पाहिले न भविष्य कुणी
क्षण वर्तमानाचा तू जग
करू नको चिंता उद्याची
हसत रहा तू या क्षणी!
----✍ *सुवर्णविलास दि.27/04/17*
पाहिले न भविष्य कुणी
क्षण वर्तमानाचा तू जग
करू नको चिंता उद्याची
हसत रहा तू या क्षणी!
----✍ *सुवर्णविलास दि.27/04/17*
मुलांना परीक्षार्थी बनवू नका ,ज्ञानार्थी बनवा. केवळ विविध परिक्षेतील यश म्हणजे जीवनाचे यश नव्हे. लायक जीवन जगण्यास व्यवहारज्ञान ,योग्य निर्णयक्षमता असली पाहिजे.जी लादलेल्या गोष्टीने येत नाही.आपल्या क्षणिक कौतुकासाठी,प्रतिष्ठेसाठी मुलांना जीवघेण्या परीक्षांच्या दावणीला बांधू नका.दावणीला बांधलेले जनावर कितीही धष्टपुष्ट असले व मालकाचे कितीही कौतुक झाले तरी मुक्त नि स्वच्छंदी जनावराची सर त्याला येत नाही. त्याच्या सुखाची अनुभुती त्याला नसते. असेच आपले नि आपल्या मुलाची गत असते.ती होऊ देऊ नका. --✍Sunil Aswale.(मुलांच्या करियर संदर्भातील माझे विचार)
शिक्षणाचे माध्यम महत्त्वाचे नसून विषयाचे आकलन करून घेण्याची जिद्द नि तळमळ महत्त्वाची. सध्या मुलांना केवळ
परीक्षार्थी बनविणा-या शिक्षणधोरणाचे हेच परिणाम अनुभवायाला मिळणार! इंग्रजी उपयुक्त नसते तर स्व.रामकृष्ण मोरे यांनी इ.1 ली पासून आणलेले इंग्रजी धोरणास नक्कीच विरोध झाला असता.त्रुटी कोणत्याही माध्यमात नसतात तर त्याच्या अंमलबजावणीच्या पद्धतीत असतात.मुळात या प्रकारच्या पोस्ट पाठवणा-याची मुले कोणत्या माध्यमात शिक्षण घेतात हे पाहणे संशोधनाचे ठरेल. आपल्या पाल्यास स्पर्धक कमी करण्याचा हे इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणा-या मुलांच्या पालकांचे पडद्यामागचे कारस्थान असल्याचे स्वतः इन्फोसिसचे संस्थापक नारायणमुर्ति यांनी म्हटले आहे.(बघा पटतंय का! माझे वैयक्तिक विचार) सेमी इंग्रजी माध्यमातून शिकलेली माझी भाची इंजीनीअरिंगमध्ये आज college मध्ये topper आहे.