: आयुष्य कापरसारखे असावे..स्वतः जळायचे, वातावरण प्रसन्न करून टाकायचे ज्वालांची धगही कोणाला लागू द्यायची नाही नि स्वतःचे काहीच अस्तित्व ठेवायचे नाही...अशाने देवाच्या आरतीला त्याला मान मिळतो... ✍ सुवर्णविलास 07/02/2018
[2/8, 2:31 PM] सुवर्णविलास: फुलून यावे असे की
वातावरण मोहरून जावे
क्षणार्धात गळून पडावे
आठवणीत मागे राहावे....
✍ सुवर्णविलास 08/02/2018
[2/8, 6:16 PM] सुवर्णविलास: झोकून देऊन केलेल्या कार्यात उणीवा राहत नाहीत नि असे कार्य मनाला आत्मिक समाधान मिळवून देते. ही वृत्ती तुम्हांला सदैव उत्कर्षाकडे नेते. याउलट वरवर केलेले कार्यात नेहमीच उणीवा राहतात नि ही वृत्ती तुम्हांस अधोगतीकडे नेते.
✍ सुवर्णविलास 08/02/2018
www.suvarnvilas.blogspot.com
[2/8, 6:24 PM] सुवर्णविलास: कोणतेही कार्य दिखाऊ असू नये तर ते टिकाऊ असावे. मेकअपने चेहरा उजळतो पण त्याचे दुष्परिणाम नंतर आपल्याच वाट्याला येतात.खरेखुरे सौदर्य तेच जे मेकअपशिवाय असते ते दिर्घकाल टिकाऊपण असते.
✍ सुवर्णविलास 05/02/2018
www.suvarnvilas.blogspot.com
[2/8, 6:29 PM] सुवर्णविलास: कुणीतरी आपली स्तुती करावी म्हणून केलेल्या कार्यात अहंभाव अधिक असतो.स्तुति नाही झाली तर मन संताप करते.नि येथून पुढे कार्याचा विनाश सुरू होतो...अहंभाव व्यक्तीला आतून जाळतो नि याची धग विनाश घडवते.
✍ सुवर्णविलास 06/02/2017
www.suvarnvilas.blogspot.com