बुधवार, २९ मे, २०१९

स्टाफ पोर्टल मधील तारखा पाहणे

स्टाफ पोर्टल मध्ये तारखा तपासून पाहणे .

सर्वप्रथम http://edustaff.maharashtra.gov.in/Education/users/login  ही लिंक ओपन करा.

आता येणाऱ्या लॉगिन विंडोमध्ये Login As -Headmaster

User ID ---तुमच्या शाळेचा U dise no.

Password  --शाळेचा जो असेल तो.

Capcha code -- जो दिसतो तो तसाच भरा.

आता लॉगिन बटनावर क्लिक करा.

यापुढे ओपन होणाऱ्या page मधील सर्वात पहिल्या Tab वर क्लिक करा..  व यातील पॉप डाऊन ऑप्शनमधील teaching details वर क्लिक करा.

यापुढे ओपन होणाऱ्या विंडो मध्ये select teacher हा पर्याय दिसेल व त्यापुढे submit बटन दिसेल.
सर्वप्रथम select teacher वर क्लिक करा.इथे तुमच्या शाळेत attach असणाऱ्या सर्व शिक्षकांची नावे दिसतील. यातून तुमचे नाव निवडा व त्यापुढील submit बटनावर क्लिक करा.

यानंतर उजव्या बाजूस दिसणाऱ्या उभ्या कॉलम मधील सर्वात पहिल्या पर्यायावर (Personal details) क्लिक करा. व यातील बेसिक व पोस्टिंग  या पर्यायावर क्लिक करा.

या नंतर स्क्रीनवर processing सुरू होईल व त्यानंतर cluster head द्वारा डेटा already verify झालेला मेसेज दिसेल त्यास ok करा.

इथे आपणांस तुमच्या सर्व तारखा  (नोकरी सुरू, सध्याचे व्यवस्थापन (current मॅनेजमेंट) ,जिल्हा परिषद दि.तालुका दि.शाळा हजर दि. दिसून येईल.

---✍ सुनील अस्वले. पद.अध्या.वि.मं. पोहाळे/आळते.

सोमवार, १३ मे, २०१९

Aai

आई ही आईच असते...
कुणाची मम्मी,कुणाची मॉम,
कुणाची माय,तर कुणाची अम्मी असते...
शब्दांत या साऱ्या  ममतेची भावना असते...
साऱ्या विश्वात ती वंदनीय असते....

आई ही आईच असते...
मायेचा अखंड वाहणारा झरा असते...
सुखाची ती बरसात असते...
रणरणत्या आयुष्यातील ती सावली असते...
आयुष्यातील वेदनेवर ती प्रेमाची फुंकर असते...

आई ही आईच असते...
देव्हाऱ्यातील देवांपेक्षाही स्थान तिचे उंच असते...
जीवनाचा ती दीपस्तंभ असते...
वादळात भरभक्कम साथ देणारी ती दैवी शक्ती असते...
आयुष्याला सुखाच्या किनारी नेणारी ती नौका असते...

आई ही आईच असते...
कुणाची मम्मी,कुणाची मॉम,
कुणाची माय,तर कुणाची अम्मी असते...

मातृदिनानिमित्त सर्व मातांना मनस्वी प्रणाम!!🙏

✍ *सुवर्ण* विलास. दि.12 मे 2019

www.suvarnvilas.blogspot.com

सोमवार, ६ मे, २०१९

दोन प्रसंग

*दोन प्रसंग*

आज कोल्हापूर भटकंती करताना भेटलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी माझ्याशी शेअर केलेले विचार

*पहिला प्रसंग* -- नाश्ता करीत असताना शेजारी खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीने आज शिवजयंतीची शासकीय सुट्टी आहे का विचारले .मी त्यांना नाही म्हणालो..त्याच व्यक्तीने पुन्हा 19 फेब्रुवारी रोजी असते ना? विचारले...मी हो म्हणालो. यावर त्या व्यक्तीने मग एकच शिवजयंती करायची ना... असे मत व्यक्त केले..मी त्याला आताची परंपरेनुसार असल्याचे सांगितले पण तरीही ती व्यक्ती एकदाच करावी या त्याच्या मतावर ठाम होती. काहीच वेळात ती व्यक्ती परदेशातील जीवनशैलीबद्दल सांगू लागली..तेथील लोकांचे प्रश्न आपल्या इथे असतात जसे की,रस्ते,वीज,पाणी असे काही नसतातच मुळी ...दोन वर्षे पाऊस जरी झाला नाही तरी त्यांचे नियोजन तयार असते..हे ती व्यक्ती मला पटवून देत होती.... मी खुणेनेच इथे भ्रष्टाचाराला प्राधान्य देत असल्याचे सांगितले. यावर ...खाऊ देत हवं तेवढं पण लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत अशी ती व्यक्ती म्हणाली..मी हसत माझ्या मार्गी रवाना झालो.

*दुसरा प्रसंग*-- रिक्षातून गावाकडे परतत असताना..एक व्यक्ती मोबाईल वरून आपण कोठे आलो आहोत याची माहिती सांगत होती..यावर दुसऱ्या एका व्यक्तीने मोबाईलचा किती उपयोग होतो.. मोबाईल आहे म्हणून बरे आहे असे म्हटले..पण जी व्यक्ती मोबाईलवरून बोलत होती तीने जे सांगितले ते ऐकून अडाणी माणसे खरेच शहाणी असतात हे अधोरेखीत झाले.. मोबाईल चांगलाच आहे पण फक्त 20 % नाहीतर 80% नुकसानच करतोय..वापर कसा करतो यावर हे सगळं ठरतं.. नाहीतर आजची तरुण पिढी चे नुकसानच होत असल्याचे मत त्या व्यक्तीने मांडले.

(या दोन्ही प्रसंगातून मला जे शिकता येईल ते मी शिकलो...आपणांस जे वाटते अन उपयुक्त ठरते ते आपण ठरवावे)

✍ © सुवर्णविलास
दि.06/05/2019