शनिवार, ७ डिसेंबर, २०१९
शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१९
पुन्हा निर्भया...
*पुन्हा निर्भया...*😞
पुन्हा एकदा तसेच निषेध
तसेच मोर्चे अन तसाच आक्रोश
पुन्हा एकदा त्याच मेणबत्या
त्याच संवेदना अन त्याच वेदना....
पुन्हा एकदा तश्याच बातम्या,तशीच चर्चा अन तसाच संताप ...
पुन्हा एकदा तसेच नेते-कार्यकर्ते, तशीच आश्वासने,अन तशीच जनता...
पुन्हा एकदा तसेच रोजचे स्वतःचे जगणे, तसेच भूतकाळाला विसरून वर्तमानात जिणे अन तसेच स्वतःसाठी धावत राहणे...
पुन्हा एकदा तसाच कायदा
तसेच वकील अन तशीच कायद्याची पळवाट...
आणि मग....
पुन्हा एकदा तसेच राक्षस, तश्याच विकारी नजरा तसेच भय, तशीच निर्भया...अन तुमची माझी तशीच श्रद्धांजली....😞😞
✍© सुवर्णविलास
www.suvarnvilas.blogspot.com
पुन्हा निर्भया...
*पुन्हा निर्भया...*😞
पुन्हा एकदा तसेच निषेध
तसेच मोर्चे अन तसाच आक्रोश
पुन्हा एकदा त्याच मेणबत्या
त्याच संवेदना अन त्याच वेदना....
पुन्हा एकदा तश्याच बातम्या,तशीच चर्चा अन तसाच संताप ...
पुन्हा एकदा तसेच नेते-कार्यकर्ते, तशीच आश्वासने,अन तशीच जनता...
पुन्हा एकदा तसेच रोजचे स्वतःचे जगणे, तसेच भूतकाळाला विसरून वर्तमानात जिणे अन तसेच स्वतःसाठी धावत राहणे...
पुन्हा एकदा तसाच कायदा
तसेच वकील अन तशीच कायद्याची पळवाट...
आणि मग....
पुन्हा एकदा तसेच राक्षस, तश्याच विकारी नजरा तसेच भय, तशीच निर्भया...अन तुमची माझी तशीच श्रद्धांजली....😞😞
✍© सुवर्णविलास
www.suvarnvilas.blogspot.com
गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१९
मोबाईल पार्किंग --श्री.विश्वास सुतार.
☘🍁🍂🍀🌱
*भावलेले काही*
☘🍁🍂🍀🌱
सर्वांना उपयुक्त लेख... प्रतिसाद द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा..
🌹 *'मोबाईल पार्किंग'*
*लेखक*- विश्वास सुतार
'मोबाईल पार्कींग' हे शीर्षक वाचून आपणास अनपेक्षित धक्का बसला असेल ना? खरी गोष्ट आहे.आपण फोर व्हीलर, टू व्हीलर, सायकल अशा वाहनांच्या पार्किंग (वाहनतळ) बद्दल जाणून आहोत. परंतु 'मोबाईल पार्किंग' ही काय भानगड आहे ? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. ही नवी संकल्पना नव्या शतकाची, नव्या युगाची, नव्या तंत्रज्ञानाची आणि माणूस म्हणून जगण्यासाठी गरज म्हणून समोर येत आहे.
तंत्रज्ञानाच्या आणि इंटरनेटच्या(आंतरजालीय) युगात 'मोबाईल पार्किंग' ही संकल्पना रुढ होणे अत्यावश्यक ठरणार आहे. काळ पुढे सरकत आहे. आपण वेळीच सावध होऊन तंत्रज्ञान मायाजालाच्या आहारी न जाता तंत्रज्ञानाला काबूत ठेवू तर आपला विकास निश्चित आहे, आपलं जगणं स्वस्थ होणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध असण्याचे कारण नाही. परंतु हे एक दुधारी शस्त्र आहे, हे आपण समजून घेऊया.त्याचा उचित आणि पुरेसा वापर करू, तर ते लाभदायी ठरणार आहे. याऊपर तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर हा आपल्या नाशाला कारणीभूत ठरणार आहे. मोबाईल ही तर आधुनिक तंत्रज्ञानातील क्रांतीच आहे. मोबाईल हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक *अविभाज्य भाग* होत आहे.
मोबाईल ने आपल्या जन्माची पंचेचाळीशी गतवर्षी (सन२०१८ साली) पूर्ण केली. जगातील पहिला मोबाईल १९७३ साली मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर यांनी विकसित केला. मराठीत याला 'भ्रमणध्वनी' असे म्हणतात.संभाषण व माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी मोबाईलचा सर्रास आणि आणि प्रभावी वापर होतो. टेलिफोन हा एकाच जागी स्थिर असायचा, अजूनही काही ठिकाणी दिसतो. त्याच्याकडे माणसांना जावे लागते... परंतु मोबाईल हा सहज हाताळता येतो. खिशात, पर्समध्ये तो आरामपणे विराजमान होतो. तो माणसांपर्यंत जातो, अगदी स्नानगृहातही!.. तर अशा मोबाईलचा प्रसार झपाट्याने होत आहे.एकमेकांशी कनेक्टेड राहिल्याने माणसाच्या भावना सुखावतात.याऊलट डिस्कनेक्ट परिस्थिती माणसाला नकोशी वाटते. आपले नातेवाईक, कुटुंब, मित्र, सहकारी यांच्याशी मोबाईल नेटवर्किंग च्या माध्यमातून सहज संपर्कात राहता येते.किती अद्भुत निर्मिती आहे मोबाईलची!.. माणूस एकाद्या साधनात गरजेनुसार किती सोयी वाढवू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोबाईल ! एकेकाळी फक्त बोलण्यासाठी, संभाषणासाठी वापरला जाणारा मोबाईल आज नवनव्या एप्लीकेशन द्वारे बहुतांशी सुविधा आपल्या खिशात देतोय.
खरंतर मोबाईल आणि त्यावरील इंटरनेटच्या माध्यमातून *त्वरित संभाषण आणि कामाचा वेग वाढून आपल्याकडे इतर कृतिशील गोष्टी करण्यासाठी खूप वेळ शिल्लक राहावा*, असे अपेक्षिले होते.परंतु वास्तव अगदी विचित्र दिसून येते. मोबाईल तंत्रज्ञानाने आपल्याभोवती विलक्षण विळखा घातलेला आहे. मोबाईल फोन हरवला, तो कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असला,त्याची बॅटरी संपली, किंवा सिमकार्डवरील रिचार्ज संपला असेल तर आपली काय अवस्था होते ? निश्चितच आपण अस्वस्थ होतो. आपणास चैन पडत नाही. असे अस्वस्थ होणारे लोक ५३ टक्के आढळतात. ही टक्केवारी दिवसेंदिवस वाढतच आहे.आज घडीला तरुण लोक मोबाईल आणि इंटरनेटचा वापर दिवसभरातील ७ तास ३८ मिनिटे करतात,असे दिसून आले आहे. 'पबजी' सारखे खेळ मुलांच्या जीवावर कसे उठतात ते आपण पाहतच आहोत.शहरातील रस्त्यांवर, कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये, बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन वा दवाखान्याच्या वेटिंग रूम मध्ये आपणास काय चित्र दिसते ? प्रत्येक जण मोबाईलच्या स्क्रीनवर डोळे लावून बसलेला असतो. इतकेच काय, गावोगावचे कट्टेही हास्यविनोदाच्या चर्चेऐवजी मोबाईलच्या आहारी जात असल्याचे दिसत आहेत.
माणूस हा सवयीचा गुलाम आहे.एकदा का तो एखाद्या सवयीच्या आहारी गेला, की बाहेर पडणे मुश्किल ! मोबाईलची सवयही माणसाला गुंतवून ठेवते. साहजिकच मोबाईलशी वारंवार चाळा केल्याशिवाय अशा माणसाला राहवत नाही.. वरचेवर आपल्याला एखादा मेसेज किंवा कॉल तर आला नसेल ना,असे वाटल्याने मोबाईलकडे सतत पाहिले जाते.वारंवार इंटरनेट, यूट्यूब, व्हॉट्सऍप वापरल्याने आपली एकाग्रता कमी होताना दिसते. आपला स्वभाव हायपर होतो. निद्रानाशाचा विकार सुरू होतो. 'मल्टिटास्किंग' च्या नादात आपण एकावेळी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आणि एकही गोष्ट परिपूर्ण होत नाही. यातून पदरी निराशा येते.
आपण एखादा मेसेज शेअर केला असेल तर त्याच्या प्रतिसादाची आपण वाट पाहतो.वारंवार आपल्या मोबाईल फोनची बटनं दाबत राहतो.प्रतिसाद येत नाही तोपर्यंत आपलं सगळं लक्ष मोबाईलवरच असते. त्यातूनही अपेक्षित वेळेत प्रतिसाद नाही आला तर आपली चिडचिड वाढते.हा 'टेक्स्टोनिया' नावाचा नवा रोग दाखल होतोय...
कोणत्याही साधनाचा उपयोग माणसाने गरजेनुरूप आणि संयमाने केला तर तो अधिक फलदायी ठरतो, हे खरं आहे. पुरेसा वापर करून अशी साधने विशिष्ट ठिकाणी काही वेळ ठेवून देणे माणसासाठी आवश्यकच नाही तर अनिवार्य आहे.आपल्या अशा अनेक वस्तू आपण ज्या त्या ठिकाणी ठेवत असतो. एका अर्थाने त्यांचे आपण पार्किंगच करत असतो. आपणास टेक्नॉलॉजी 'डाएट' करावयाचे असेल तर तंत्रज्ञानातील मोबाईलसाठी पार्किंग असणे आवश्यक आहे.वेगवेगळ्या कंपन्या सध्या असा विचार करत आहेत. सकाळी दहा, दुपारी दोन आणि संध्याकाळी चार/ पाच वाजता,अशा तीनच वेळा कर्मचाऱ्यांना मोबाईल हाताळण्यासाठी दिला जातो.त्यामुळे उर्वरित वेळात कर्मचारी पूर्णवेळ कामात समरस होताना दिसतात.निरनिराळ्या शासकीय कार्यालयात अशी योजना राबवायला हरकत नाही. शाळांमध्ये तर ती अत्यावश्यक वाटते. अध्ययन- अध्यापनात तल्लीनता येत असताना मोबाईल अडथळा ठरू शकतो. म्हणून मुख्याध्यापकांनी एक बॉक्स बनवून त्यामध्ये मोबाईल पार्किंग करण्यास सुरुवात करावी.शिक्षकास अध्यापनात पूरक म्हणून मोबाईल वापरावयाचा असल्यास मोकळेपणाने परवानगीही द्यावी..आपल्या घरी आपण काय करू शकतो ? मोबाइल आणि त्यावरील एप्लिकेशन्स *वापरावयाच्या वेळा* आपण निश्चित करू आणि इतर वेळी घरामध्ये असे एक ठिकाण करू जिथे आपला मोबाईल सुरक्षित पार्क होईल. अशाने तोही 'हँग' होणार नाही.रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी आपले मोबाईल पार्किंग व्हावेत. ते ऊशाला असू नयेत. एखाद्या छानशा पुस्तकाची चार पाने आपण वाचावीत आणि गाढ झोपी जावे.सकाळीही डोळे चोळत मोबाईलशी चाळा करण्यापेक्षा व्यायाम, अंघोळ अशा ऊर्जा देणाऱ्या गोष्टी करून पार्किंग मधल्या मोबाइलला हाती घ्यावं. काही दिवस आपल्याला थोडा त्रास होईल.परंतु मोबाईल पार्किंग करण्याची आपल्याला एकदा का सवय झाली,तर *जिथे रेंज नाही अशा ठिकाणी सहल काढायचा विचार* आपल्या मनात निश्चितच येणार नाही. चिडचिडेपणाने मोबाईल फेकावासा वाटणार नाही. तंत्रज्ञानाच्या नव्या युगात मोबाईलचा द्वेष करण्यापेक्षा आपण त्याचा विवेकाने वापर करून आपलाच फायदा करून घेऊया. चला तर, मोबाईल पार्कींगच्या तयारीला.. !
✍ विश्वास सुतार(शिरगाव)
कोल्हापूर
शिक्षण विस्तार अधिकारी, पं.स. करवीर
👉९४२०३५३४५२
👉 suvishw73@gmail.com
*Forwarded*
☘🍁🍂🍀🌱
Sunil Aswale www.suvarnvilas.blogspot.com
9049211785
sunilaswale80@gmail.com
मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१९
प्रश्न माघार घेण्याचा...
कधीच असू नये आपण
कुणाचे तरी..हक्काचे
कधीच नसावी जागा
कुणाच्या तरी डोळ्यात
मग कधीच होणार नाही नजर
अनोळखी अन परकी..
अन मग उरणारच नाही प्रश्न
माघार घेण्याचा...
जपुच नये कुणाला तरी
मनात खोलवर
अन करू नये हवाली अस्तित्व कुणाच्या तरी
मर्जी अन मनावर
मग कधीच जाणवणार नाही
आपल्या अस्तित्वाची बेदखल..
कधीच होणार नाही
बेदखल त्याच्या भावविश्वातून..अन मग उरणारच नाही प्रश्न
माघार घेण्याचा...
करूच नये कोणत्याच
उत्तरांची अपेक्षा ..मग नाही करून घ्यावे लागणार डं ख
छळणा-या प्रश्नांचे विनाकारण...
अन मग उरणारच नाही प्रश्न
माघार घेण्याचा...
✍©सुवर्णविलास
www.suvarnvilas.blogspot.com
गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९
अल्पसंख्याक शिष्यवृत्तीकरीता शाळा रजिस्ट्रेशन कसे करावे?
अल्पसंख्याक शिष्यवृत्तीकरीता शाळा रजिस्ट्रेशन कसे करावे?
* सर्वप्रथम क्रोम ब्राउझर मधून https://scholarships.gov.in ही वेबसाईट ओपन करा.
*यानंतर स्क्रीनवर ओपन होणाऱ्या विंडोमधील Institute Login या टॅबवर क्लिक करा.
* यानंतर येणाऱ्या लॉगिन विंडो मध्ये Academic year(2019-2020) , User id(udise no), Password (guest123#), कॅपचा कोड भरा व लॉगिन करा.
* यापुढे येणाऱ्या विंडो मधील ok बटनावर क्लिक करा.
* यानंतर येणाऱ्या फॉर्म मधील सर्व आवश्यक माहीती काळजीपूर्वक भरा. व फॉर्म सबमिट करा. भरलेल्या फॉर्मची प्रिंट काढून त्याची 1 प्रत जिल्हा नोडल आधिकारी यांचेकडे जमा करावी व नवीन पासवर्ड घ्यावा.
-■सदर माहिती मी माझ्या समजुतीप्रमाणे केली आहे.
---श्री.सुनिल अस्वले,पदवीधर अध्यापक. Whatsapp no.9049211785 (only whatsapp.)
सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९
5 वी /8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2020
5 वी / 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2020
शाळा रजिस्ट्रेशन करताना पुढील काळजी घ्या.
1) शाळेचा udise no. अचूक भरा.
2) शाळेचे माध्यम मराठी/इंग्रजी यापैकी जे असेल ते अचूक निवडा. इथे जे माध्यम निवडाल त्याच माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल.
3) शाळेत शिकविण्यात येणार अभ्यासक्रम अचूक निवडा.
4) शाळेचा प्रकार शहरी किंवा ग्रामीण जो असेल तो भरा.
5) शाळेचे व्यवस्थापन अचूक निवडा.
6) मुख्याध्यापक मोबाईल क्रमांक/ शाळेचा इ मेल आय डी अचूक व सुरू असणारे भरा.सदर मोबाईल क्रमांकावर व मेल आय डी वर लॉगिन पासवर्ड प्राप्त होतो. पुढील सर्व कार्यवाहीसाठी तो अत्यावश्यक असतो.सदर पासवर्ड विसरणार नाही असे नोंद करून ठेवा. (विद्यार्थी प्रवेशपत्र मिळेपर्यंत)
7) मुख्याध्यापक फोटो व सही यांचा फोटो 100kb साईज पर्यंतच तयार ठेवा. मोबाईल कॅमेऱ्यात याचा फोटो काढताना तो लांबून काढा व नंतर क्रॉप करा. साईज कमी होते.
8) भरलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करूनच रजिस्ट्रेशन फॉर्म conform करा.
9) जरी काही त्रुटी राहिली तरी 15 नोव्हेंबर पर्यंत बदल करू शकता. त्यानंतर कोणताही बदल करता येत नाही. शक्यतो सर्व माहिती अचूकच भरा.
कोणतीही त्रुटी निर्माण झाल्यास पॅनिक होऊ नका.काही समस्या आल्यास व्हाट्सअप्प ग्रुपवर मांडा.ज्यांना माहीती असते ते ती सोडवण्यास मार्गदर्शन करतात.
मार्गदर्शनासाठी माझ्या 9049211785 या व्हाट्सअप्प क्रमांकावर आपल्या समस्या मांडा. समस्या तत्काल सोडवण्यासाठी नक्की प्रयत्नशील असेन.
फक्त माहितीकरिता सविनय.
----सुनिल अस्वले,पद.अध्या.केंद्र शाळा दळवेवाडी, ता.पन्हाळा.
5 वी /8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2020
5 वी / 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2020
शाळा रजिस्ट्रेशन करताना पुढील काळजी घ्या.
1) शाळेचा udise no. अचूक भरा.
2) शाळेचे माध्यम मराठी/इंग्रजी यापैकी जे असेल ते अचूक निवडा. इथे जे माध्यम निवडाल त्याच माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल.
3) शाळेत शिकविण्यात येणार अभ्यासक्रम अचूक निवडा.
4) शाळेचा प्रकार शहरी किंवा ग्रामीण जो असेल तो भरा.
5) शाळेचे व्यवस्थापन अचूक निवडा.
6) मुख्याध्यापक मोबाईल क्रमांक/ शाळेचा इ मेल आय डी अचूक व सुरू असणारे भरा.सदर मोबाईल क्रमांकावर व मेल आय डी वर लॉगिन पासवर्ड प्राप्त होतो. पुढील सर्व कार्यवाहीसाठी तो अत्यावश्यक असतो.सदर पासवर्ड विसरणार नाही असे नोंद करून ठेवा. (विद्यार्थी प्रवेशपत्र मिळेपर्यंत)
7) मुख्याध्यापक फोटो व सही यांचा फोटो 100kb साईज पर्यंतच तयार ठेवा. मोबाईल कॅमेऱ्यात याचा फोटो काढताना तो लांबून काढा व नंतर क्रॉप करा. साईज कमी होते.
8) भरलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करूनच रजिस्ट्रेशन फॉर्म conform करा.
9) जरी काही त्रुटी राहिली तरी 15 नोव्हेंबर पर्यंत बदल करू शकता. त्यानंतर कोणताही बदल करता येत नाही. शक्यतो सर्व माहिती अचूकच भरा.
कोणतीही त्रुटी निर्माण झाल्यास पॅनिक होऊ नका.काही समस्या आल्यास व्हाट्सअप्प ग्रुपवर मांडा.ज्यांना माहीती असते ते ती सोडवण्यास मार्गदर्शन करतात.
मार्गदर्शनासाठी माझ्या 9049211785 या व्हाट्सअप्प क्रमांकावर आपल्या समस्या मांडा. समस्या तत्काल सोडवण्यासाठी नक्की प्रयत्नशील असेन.
फक्त माहितीकरिता सविनय.
----सुनिल अस्वले,पद.अध्या.केंद्र शाळा दळवेवाडी, ता.पन्हाळा.
बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९
प्लास्टिक बंदीचे करू स्वागत..
प्लास्टिक कचरा रोखायचा कसा? या विषयावर मी मांडलेले माझे विचार महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले..या विचारास आपण सर्व गुरुवर्यांनी मनापासून दाद दिलीत त्याबद्दल सर्वांचे *मनस्वी धन्यवाद!* प्लास्टिक मुक्ती संदर्भात गेल्या 4 वर्षापासूनच मी आमच्या गावातील आम्ही स्थापन केलेल्या शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व जोपासण्याचा प्रयास करत आहे. या माध्यमातून आम्ही व मी स्वतः आजपर्यंत गावात व विविध ठिकाणी जवळपास 1000 हुन अधिक कापडी पिशव्यांचे वाटप केले आहे. *समाज सहभागातून शिक्षण व समाजसेवा* हे ब्रीद घेऊन आम्ही शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात खारीचा वाटा म्हणून सेवेचे कार्य करत आहोत. आपण आपल्या भावी पिढीच्या भविष्याचा विचार करून एकमेव जीवसृष्टी असणाऱ्या या पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या सर्वच घटकांवर मात करण्याचा प्रयास करूयात. प्लास्टिकबंदीचे मनापासून स्वागत करून पर्यावरणास घातक गोष्टी टाळूया..सुरुवात स्वतःपासून करू. 🙏 --✍ सुनिल अस्वले.(सुवर्णविलास) ,पदवीधर अध्यापक-केंद्र शाळा दळवेवाडी, ता.पन्हाळा.
बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९
खरे स्वातंत्र्य
खरे स्वातंत्र्य..
भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो...
आज साऱ्या देशभर मोठ्या उत्साहात 73 वा स्वातंत्र्य दिन संपन्न होत आहे. पण प्रत्येक भारतीयाने आत्मपरीक्षण करावे की खरंच आपण स्वातंत्र्यात आहे म्हणजे नेमके कशाचे स्वातंत्र्य आपण मिळवले नि कोणत्या गोष्टींचे स्वातंत्र्य आपण उपभोगत आहे.
देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला अन आपण स्वतंत्र झालो तोच हा क्षण...पण खरेच आपण बंधमुक्त झालो आहोत का? परंपरागत आचार-विचार,चालीरीती,प्रथा-परंपरा यांनी आपल्या मनावर केलेले अधिराज्य आज नाहीसे झाले आहे का?पूर्वापार चालत आलेल्या समाजविघातक गोष्टींपासून आपण स्वतंत्र झालो आहोत का?
आधुनिकतेचा विचार करताना आपण स्वमताने आचरण करतो आहोत की पाश्चिमात्य विघातक संस्कृतीचे अनुकरण करतो आहोत? स्वातंत्र्यप्राप्ती नंतर आपण आपला भौतिक विकास साधला अन खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद गमावला हेच काय ते स्वातंत्र्य आपणांस गवसले.
स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या मनास येईल तसे बंधमुक्त वागणे इतकी संकुचित भावना आपण गेली कित्येक वर्षे मनात जोपासली आहे.अन यातून नकळतपणे आम्ही सर्वजण एक हुकूमशाहीच जोपासत आहोत.माझ्या मनाप्रमाणे घडावे याकरिता आयुष्यात धडपडत राहणे हे आत्मकेंद्रित स्वातंत्र्य आम्ही आज उपभोगत आहोत.
आपली मते,विचार,आचार,हक्क याचे जरी आपल्यास स्वातंत्र्य असले तरी ते स्वतः उपभोगत असताना इतरांच्या याच बाबींचा विचार आपण फार कमी करतो.आपल्या विचार,आचार ,हक्कातून बहुतेक वेळा इतरांचे विचार, आचार ,हक्क बाधित होतात तेव्हा त्या स्वातंत्र्यास स्वातंत्र्य म्हणता येत नाही.या गोष्टीचा स्वतःच्या बाबतीत आपण जसा विचार करतो तसाच विचार इतरांच्या बाबतीत करून मानवतेची भावना जोपासणे हेच खरे स्वातंत्र्य.
स्वातंत्र्याचा स्वार्थ केला तर काय होते हे निसर्गानेही वेळोवेळी आपणांस दाखवून दिले आहे.स्वतःच्या हव्यासापोटी आपण निसर्गाला ओरबाडत राहिलो.निसर्गाच्या कुशीत राहून ,त्याचा अनिर्बंध उपभोग घेऊन त्याच्या स्वातंत्र्यावर आपण मानव गदा आणत आहे. परिणाम स्वरूप तो वेळोवेळी रौद्ररूप धारण करून आपणांस सूचित करत आला आहे.निसर्गाच्या प्रत्येक घटकाचे अस्तित्व जसेच्या तसे टिकवून ठेवणे म्हणजेच निसर्गाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे.
एकंदरीत निसर्गाचा आदर करीत मानवतेची भावना जोपासणे म्हणजे खरे स्वातंत्र्य उपभोगणे.
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा!!!
जयहिंद!!!
✍ सुवर्णविलास दि.15/08/19
शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९
हे मेघराजा
हे मेघराजा...
होती कोरड घशाला
अन होता घोर जीवाला
म्हणून तर हे मेघराजा
आर्त हाक मी दिली तुला..
विनविता तुला तू
आलास धावून
अन सुखावले तेव्हा
माझे मन
जलधारांनी तुझ्या मी
अवघा तृप्त नहालो
अन खर सांगतो मनात
मी खूपदा हसलो..
आनंदाचे तोरण बांधिले
आषाढ-श्रावण मासाला
आनंदाचे उधाण आले
अवघ्या माझ्या मनाला
पण तू काहीच नाही जाणले😔
मोह तुझ्या बरसण्याचा
वाटतो उगाच मी केला
हर्ष तुझ्या आगमनाचा
उगा मनी माझ्या झाला...
उगाच केले तुझ्या
स्वागताचे सोहळे उरात
उगाच बांधले आनंदाचे
तोरण मना-मनात...
वाहून नेलीस सारी स्वप्ने
अन रोविलेस दुःख उरात
शिरलास तू घराघरात
अन पाणी साऱ्या नयनात
पण सांगतो तुला ऐक माझे
ढासळल्या जरी घराच्या भिंती
ढासळलेल्या नाहीत इथे
माणुसकीच्या भिंती
आहे लढण्याची जिद्द
अजून माझ्या हृदयात
राहीन उभा पुन्हा मी
अन करेन पुन्हा तुझे
स्वागत
अन करेन पुन्हा तुझे
स्वागत ......
✍ सुवर्णविलास दि.09/08/19
www.suvarnvilas.blogspot.com
मंगळवार, ६ ऑगस्ट, २०१९
निसर्गाचा आदर करूया..
1989 साली वय वर्ष 9 असताना महापुराची ही स्थिती वडिलांच्या हाताला धरून पाहिली होती. त्यानंतर 2005 साली स्वतः जाऊन पाहिली.पण सध्याच्या इतकी भयावह अवस्था तेव्हा वाटली नाही.3 ते 4 दिवसांत पूर ओसरून जनजीवन पूर्वपदावर येत होते.सायकल वर स्वार होऊन पुराच्या पाण्यातून वाट काढीत कोल्हापूरला जाणे होत होते.पण सध्या हे शक्यच नाही. पुराचे पाणी इतके दिवस अन इतक्या उंचीवर राहत नव्हते. याहीपेक्षा दमदार पाऊस व्हायचा. पण पाण्याचा असा फुगवटा कधी यायचा नाही.सध्याच्या अशा स्थितीला नेमके जबाबदार कोण?आपण निसर्गावर आक्रमण केले तर तो ते नक्कीच परतवून लावणारच. अजूनही वेळ गेलेली नाही.निसर्गाचा आदर करूया.विकासाच्या नावाखाली त्याच्याशी छेडछाड नको.🙏
✍ सुवर्णविलास
दि.07/08/2019
www.suvarnvilas.blogspot.com
सोमवार, ५ ऑगस्ट, २०१९
पावसास...
*पावसास...*
तृषार्त मनाची हाक ऐकून
जलधारांनी चिंब भिजवित बरसलास तू या तप्त धरेवर
अन हर्ष तयाने झाला मनात
आगमनाने तुझ्या सुखावले सारे
अंकुरले हिरवे स्वप्न मनी
तृप्त झाले कडे-कपारी अन डोंगर सारे
सुखावले सारी जन अन सृष्टी मनोमनी
बघता बघता हे दिस सरले
अन स्वप्न सुखाचे विरले सारे
तुझ्या बरसण्याचा लागेना ठाव
अन वाहून जाऊ लागलेय सुख सारे
नको पाहूस अंत आता
बरसू नकोस थांब आता
विनवितो आम्ही अवघे तुला
घे विसावा थोडा आता...
✍ © सुवर्णविलास
दि.05/08/19
रविवार, २८ जुलै, २०१९
हे ही घडवूया
सगळ्यांनाच सगळं यावं
जमेल हेही करता प्रयास...
घडवूया राजहंस सारे
घेतील भरारी नभात
अन लुटतील आनंद पोहण्याचा पाण्यात..
रेखाटण्यास देऊ त्याला
कवितेच्या ओळी रेखीव
रंग भरण्यास देऊ संधी
कवितेच्या चालीत....
मोत्यासारखे अक्षर अन
करतो हिशोब तोंडी भरभर
मग देऊया त्याला विश्वास
येतील पाढेही भरभर
आनंददायी उपक्रमांनी
राहणार नाही गणिताची भीती
गणिताच्या स्पर्धेतही
जिंकेल माझी बोलघेवडी
इंग्रजीतील खेळ खेळून सुसाट
सरसर चढेल तो knowledge चे झाड
वाचणाऱ्या कृष्णाच्या मनात
जागवू लिहिण्याचाही विश्वास
आज नाही उद्या लिहील
पण करूयात आपण प्रयास
विविधांगी लेकरांना
आणूया एकाच स्तरात
त्यांचे अंग जपताना
घडवूया समान विकास
वाचन ,लेखन ,गणितासोबत
देऊ जीवनाचे शिक्षण खास
त्याच्याच कलाने जाऊन
करूया त्याचा आपण विकास
नकारघंटा नकोच आधी
करूया कार्याची सुरुवात
जमेल जितके तितके करूया
अडेल तिथे हात देऊया
*सर्वांगिण विकास* करून त्याचा
घडवू आपुला विद्यार्थी छान।
✍ © सुवर्णविलास
दि.26/07/2019
सोमवार, १५ जुलै, २०१९
गुरुवंदन
🙏*गुरुवंदन*🙏
मानवी जीवनात गुरूला अनन्य साधारण महत्त्व आहे.अनादी काळापासून समस्त विश्वात गुरूला सर्वोच्च स्थान असल्याचे दिसून येते. जन्मापासून अंतापर्यंत आयुष्याला आकार देणारे,अनुभव देणारे सृष्टीतील सर्व घटक हे माणसाच्या गुरूस्थानी असतात. 'गुरुविण कोण दाखवील वाट' या उक्तीप्रमाणे गुरू हा आपल्या आयुष्याला सकारात्मक आकार देतानाच आपल्या जीवनाचे मार्गक्रमण योग्य दिशेने घडवून आणण्यासाठी सतत शिष्यासोबत असतात.
माझ्या आजच्या यशस्वी, आनंददायी आयुष्याच्या पाठीशी मला आजवर लाभलेले गुरू आहेत. जन्मानंतर माझ्या आयुष्याला आकार देणारी,मला जीवन दिलेली माझी आई व माझे वडील हे माझे आद्यगुरू आहेत.
माझ्या जीवनाची पायाभरणी करणारे माझे आई-वडील हे आजही माझ्या आयुष्याच्या प्रवासातील दीपस्तंभ आहेत.त्यांचे आशीर्वाद अखंडपणे माझ्या पाठीशी राहावेत म्हणून मी त्यांच्या नावातून आकारलेले 'सुवर्णविलास' हे टोपणनाव धारण केले आहे. लहानापासून आजअखेर आयुष्याचे मार्गक्रमण करत असताना माझी भावंडे माझ्या सोबतीला राहून त्यांनी माझ्या सुखदुःखात मला साथ दिली.शिक्षण घेताना ते मला प्रेरणा ठरले. बालवाडीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत मला लाभलेले सर्व शिक्षक हे माझ्या गुरुस्थानी आहेत. नोकरीच्या कार्यकाळात आजअखेर पेशाशी प्रामाणिक,निर्व्यसनी, कालसुसंगत व समाजभान जपणारे अनेक अधिकारी,सहकारी शिक्षक ,काही कर्मचारी माझ्या जीवनात मला लाभले.त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आज माझी शिक्षक म्हणून या क्षेत्रातील वाटचाल यशस्वी होत आहे. हे सर्वच जण अखंडपणे माझ्या गुरुस्थानी आहेत. आणि ज्यांच्यामुळे मी आज शिक्षक म्हणून कार्यरत आहे तो माझा नोकरीच्या सुरुवातीपासून आज पर्यंतचा विद्यार्थी हाही माझा गुरू आहे.प्रेम,आपुलकी,आदर याचा ठेवा जीच्याठायी आहे,जी नित्य ,वेळोवेळी माझ्या आयुष्याला समृद्ध करत आहे ती माझी अर्धांगिनी सौ.दिपाली ही देखील मला लाभलेली माझा गुरू आहे. माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो.आपल्या अवती-भवती असलेल्या सर्वच गोष्टीतून तो नित्य शिकत असतो.या निसर्गातील प्रत्येक घटक हा माझा गुरू आहे. मला माझ्या जीवनात लाभलेल्या या सर्व ज्ञात व अज्ञात घटकांना आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी मनोमन वंदन करतो!
-✍ सुनिल विलास अस्वले.पदवीधर शिक्षक -केंद्र शाळा दळवेवाडी, ता.पन्हाळा
रा.वडणगे,ता.करवीर.
मोबा.९०४९२११७८५