रविवार, २४ डिसेंबर, २०१७

सुचलेले काही 23/12/17

🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                     *सुचलेले काही.......*
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                                            दि.23/12/2017

              काल शालेय परीपाठात 3 री च्या विद्यार्थ्यांनी मैत्री या विषयावरील बोधकथा सांगितली.या बोधकथेचे तात्पर्य ,माणसे केलेली मैत्री विसरतात पण प्राणी मैत्री विसरत नाहीत असे सांगितले. बोधकथेचे तात्पर्य ऐकून थोडेशे आश्चर्य वाटले. योगायोगाने सहावीच्या वर्गात तासिकेला News Flash या घटकात पेंग्विनच्या मैत्रीचा किस्सा स्पष्ट करताना परीपाठातील बोधकथेचेच तात्पर्य जाणवले.रिओ दे जानेरोच्या समुद्रकिना-यावर राहणा-या माणसाशी 4 महिन्यांचा असताना मैत्री झालेला हा पेंग्विन पक्षी मोठा झाल्यावरही दरवर्षी आपल्या या मानवी मित्रास भेटण्यास जवळपास 8000 किमी अंतर पाहून येत असे. माणूस नि प्राणीमात्राच्या मैत्रीचे असे अनेक अजब किस्से नेहमीच ऐकायला मिळतात.यांतून हे स्पष्ट होते की प्राणी एकदा केलेली मैत्री कधीही विसरत नाहीत.याऊलट माणूस आपले मैत्री काळाच्या ओघात सहज विसरून जातो.जीवनाच्या प्रत्येक नवीन टप्प्यावर नवे मित्र जोडले जातात व यापूर्वीचे विसरले जातात.
            हे किती सहज घडते याचे खरे तर नवल वाटते.पण हे घडते हे सत्य नाकारताही येत नाही.ज्या माणसांची परस्परांशी निर्माण होणा-या मैत्रीचा पाया हा एकमेकांची केली जाणारी स्तुती, होणारी मदत, होणारा फायदा हाच असतो तेथे अशी मैत्री तेवढ्यापुरतीच असते.अशाप्रकारच्या मैत्रीत जेव्हा या अपेक्षांची पुर्तता होत नाही तेव्हा ही मैत्री सोयीस्करपणे दुर्लक्षित केली जाते व कालांतराने विसरलीही जाते व नव्याने नव्या ठिकाणी याच दृष्टीने प्रस्थापित केली जाते.याप्रकारची मैत्री ही संख्यात्मक दृष्ट्या अनेकांशी निर्माण होते.अशा मैत्रीत सांगायला मित्र भरपूर असतात.पण यात ख-या मित्राचा अंतर्भाव असत नाही.
              खरी मैत्री ही तुलनेने फारच कमी व्यक्तीशी ,कदाचित एखाद्याच मित्राशी आपसूक जन्माला येते.अशी मैत्री ही निरपेक्ष भावनेमुळे आजन्म विसरली जात नाही.मित्राकडून कोणत्याही *अपेक्षेविना निर्माण झालेली ही मैत्री आयुष्यात एकमेवद्वितीय असते.*इतर कोणीही कितीही जणांनी मैत्रीची साद घातली तरी मन मैत्रीस तयार होत नाही. जेव्हा आयुष्यात कोणाबरोबर अशी मैत्री जडते तेव्हा ती हृदयापासून जडलेली असते. अशा मैत्रीत कोणत्याही प्रकारचे मतभेद असत नाहीत. *विचार व भावनेच्या समानतेवर एकत्र आलेले हे मित्र परस्परांचा आदर ठेवत एकमेकांसाठी दिपस्तंभाची भूमिका बजावतात.* योग्य दिशादर्शन करून परस्परांच्या जीवनाचे उन्नयन घडवून आणणे ही भावना अशा मैत्रीत अंतर्भूत असते.याकरीता वेळप्रसंगी योग्य बाबतीत प्रशंसा व अयोग्य बाबतीत खडसावणे ही भूमिका जपली जाते.
            पण तरीही अशी मैत्री परस्परांपासून दुरावली जात नाही उलट अशा प्रसंगांतुन या मैत्रीचे ऋणानुबंध अधिकच दृढ़ होत जातात कधीही न तुटण्याकरीता.अशा मैत्रीने जीवन ख-या अर्थाने आनंदी नि उत्साही राहते.जिवनातील कितीही कठीण प्रसंगात असताना अशा मित्राचे असणे म्हणजे वाळवंटात तहानेने व्याकुळ पथिकास ओअँसीस दृष्टीपथास पडणे असते.अशाच एका msg मध्ये मैत्रीबद्दलच्या भावलेल्या पुढील ओळींची अनुभूती देणारी मैत्री हीच खरी मैत्री असते.....

*मनाने मनाशी गुंफलेली सुंदर वीण अन्*
*तुझ्याशी बोलताना विसर पडलेला शीण*
*म्हणजे ...मैत्री..!*

              *शुभरात्री*
*✍ *सुनील अस्वले.*

sunilaswale80@gmail.com

*whatsapp* 9049211785
 
*mob* 8805835959,7219550629
                                      
                                🙂
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
           suvarnvilas.blogspot.com
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁

गुरुवार, २१ डिसेंबर, २०१७

सुचलेले काही 20/12/17

🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                     *सुचलेले काही.......*
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                                              *दि.20/12/17*

*मन वढाय वढाय,उभ्या पिकातलं ढोर*
*किती हाकलं हाकलं,फिरि येतं पिकांवर|*
              बहीणाबाईंच्या या काव्यपंक्तित मानवी मनाचे यथार्थ दर्शन घडते.अनेकदा आपण अनेक गोष्टी टाळण्याचा संकल्प
करतो.पण मनाने हे करणे त्रासदायक किंवा अशक्यप्राय होते.कितीदाही ठरवले तरी मन या गोष्टीस तयार होत नाही.मनापासून जोडलेल्या नात्यांच्या बाबतीत हा अनुभव निश्चितच येतो.काहीवेळा अनिश्चित,अपूरक तर काहीवेळा निव्वळ गैरसमजाच्या अव्यवहार्य कारणांतून अशा नात्यांपासून दूर होण्याचे मन ब-याचदा ठरवते.
                 पण शेवटी आपुलकी,स्नेह,जिव्हाळा,प्रेम,विश्वास या भावनांच्या वलयात गुंतलेले हे मन या नात्यांपासून दुरावण्यास मज्जाव करते. *नात्यांतील ओढ मनापासून जपली की नात्यांत दुरावा होणे शक्यच नसते.*मनापासून जोडली गेलेली मित्रत्त्वाची नाती आयुष्यात एकदाच निर्माण होतात.ती टाळून जगणे म्हणजे दिव्याने वातीशिवाय प्रकाश देणे असल्यासारखे आहे.प्रकाशाशिवाय सूर्य,पाण्याशिवाय समुद्र,ममतेशिवाय मातृत्व जसे अशक्य तसे भावनेशिवाय मन नि नात्यांशिवाय आयुष्य अशक्य. ही *नाती मनापासून जपली तरच आयुष्य आयुष्य असते* नाती जपणा-या अशा मनास नात्यांपासून कितीही हाकलं तरी त्यांन फिरून ,परतुन नात्याजवळ यावे ,नाते जपावे हेच खरे मन नि हेच खरे जीवन!

              *शुभरात्री*
✍-- *सुनील अस्वले.(सुवर्णविलास)*

sunilaswale80@gmail.com

*whatsapp* 9049211785
 
*mob* 8805835959,7219550629
                                      
                                🙂
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
           suvarnvilas.blogspot.com
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁

शिक्षण कालचे नि आजचे.

🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                     *सुचलेले काही.......*
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                                            दि.12/12/2017
                   रविवारचा दिवस.अशाच एका शालेय स्पर्धा परीक्षेकरीता मोठ्या मुलास घेऊन नियोजित वेळेत परीक्षास्थळी पोहचलो. परीक्षाकेंद्राबाहेर बरीच गर्दी होती.जितकी मुले परीक्षेस बसली होती तितकेच त्यांचे आई किंवा वडील काहींचे दोघेही असे पालकही हजर होते.परीक्षाकेंद्राच्या आवारात बैठकव्यवस्थेचा फलक लावण्यात आला होता व तिथे कोणाचा परीक्षा क्रमांक कोणत्या क्रमांकाच्या खोलीत आहे तो वर्ग कुठे आहे हे सांगण्याकरीता तेथील एक शिक्षक थांबून होते.ते प्रत्येक विद्यार्थ्यास मार्गदर्शन करत होते.त्यानुसार तो विद्यार्थी व त्याच्यासोबत असणारे पालक हे सर्वचजण परीक्षाकक्षात जात होते. इथे मी गेटवरूनच मागे फिरलो.इतक्यात माझा मुलगा परीक्षाकक्षातुन बाहेर माझ्याकडे आला.त्याच्यकडे त्याच्या इतर मित्रांचे परीक्षा क्रमांक होते ते त्या मुलांना देण्यास सांगु लागला पण त्या मुलांकडे त्यांचे क्रमांक आहेत हे मला समजले पण तरीही ती मुले त्यांच्या परीक्षाकक्षात आहेत का हे पाहत असताना मी परीक्षाकक्षात इतर पालकांचे थोडे अवलोकन केले.आपल्या पांल्याने परीक्षेस आवश्यक सर्व वस्तु सोबत घेतल्या आहेत का? त्या खरेच आहेत का? प्रश्नपत्रिका कशी सोडवायची याचे मार्गदर्शन इ.इ... हे असे सर्व तिथे सुरू होते.परीक्षेची वेळ सुरू होणार होती तरीही पालकवर्ग काही परीक्षाकक्षातून बाहेर येत नव्हता.पर्यवेक्षक पालकांना वारंवार सुचना करुनही त्याकडे या पालकांचे दुर्लक्षच होते.अखेरीस या कक्षातील पर्यवेक्षकाने या पालकांना तुम्हीच परीक्षा दया असे सुनावले तेव्हा एक एक पालक बाहेर पडू लागले.
                       हे सर्व पाहताना  मला माझ्या परीक्षेची आठवण झाली. 10 वी व 12 वी च्या परीक्षांकरीता शहरापासून जवळपास 4 ते 5 कि.मी.अंतरावर असणा-या आसपासच्या गावांतुन आम्ही मित्रमंडळी सायकलच्या प्रवासाने परीक्षाकेंद्राचा पत्ता विचारत विचारत नियोजित वेळेपूर्वी परीक्षाकेंद्रावर पोहचत होतो.इथे स्वतः सर्व माहिती घेऊन परीक्षाकक्षात विराजमान होत होतो.घरातुन निघतानाच परीक्षेसंदर्भातील पूर्वतयारी स्वतःच करत होतो.घरातून एकमेव गोष्ट मिळायची ती म्हणजे आई-वडीलांचे,ज्येष्ठांचे नि परमेश्वराच्या फोटोंचे आशीर्वाद. याच शिदोरीच्या बळावर नि स्वतः  व वर्षभर गुरुजनांच्या समृद्ध शिक्षणाने मिळालेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आमची ही परीक्षेची यात्रा निर्भयपणे नि यशस्वी पार पडत होती.आजच्या सारखी इतकी आगतिक परिस्थिती तेव्हा अजिबात नव्हती. *फुलाने कसे फुलावे,त्याने कोणता रंग धारण करावा,त्याने कसा आकार घ्यावा,त्याचा काय उपयोग व्हावा हे आपण ठरवणारे पालक आम्हांस लाभले नाहीत.ऊलट आवश्यक तितके खत-पाणी व योग्य ती जमीन उपलब्ध (चांगली शाळा,शिक्षणाचे आवश्यक साहित्य) करून देऊन आम्हाला आमच्याप्रमाणे फुलण्यास स्वातंत्र्य बहाल केलेले पालक लाभले याचा आजच्या क्षणी मला अभिमान वाटतो.*
                काहीजणांच्या मते आजच्या स्पर्धात्मक युगात मुलाच्या उच्च गुणवत्तेकरीता पालकाने अशी काळजी घेणे आवश्यक ठरते.ती जरूर घेतली पाहीजे पण ती एका विशिष्ट मर्यादेपर्यंत असणे नितांत गरजेचे आहे.आपल्या अपेक्षांचे ओझे मुलावर लादणे,आपल्या अहंभावापोटी मुलास झिजवणे,आपल्या मुलाच्या सर्वच बाबींची पुर्तता आपणहुन करणे खरेच आवश्यक आहे का? आपल्या या अशा काळजीने नि अपेक्षेने मुलास आपणच मनाने पंगू बनवत जातो.यांतून योग्य स्वनिर्णयक्षमतेअभावी भविष्यात येणा-या अपयशाला हेच मुल त्याच्या अतिकाळजीने झपाटलेल्या त्याच्या पालकासच जबाबदार धरते.यातून एकतर हे मुल निराशेच्या गर्तेत जाते किंवा बंड करते.अशावेळी आपली चुक मान्य करून वेळीच आपल्या मुलास त्याच्या पद्धतीने फुलू देण्यास आपल्या वृत्तीत पालकाने बदल केला तर मुलाचे पुन्हा फुलणे होईल पण मुलाच्या अपयशाला सर्वस्वी त्यालाच जबाबदार ठरवून त्याच्याच उणीवा पालक दाखवू लागला तर मात्र हे फुल कायमचे कोमेजुन जाईल हे नक्की नि त्यास सर्वस्वी जबाबदार कोण असेल  ते म्हणजे तुम्ही स्वतः पालक. म्हणून शिक्षणात मुलास स्वावलंबी राहू दया.बहुत बाबतीत त्याचे त्याला कार्य करण्याची ,काळजी घेण्याची सवय अंगी बाणवू दया.स्वयंप्रेरणा,स्वनिर्णय या गुणांची जोपासना त्याच्यामध्ये करा.आपल्या सर्वच गोष्टी आपले पालक करतात /कराव्या या भ्रामक समजूतीतुन त्याला बाहेर काढा.त्याच्या बाबतीत कोणतेही कार्य अति नसावे हे प्रत्येक पालकाने लक्षात घेतले पाहिजे. तरच ख-या अर्थाने एक सुदृढ तरुण या देशाचे भविष्य घडवण्यास निर्माण होईल.

            
✍ *सु.वि.अस्वले.*

sunilaswale80@gmail.com

*whatsapp* 9049211785
 
*mob* 8805835959,7219550629
                                      
                                🙂
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
           suvarnvilas.blogspot.com
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁

रविवार, १० डिसेंबर, २०१७

मैत्री

🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                     *सुचलेले काही.......*
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                                            दि.09/12/2017
                             * *मैत्री*

माणसाच्या जीवनात आनंदाचे - दुःखाचे क्षण हे नात्यांतुन निर्माण होत असतात.आपले कुटूंब,नातेवाईक,समाज व मित्र-मैत्रिणी यांतील प्रत्येकाशी असणारे आपले नाते व त्या नात्यांत असलेला परस्पर स्नेह,विश्वास,आपुलकी ,श्रद्धा यांवर प्रत्येकाच्या जीवनातील आनंद नि दुःख अवलंबून राहते. जन्मत: प्राप्त व कालपरत्वे आपसूक जोडल्या गेलेल्या नात्यांतील माधुर्य नि कटूता या माणसाच्या मनावर अवलंबून असतात. *नाती ही खरेतर मना-मनाचे बंध असतात.* ती अतूट रहावीत नि त्यांतून जीवनानंद लाभावा हेच खरे आयुष्य जगणे असते.
           जन्मासोबत लाभलेल्या नात्यांसोबत जोडलेली नातीही आयुष्यात महत्त्वपूर्ण असतात.जीवनातील आनंद व दुःख या प्रसंगात ही आपसूक विचारांच्या ,मनाच्या पातळीवर जोडली गेलेली नाती महत्त्वाची ठरतात.या नात्यांत मैत्रीचे नाते अधिक जवळचे,विश्वासाचे नि गहीरे असते.मित्र ही माणसाच्या जीवनातील अशी बाब असते जिथे मनमोकळेपणाने आयुष्याची सर्व सुख-दुःख परस्परांशी विश्वासाने शेअर केली जातात. मित्र ही एक हळुवार भावना असते जिथे परस्परांबद्दल अतूट स्नेह,आपुलकी,काळजी असते. *मैत्रीच्या नात्यांतील ऋणानुबंध हे सूर्य व त्याच्या प्रकाशाइतके शाश्वत नि अबाधित असतात.*कोणत्याही कारणाने मैत्रीच्या नात्यास गैरसमजाचे ग्रहण लागले तरी ते क्षणिक ठरते.मित्राप्रती असणारा स्नेहरूपी प्रकाश या ग्रहणाच्या तमावर मात करतोच.
            *जीवनात लाभलेली खरी मैत्री ही जीवनाला लाभलेल्या श्वासाप्रमाणे की ज्याच्याशिवाय जीवन जीवन असू शकत नाही अशी असते.* अशा मैत्रीत कोणतेही बंधन नसते.मित्राबद्दलचा अतूट विश्वास व स्नेह हा या नात्याला लाभलेला परिसस्पर्श असतो.याच्या अस्तित्वाने ख-या मैत्रीचे सुवर्ण होते.काहीवेळा या सुवर्णास जरी तप्त झळा लागल्या तरी ती अधिकच झळाळून जाते. *आपला मित्र सदैव आनंदी असावा हीच एकमेव भावना मैत्रीच्या नात्यांमध्ये असते.*जीवनातील हरएक प्रसंगात मित्राची साथ अनिवार्य असते.प्रत्येकास आपल्या जीवनातील सुखाचे,दु:खाचे प्रत्येक क्षण प्रथम आपल्या मित्रासोबत शेअर करण्याची तीव्र ओढ असते.इथे मैत्रीतील भरवसा आनंदाचे क्षण अधिक आनंददायी करतो तर दुःखाची जीवनातील दाहकता कमी करतो. *आनंदी क्षणात पाठीवर शाबासकीची थाप देऊन कौतुकाचा वर्षाव करत जीवन अधिक उत्कृष्ट करणारे मित्राचे हात दुःखाच्या क्षणातही पाठीवर हात ठेवून लढ म्हणण्याची प्रेरणा,बळ देतात.*
                मनुष्यास आपले जीवन अधिक सुंदर करायचे असेल तर जीवनात मैत्री असायलाच हवी. *मैत्री कोणी कोणाशी करावी याला बंधन नसावे पण मर्यादा जरूर असायला हवी.*आपल्या मैत्रीने आपल्या मित्रास त्रास होऊ नये याची काळजी मैत्री निभावताना परस्परांनी घेतली पाहिजे.आपल्या मनाप्रमाणे मित्राने वागावे ही भावना मैत्रीत असता कामा नये. *आपल्या वेळप्रसंगानुसार मैत्रीचा विसर पडता कामा नये.काही कारणांनी मैत्रीत दुरावा निर्माण झाला तरी किना-यावर येणा-या लाटेप्रमाणे पुन्हा पुन्हा परतून यावे.पण किना-याची साथ सोडू नये.*

*सर्वांना जीवनातील स्नेहमय,अतूट मैत्रीच्या शुभेच्छा!*

              *शुभदिन*
✍ *सुनील अस्वले.(सुवर्णविलास)*

sunilaswale80@gmail.com

*whatsapp* 9049211785
 
                                      
                                🙂
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
           suvarnvilas.blogspot.com
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁

बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

नम्र जीवन

🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                     *सुचलेले काही.......*
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                                                दि.06/12/2017
                    मानवी मनाला लागणारी कीड म्हणजे अहंकार! *माझे तेच खरे मानने ही प्रवृत्ती माणसाला अहंकारी बनवते.* ही प्रवृत्ती माणसाला नकारात्मक वृत्तीकडे नेते.इतरांतील योग्य गोष्टीं बेदखल ,दुर्लक्षित करण्याची व स्वतःच्याच सर्वच गोष्टी योग्यच मानण्याची नि यांतून स्वतःबद्दल वृथा अभिमान बाळगण्याची मानसिकता या व्यक्तिंची निर्माण होते. अशा लोकांची ही प्रवृत्ती त्यांच्या स्वतःच्या अधोगतीस कारणीभूत ठरतेच पण इतरांच्याही प्रगतीत अडथळे निर्माण करते.या माणासांचा चुकीचा अहंभाव नवीन ,आधुनिक गोष्टी नाकारत राहतो.एखाद्याने केलेली योग्य कृती यांच्यादृष्टीने त्यांच्यावर केलेली मात ठरते.ही बाब त्यांचे अहंकारी मन स्वीकारण्यास राजी होत नाही.यांतून आशा व्यक्तिंमध्ये इतरांबद्दल द्वेषभावना निर्माण होते.ही द्वेषभावना स्वतः त्या व्यक्तीस पोखरते पण इतरांनाही त्याचा त्रास होतो.
                 खरेतर प्रत्येक मनुष्याने जीवनात नम्रतेने राहायला हवे.आपल्याकडे सध्य परिस्थीतीत कितीही भौतिक,आर्थिक,शारीरिक ,बौद्धिक संपदा ,सुबत्ता असली तरीही या सर्व गोष्टींमध्ये कालपरत्वे बदल घडत राहतात.या गोष्टी आपल्याबरोबरच इतरांकडेही असतात किंबहुना या आधिक,आधुनिक असू शकतात याची जाणीव मनात ठेवणे हीच वृत्ती माणसाला नम्र बनवते.एका सुवचनाप्रमाणे *'नम्रतेला उंचीचे माप नसते.'* हे देखील प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. *महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती* या उक्तिचाही विचार जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्याने केला पाहिजे.लव्हाळ्याप्रमाणे नम्र होऊन इतरांचे महानत्व स्विकारण्याची मानसिकता असावी.
                      माणसाला स्वतःबद्दल अभिमानही जरूर असावा.काही प्रसंगात *मोडेन पण वाकणार नाही*ही मानसिकताही बाळगायला हवी.जिथे स्वतःच्या व इतरांच्या बाबतीत अन्याय,अयोग्य ,अहित घडते तिथे हा बाणा निश्चितच जोपासला पाहिजे.अशा प्रसंगात न्याय्य बाजूने आपण आपल्या मताशी जरूर ठाम राहावे.अहंकारविरहित नम्र,अभिमानी वृत्तिने जीवनाची वाटचाल यशस्वी,आनंददायी दिशेने निश्चितच होते.
              *शुभदिन*
✍ *सुनील अस्वले*

sunilaswale80@gmail.com

*whatsapp* 9049211785
 
*mob* 8805835959,7219550629
                                      
                                🙂
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
           suvarnvilas.blogspot.com
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁

मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                     *सुचलेले काही.......*
   🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁🍃🍂🍁
                                                           दि.13/10/2017

गैरसमजाचे मळभ मनात ठेवून एखाद्याशी नाते मग ते कोणतेही असू दे, ते जपणे सर्वार्था चुकीचे असते.ज्याच्याशी आपले नाते प्रामाणिकपणाचे असते त्याने मनात आपल्याचविषयी संशय ठेवणे आणि तरीही आपण स्वतःच्या चांगुलपणावर विश्वास ठेवत,माणुसकीवर श्रद्धा ठेवत नाती सांभाळण्याचा कसोशीने प्रयास करावा हा प्रकार म्हणजे आत्मघात करण्यासारखाच आहे. *व.पु. नी म्हटल्याप्रमाणे आयुष्यातील सर्वात जीवघेणा क्षण कोणता तर तो हा की, खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच यावा,सद्हेतुची शंका घेतली जावी,हा!*
       कोणतीही नाती निरखून - पारखून जोडणं शहाणपणाचं ठरतं. घाईगडबडीत भावनिक होऊन जोडलेल्या नात्यातील सुरवातीला असलेले ऋणानुबंध सतत नि अखेरपर्यंत तसेच राहतील याची शाश्वती नसते.आणि हे असे नाही झाले तर
होणा-या यातना शब्दांत व्यक्त करणे शक्य नसते.ही बाब मनात कँन्सरसारखी राहते.भावनिक मनाला ती अखेरच्या क्षणापर्यंत पोखरते.
*नाती जोडा-नाती जपा!*
            
            *शुभदिन*

✍ *सुवर्णविलास*

sunilaswale80@gmail.com

*whatsapp* 9049211785
 
*mob* 8805835959,7219550629
                                      
                                🙂
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
           suvarnvilas.blogspot.com
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁

🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                     *सुचलेले काही.......*
   🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁🍃🍂🍁
                                                           दि.13/10/2017

गैरसमजाचे मळभ मनात ठेवून एखाद्याशी नाते मग ते कोणतेही असू दे, ते जपणे सर्वार्था चुकीचे असते.ज्याच्याशी आपले नाते प्रामाणिकपणाचे असते त्याने मनात आपल्याचविषयी संशय ठेवणे आणि तरीही आपण स्वतःच्या चांगुलपणावर विश्वास ठेवत,माणुसकीवर श्रद्धा ठेवत नाती सांभाळण्याचा कसोशीने प्रयास करावा हा प्रकार म्हणजे आत्मघात करण्यासारखाच आहे. *व.पु. नी म्हटल्याप्रमाणे आयुष्यातील सर्वात जीवघेणा क्षण कोणता तर तो हा की, खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच यावा,सद्हेतुची शंका घेतली जावी,हा!*
       कोणतीही नाती निरखून - पारखून जोडणं शहाणपणाचं ठरतं. घाईगडबडीत भावनिक होऊन जोडलेल्या नात्यातील सुरवातीला असलेले ऋणानुबंध सतत नि अखेरपर्यंत तसेच राहतील याची शाश्वती नसते.आणि हे असे नाही झाले तर
होणा-या यातना शब्दांत व्यक्त करणे शक्य नसते.ही बाब मनात कँन्सरसारखी राहते.भावनिक मनाला ती अखेरच्या क्षणापर्यंत पोखरते.
*नाती जोडा-नाती जपा!*
            
            *शुभदिन*

✍ *सुवर्णविलास*

sunilaswale80@gmail.com

*whatsapp* 9049211785
 
*mob* 8805835959,7219550629
                                      
                                🙂
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
           suvarnvilas.blogspot.com
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁

साद माणुसकीची

🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                     *सुचलेले काही.......*
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                                                          दि.26/10/2017

*साद माणुसकीची*
आपल्या माणसांचे कौतुकाचे दोन शब्द जीवनातील सर्व आनंद मिळवून देतात.आणखी सुंदर कार्य करण्यास प्रेरणा देतात.आनंदी जीवनाचे हेच खरे मर्म आहे.  नि हेच खरे यश आहे. हे ज्याला समजते तोच खरा सुज्ञ! या व्यवहारी जगात माणूसकी जपणे हाच खरा धर्म आहे. जन्मता असणारी व जोडलेल्या नात्यांतील माणसांनी परस्परांशी आपुलकी,स्नेह जतन करणे हेच खरे आयुष्य आहे. खरेतर माणूस आयुष्यभर सत्ता,संपत्ती,पद ,प्रतिष्ठा ,मान या जीवनाला भ्रष्ट व सतत धाववत ठेवणा-या गोष्टींच्याच मागे असतो. यांतून तो फक्त व्यवहारी बनतो. माणूसकीचे खरे तत्त्व तो जाणतच नाही.आपले स्नेही,मित्र,परिवार यांच्याशी असलेले ऋणानुबंध जपण्यास केवळ काही वेळ नि आपुलकीच्या शब्दांची आवश्यकता असते.माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे हे यालाच म्हणतात. हीच खरी माणुसकी!

              *शुभदिन*
✍  *सुनील अस्वले.(सुवर्णविलास)*

sunilaswale80@gmail.com

*whatsapp* 9049211785
 
*mob* 8805835959,7219550629
                                      
                                🙂
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
           suvarnvilas.blogspot.com
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁

माणसे

🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                     *सुचलेले काही.......*
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                                                       दि.18/11/2017

जीवनात अनेकदा अशी माणसे भेटतात की वेळ बदलेल तशी ही माणसे स्वतःला बदलत राहतात.स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागणारी ही माणसे समोरच्या व्यक्तींचा अक्षरश: वापर करतात. समोरच्या व्यक्तीच्या भावभावनांशी यांना काही घेणे-देणे नसते.केवळ आपल्या विचारांप्रमाणे वागणे इतकेच यांना जमते.अशा माणसांशी  स्नेहसंबंध जोपासणे हे एक प्रकारचे दिव्यच असतं.कारण कोणत्या प्रसंगी ही कशी वागतील याचा काही नेम नसतो.यांना स्वतःचा मुड फार प्रिय असतो.यांचा स्वतःचा हा मुड कधी बदलेल याची शाश्वती नसते.ही माणसे एखाद्याशी स्नेहसंबंध जुळवतात पण यांचा मुड बदलला की हे हा स्नेहसंबंध सोयीस्कर दुर्लक्षित करतात अथवा विसरतातही. मैत्री मध्ये हा अनुभव अनेकदा अनेकांच्या अनुभवाला येतो.तुम्ही कितीही मनापासून अशा लोकांशी मैत्री केली असली तरी यांच्यादृष्टिने ही एक वेळ घालवण्यासाठी केलेली सोय असते.यांना मैत्रीची खरी जाणच नसते.खरेतर एखाद्याशी झालेली मैत्री म्हणजे जीवनतील अनेक सुखद क्षणातील एक दुर्मिळ क्षण असतो. या क्षणाला आयुष्यभर जपायचे असते.परस्पर विश्वास,स्नेह,निस्वार्थ प्रेम या गोष्टींनी मैत्री परिपूर्ण होत असते.आप्तनात्यासोबत मित्र ही एक हक्काची भावना असते.सुख-दुःख प्रसंगात मित्र ही व्यक्त होण्याची नि:संशय जागा असते.पण हे सर्व नाते विश्वासाच्या भक्कम पायावर आधारलेलं असते. पण अशा काही माणसांना या भावनेची,नात्याची कदर असत नाही. ही माणसे  समोरच्या स्नेह जोपासणा-या व्यक्तीला फारशी किंमत देत नाही.आपल्याच विश्वात मश्गुल असणारी ही माणसे तारे मोजण्याच्या नादात चंद्र गमावून बसतात.

              *शुभदिन*
✍ *सुनील अस्वले.(सुवर्णविलास)*

sunilaswale80@gmail.com

*whatsapp* 9049211785
 
*mob* 8805835959,7219550629
                                      
                                🙂
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
           suvarnvilas.blogspot.com
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁

नातेसंबंध 1

🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                     *सुचलेले काही.......*
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                                                       दि.18/11/2017
              *नातेसंबंध लेखमाला (भाग 1)*

जीवनात अनेकदा अशी माणसे भेटतात की वेळ बदलेल तशी ही माणसे स्वतःला बदलत राहतात.स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागणारी ही माणसे समोरच्या व्यक्तींचा अक्षरश: वापर करतात. समोरच्या व्यक्तीच्या भावभावनांशी यांना काही घेणे-देणे नसते.केवळ आपल्या विचारांप्रमाणे वागणे इतकेच यांना जमते.अशा माणसांशी  स्नेहसंबंध जोपासणे हे एक प्रकारचे दिव्यच असतं.कारण कोणत्या प्रसंगी ही कशी वागतील याचा काही नेम नसतो.यांना स्वतःचा मुड फार प्रिय असतो.यांचा स्वतःचा हा मुड कधी बदलेल याची शाश्वती नसते.ही माणसे एखाद्याशी स्नेहसंबंध जुळवतात पण यांचा मुड बदलला की हे हा स्नेहसंबंध सोयीस्कर दुर्लक्षित करतात अथवा विसरतातही. मैत्री मध्ये हा अनुभव अनेकदा अनेकांच्या अनुभवाला येतो.तुम्ही कितीही मनापासून अशा लोकांशी मैत्री केली असली तरी यांच्यादृष्टिने ही एक वेळ घालवण्यासाठी केलेली सोय असते.यांना मैत्रीची खरी जाणच नसते.खरेतर एखाद्याशी झालेली मैत्री म्हणजे जीवनतील अनेक सुखद क्षणातील एक दुर्मिळ क्षण असतो. या क्षणाला आयुष्यभर जपायचे असते.परस्पर विश्वास,स्नेह,निस्वार्थ प्रेम या गोष्टींनी मैत्री परिपूर्ण होत असते.आप्तनात्यासोबत मित्र ही एक हक्काची भावना असते.सुख-दुःख प्रसंगात मित्र ही व्यक्त होण्याची नि:संशय जागा असते.पण हे सर्व नाते विश्वासाच्या भक्कम पायावर आधारलेलं असते. पण अशा काही माणसांना या भावनेची,नात्याची कदर असत नाही. ही माणसे  समोरच्या स्नेह जोपासणा-या व्यक्तीला फारशी किंमत देत नाही.आपल्याच विश्वात मश्गुल असणारी ही माणसे तारे मोजण्याच्या नादात चंद्र गमावून बसतात.

              *शुभदिन*
✍ *सुनील अस्वले.(सुवर्णविलास)*

sunilaswale80@gmail.com

*whatsapp* 9049211785
 
*mob* 8805835959,7219550629
                                      
                                🙂
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
           suvarnvilas.blogspot.com
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁

नातेसंबंध भाग 3

🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                     *सुचलेले काही.......*
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                                                     दि.30/11/2017
                 *नातेसंबंध (भाग 3)*

                  मानवी जीवनात नाती फार मोलाची असतात.जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत लाभलेल्या आयुष्यात अनेक नाती निर्माण होतात.यातील रक्तसंबंधातील नात्यांसोबतच बाहेरच्या घटकांशीही नातेसंबंध निर्माण होतात.या *सर्व स्तरातील नात्यांची जपणूक करता येणे हा आयुष्याचा सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहे.आणि तोच खराखुरा जीवनानंद आहे.* माणूस जगतो ते केवळ स्वतःकरीता.भौतिक सुखाच्या दुनियेत तो स्वत:ला आयुष्यभर हरवून जातो नि सुखाच्या शोधार्थ आयुष्य गमावून बसतो.आयुष्याचे खरे सुख हे भौतिक गोष्टीत नसून ते माणसांत ,त्याच्याशी असलेल्या नात्याच्या ओलाव्यात असते.हा ओलावा,आपुलकी,यातील स्नेहभाव टिकवून तो दिवसांगणिक दृढ करता येणे हे यशस्वी नि आनंदी जीवनाचे खरे सूत्र आहे.
                 जन्मजात असणारी नाती व निरंतर अनेक प्रसंगातुन निर्माण होणारी नाती व या नात्यांतील भावभावना या मनाशी जोडलेल्या आसतात.मानवाच्या नात्यांमध्ये मन ही मोलाची कामगिरी बजावते.खरेतर नातेसंबंधाचा पाया मन हाच आहे. *जिथे निरपेक्ष,निस्वार्थी,आनंदी,प्रेमळ मन असते ते नाते भक्कम पायावर आधारित निरंतर राहते.*कोणतेही गैरसमज,अविश्वास या नात्यांना तडा जाऊ देत नाहीत.आजी-आजोबा-नातवंडे,आई-वडील-मुले,पती-पत्नी,मित्र-मैत्रिणी यांची नाती ही निरपेक्ष,निस्वार्थी,आनंदी,प्रेमळ नि परस्पर विश्वासाच्या भरभक्कम पायावर आधारलेली असतील तर नक्कीच जीवनाचे नंदनवन होते.पण जिथे याऊलट परिस्थिती असते तिथे जीवन क्लेशकारक होते. कोणाच्याही जीवनात आपल्यामुळे क्लेश होऊ नये याकरीता प्रत्येकाने काळजी घेतली तर प्रत्येक नाते,प्रत्येक जीवन मधुरमय होईल.याकरीता मने निकोप असली पाहिजेत. *आपल्या नात्यांवर दृढ विश्वास असायलाच हवा.* कधी-कधी नात्यांबद्दल मनाची द्विधा अवस्था होते. ब-याचवेळा नात्यांमधील दुरावे,गैरसमज हे इतरांच्या विचारांतुन होतात. अशावेळी प्रत्येकाने आपल्या अंतरमनाचे ऐकावे.तुमचे अंतरमन तुम्हांला योग्य दिशा नक्कीच देते.त्याची साद जरूर ऐका.

              *शुभदिन*
✍ *सुनील अस्वले.(सुवर्णविलास)*

sunilaswale80@gmail.com

*whatsapp* 9049211785
 
*mob* 8805835959,7219550629
                                      
                                🙂
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
           suvarnvilas.blogspot.com
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁