रविवार, १९ जानेवारी, २०२०
मंगळवार, १४ जानेवारी, २०२०
रविवार, ५ जानेवारी, २०२०
देणाऱ्याने देत जावे...
नमस्कार! HTM शैक्षणिक व्यासपीठ निर्मितीबद्दल सर्वप्रथम सर्वांचे मनस्वी अभिनंदन व आभार! तसेच या विधायक शैक्षणिक कार्यास मनापासून सहकार्य करणारे व पाठिंबा देणारे आपण सर्व ज्ञात-अज्ञात, या व्यासपिठाच्या माध्यमातून आपणांस शैक्षणिक क्षेत्रात,विद्यार्थांत (विशेषत: वंचित,दुर्बल )काही सकारात्मक बदल घडवावयाचे आहेत.आपल्याच मित्रांच्या,त्यांच्या परिवार सदस्यांच्या वाढदिनाच्या मंगलमय प्रसंगात आपण सहभागी होत असताना,त्यांना शुभेच्छा देत सामाजिक भान जपण्याचे कार्य आपणांस या माध्यमातून करायचे आहे. स्वखुशीने मिळणा-या निधीच्या साहाय्याने वरील घटकांना शैक्षणिक साहित्याचा लाभ देणे या हेतुबरोबरच इतरही सर्व विद्यार्थी घटकाला प्रोस्ताहित करणेसाठी कार्य घडवायाचे आहे.शिक्षण घेणारे प्रत्येक मुल हे राष्ट्राच्या इमारतीच्या पायातील एक चिरा असतो.तो जर सर्वांगिण मजबूत,खंबीर,संस्कारी असेल तर एक संपन्न राष्ट्र उभे राहू शकते.सर्वांगिण या शब्दात बुद्धिच्या विकासासोबतच शरीर,मन,भावना,संवेदना,सामाजिकता यांचा विकास घडवणे अपेक्षित आहे.हा विकास निकोप व्हावयाचा असेल तर प्राथमिक स्तरापासून त्यात येणा-या समस्या तत्काळ दूर झाल्या पाहिजेत.या समस्या त्याच्या स्वत:च्या, कुटुंबातुन,शाळेतून,समाजातून व मित्र परिवारातुन असू शकतात.या समस्या समजावून घेवून यातून योग्य त्या मार्गाने जसे की साहित्य वाटप,व्यक्तिमत्व विकास शिबिर ,पालक उद्बोधन,शाळा-शिक्षक भेट इ. आपणांस विद्यार्थ्यातील एक आदर्श मुल बाहेर आणायाचे आहे.
वरचे मुद्दे फारच आदर्शवत वाटत असले तरीही 'घरोघरी ज्ञानेश्वर जन्माला येऊ शकतात यावर माझा ठाम विश्वास आहे. यासाठी आपण स्वत: निवृत्तीनाथ व्हायचे आहे हे विसरुन चालणार नाही. जिजाऊ असेल तरच शिवराय घडतील,रामकृष्ण होते म्हणून विवेकानंद घडले,गोपालाकृष्ण गोखले होते म्हणून गांधी महात्मा झाले.चला तर आपणही संस्कारी नि पराक्रमी शिवराय घडवू, चारित्र्यवान विवेकानंद घडवू,संवेदनशील मनाचे महात्मा घडवू पण यासाठी स्वत: जिजाऊ,रामकृष्ण,नि गोखले व्हावे लागेल.
चला तर एक नाविन्यपूर्ण बदल घडवुया! शैक्षणिक कार्यातून विद्यार्थी घडवुया,विदयार्थ्यातुन कुटूंब घडवुया,कुटूंबातून समाज नि समाजातून माझा आदर्श गाव नि माझ्या आदर्श गावातून आदर्श देश घडवुया. धन्यवाद!----सुनील अस्वले (सुवर्णविलास)
(आम्ही आमच्या वडणगे,ता.करवीर या गावी उभारलेल्या शैक्षणिक व्यासपीठासंबंधी मी मांडलेले विचार.☝आनंदाची बाब अशी की या आमच्या कार्यास भरघोस पाठिंबा मीळत आहे.
* व्यासपीठाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यास जर कुणाला वस्तू अथवा आर्थिक स्वरूपात हातभार लावायचा असेल तर नक्की मला माझ्या 9049211785 या व्हाट्सअप्प क्रमांकावर सम्पर्क करा.*
राजकारणविरहित या समितितील सदस्य म्हणून काम करताना मला विशेष आनंद होत आहे.)