बुधवार, २२ एप्रिल, २०२०

Gratitude

Gratitude 2 -- देशात दूरसंचार क्रांती घडून आली अन माणसांमाणसातील संवादाचे साधन म्हणून टेलिफोन घरोघरी पोहचला. सुरवातीच्या काळात टेलिफोन फारच थोड्या घरांत हा टेलिफोन अत्यंत दिमाखाने विराजित असायचा. या घरातील टेलिफोनचा क्रमांक सर्व आप्तस्वकीय,मित्र यांना दिलेला असायचा..आणि मग आजूबाजूच्या सर्वांना फोन आला की बोलावणे हे या घरातील सदस्यांचे नित्य कार्य असायचे.  प्रतिष्ठतेचे लक्षण असणारा हा टेलिफोन सन 2001 साली आमच्याही घरी विराजमान झाला. 2477073 या क्रमांकाच्या या लँडलाईन टेलिफोनने पुढील बरीच वर्षे आम्हां सर्व नातेवाईक, मित्रमंडळी ,कर्मचारी यांच्यात संवाद घडवून आणायची किमया पूर्ण केली. जीवनातील सुखदुःखाच्या वार्तालापाचा साक्षीदार असणारा हा टेलिफोन आजच्या मोबाईलच्या जमान्यात घराघरांतून नाहीसा झाला असला त्याची अतूट साथ,त्यावर साधलेले संवाद आजही मनाला भूरळ घालतात.लॉकडाऊनच्या काळात आठवणींच्या प्रदेशात सैर घडवून आणणाऱ्या या साधनाचे मनस्वी धन्यवाद!😊

माझ्या मना....(सहज सुचलेले काही)

माझ्या मना....

माझ्या मना..
नको होऊ तू अस्वस्थ
ही दुनियेची रितच आहे
करतील जे चिक्कार प्रेम तुझ्यावर
तेच करतील तुझा तिरस्कार..

तुझ्या हळवेपणाची
उडवतील मज्जा 
व्यवहाराच्या या दुनियेत
तुझे अस्तित्व शून्य आहे 
हे तू लक्षात ठेव...

कुणासाठी करणे विलाप
व्यर्थ आहे तुझे..
इथे क्षणाला बदलणारी
माणसे आहेत अवती-भवती..

कुणाचे बोलणे तू
लावून घेऊ नकोस 
तुझ्या मनाला..
इथे शब्दांना देखील
बदलले जाते सोयीनुसार...

तुझ्या चांगुलपणाला 
नाही काही किंमत आता
बघ जमले तर कणखर हो..
विंदा च्या कवितेतला *दगड* हो...

हेच बजावतो मी तुला
पुन्हा पुन्हा
माझ्या मना बन दगड...
माझ्या मना बन दगड..

✍© सुवर्णविलास.

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

Gratitude

Gratitude 2 -- देशात दूरसंचार क्रांती घडून आली अन माणसांमाणसातील संवादाचे साधन म्हणून टेलिफोन घरोघरी पोहचला. सुरवातीच्या काळात टेलिफोन फारच थोड्या घरांत हा टेलिफोन अत्यंत दिमाखाने विराजित असायचा. या घरातील टेलिफोनचा क्रमांक सर्व आप्तस्वकीय,मित्र यांना दिलेला असायचा..आणि मग आजूबाजूच्या सर्वांना फोन आला की बोलावणे हे या घरातील सदस्यांचे नित्य कार्य असायचे.  प्रतिष्ठतेचे लक्षण असणारा हा टेलिफोन सन 2001 साली आमच्याही घरी विराजमान झाला. 2477073 या क्रमांकाच्या या लँडलाईन टेलिफोनने पुढील बरीच वर्षे आम्हां सर्व नातेवाईक, मित्रमंडळी ,कर्मचारी यांच्यात संवाद घडवून आणायची किमया पूर्ण केली. जीवनातील सुखदुःखाच्या वार्तालापाचा साक्षीदार असणारा हा टेलिफोन आजच्या मोबाईलच्या जमान्यात घराघरांतून नाहीसा झाला असला त्याची अतूट साथ,त्यावर साधलेले संवाद आजही मनाला भूरळ घालतात.लॉकडाऊनच्या काळात आठवणींच्या प्रदेशात सैर घडवून आणणाऱ्या या साधनाचे मनस्वी धन्यवाद!😊

मुजरा शिवराया

करून प्रतिज्ञा स्वराज्याची
अवघे जीवन तू वाहिले
करितो मुजरा हे शिवराया
स्वराज्य आम्हां तू दिधले।

✍©सुवर्णविलास

संयम ( सहज सुचलेले काही)

*सहज सुचलेले काही*

आयुष्यात काही चांगले गवसायचे असेल तर त्याकरिता  संयम महत्त्वाचा असतो.एखाद्या परिस्थितीत तत्काल काही मिळावे ही अपेक्षा माणसाला दुःखी तर बनवतेच पण अपेक्षित गोष्ट मिळेलच याची शाश्वती देखील नसते.

✍ सुवर्णविलास दि.08/04/20

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

मुजरा शिवराया

करून प्रतिज्ञा स्वराज्याची
अवघे जीवन तू वाहिले
करितो मुजरा हे शिवराया
स्वराज्य आम्हां तू दिधले।

✍©सुवर्णविलास

जीवनाचा रंगमंच

जीवन हा देखील एक रंगमंचच आहे.तीन प्रवेशांचे हे नाटक शिकण्यातून ,अनुभवातून साकारले जाते.अनुभव हा या नाटकातील सर्वात मोठा गुरू!  तो आधी परीक्षा घेतो अन मग शहाणं बनवतो. या रंगमंचावरील आपली एंट्री अन एक्झिट मात्र 'त्या' दिग्दर्शकाच्या हाती असते ज्याला आपण कोणी प्रत्यक्ष पाहिले नाही पण रोज नवा सूर्य पाहायला देणारा तो  मात्र जन्माचा पडदा उघडून मृत्यूचा पडदा झाकण्यापर्यंत हे सारं नाटक घडवून आणतो.या दरम्यानची कलाकारी सादर करण्याची सर्वस्वी जबाबदारी ज्याची-त्याची. आपल्या सादरीकरणाने समाजरूपी प्रेक्षकांची वाहवा मिळवायची की तिरस्कार हा आपला प्रश्न..अंक सुरू आहे तोपर्यंतच दाद मिळायला हवी...पडदा झाकल्यावर समजून त्याचा उपयोग काय??..---सुनिल अस्वले(सुवर्णविलास)