शनिवार, १४ ऑक्टोबर, २०२३

वाचन प्रेरणा दिन - घोषवाक्ये

*वाचन प्रेरणा दिन (15 ऑक्टोबर) निमित्ताने*
         *स्वरचित*

1) घरी ज्याच्या पुस्तके छान
     तो  जगती महान.

2) वाचाल पुस्तके छान
     होईल आपला देश महान.

3) प्रेरणा घेऊ वाचनाची
     करू प्रगती जीवनाची.

4) वाचन कर पुस्तकांचे
     होईल नंदनवन जीवनाचे.

5) करता मैत्री पुस्तकांशी
     जीवनात आनंदाच्या बरसतील राशी.

6) ज्याला असे वाचनाचा ध्यास
      त्यालाच मिळते यश खास.

7) करतो जो नित्य वाचन
      समृद्ध होते त्याचे मन.

8) वाचन देई मना संस्कार
     जीवनाला मग येई आकार.

9) *अग्निपंख* साकरून केली *प्रज्वलित मने*
      *असे घडवा तुमचे भविष्य* सांगुन कलाम आपणांस गेले.

10) कलाम होते *राष्ट्रपती* 
       या देशाचे *शास्त्रज्ञ*महान
      *अग्नी,आकाश,नाग,पृथ्वी,त्रिशुल* चे जनक ते
       आहेत भारताची आजही शान.
  
            *✍️©®सुवर्णविलास.*

रविवार, १ ऑक्टोबर, २०२३

बर झालं गांधी बाबा....

बर झालं गांधी बाबा,
आज तुम्ही नाहीत..
असत्याच्या गर्दीत आज,
सत्याचा गळा घोटला जात आहे...
तुमच्याच नोटेचा वापर करून,
भ्रष्टाचार इथे माजला आहे....
तुम्हांला अभिप्रेत असलेली अहिंसा,
 नावापुरती इथे उरली आहे...
नेहमी खरे बोलण्याची तुमची शिकवण,
आज विनोदाचा भाग बनली आहे....
तुमच्या तीन माकडांची शिकवण सुद्धा,
भाषणापुरती राहिली आहे....
विश्वास ठेवावा कुणावर,
अजिबात काही कळत नाही..
रोजच बदलणारे मुखवटे
लावून,
 फसवणूक नित्य इथे होत आहे....
बरं झालं गांधी बाबा,
आज तुम्ही नाहीत....

✍️©सुवर्णविलास02102023