हे मरणा...
शोधले मी तुला ठायी ठायी
परी तू सापडला कुठेच नाही..
हे मरणा..सांग तुझा ठावठिकाणा
आता जगण्याला काही अर्थ नाही...
व्यथा मनाची आता कुणी जाणत नाही
ना कुणी आपले मानत नाही...
बेभरवशाचे सारेच आप्तजन
आता उरला कुठलाच मोह नाही...
हे मरणा..सांग तुझा ठावठिकाणा
आता जगण्याला काही अर्थच नाही...
वाटत होते मज सारे माझेच..
परी कधीच नव्हतो मी कुणाचा ...
मन वेडे हे धावत राहिले..
परी गवसले न कधीच काही..
हे मरणा..सांग तुझा ठावठिकाणा
आता जगण्याला काही अर्थच नाही...
कोणी न आपले,कोणी न परके
दुनियेमध्ये या आपणच एकटे..
उमगली जरी आता दुनिया ही खरी
परी तया उशिर फार झाला
हे मरणा..सांग तुझा ठावठिकाणा
आता जगण्याला काही अर्थच नाही...
✍🏻 सुवर्णविलास...