गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

अल्पसंख्याक शिष्यवृत्तीकरीता शाळा रजिस्ट्रेशन कसे करावे?

अल्पसंख्याक शिष्यवृत्तीकरीता शाळा रजिस्ट्रेशन कसे करावे?

* सर्वप्रथम  क्रोम ब्राउझर मधून https://scholarships.gov.in ही वेबसाईट ओपन करा.
*यानंतर स्क्रीनवर ओपन होणाऱ्या विंडोमधील Institute Login या टॅबवर क्लिक करा.

* यानंतर येणाऱ्या लॉगिन विंडो मध्ये Academic year(2019-2020) , User id(udise no), Password (guest123#), कॅपचा कोड भरा व लॉगिन करा.

* यापुढे येणाऱ्या विंडो मधील ok बटनावर क्लिक करा.

* यानंतर येणाऱ्या फॉर्म मधील सर्व आवश्यक माहीती काळजीपूर्वक भरा. व फॉर्म सबमिट करा. भरलेल्या फॉर्मची प्रिंट काढून त्याची 1 प्रत जिल्हा नोडल आधिकारी यांचेकडे जमा करावी व नवीन पासवर्ड घ्यावा.

-■सदर माहिती मी माझ्या समजुतीप्रमाणे केली आहे.
---श्री.सुनिल अस्वले,पदवीधर अध्यापक. Whatsapp no.9049211785 (only whatsapp.)

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

5 वी /8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2020

5 वी / 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2020

शाळा रजिस्ट्रेशन करताना पुढील काळजी घ्या.

1) शाळेचा udise no. अचूक भरा.
2) शाळेचे माध्यम मराठी/इंग्रजी यापैकी जे असेल ते अचूक निवडा. इथे जे माध्यम निवडाल त्याच माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल.
3) शाळेत शिकविण्यात येणार अभ्यासक्रम अचूक निवडा.
4) शाळेचा प्रकार शहरी किंवा ग्रामीण जो असेल तो भरा.
5) शाळेचे व्यवस्थापन अचूक निवडा.
6) मुख्याध्यापक मोबाईल क्रमांक/ शाळेचा इ मेल आय डी अचूक व सुरू असणारे भरा.सदर मोबाईल क्रमांकावर व मेल आय डी वर लॉगिन पासवर्ड प्राप्त होतो. पुढील सर्व कार्यवाहीसाठी तो अत्यावश्यक असतो.सदर  पासवर्ड विसरणार नाही असे नोंद करून ठेवा. (विद्यार्थी प्रवेशपत्र मिळेपर्यंत)
7) मुख्याध्यापक फोटो व सही यांचा फोटो 100kb साईज पर्यंतच तयार ठेवा. मोबाईल कॅमेऱ्यात याचा फोटो काढताना तो लांबून काढा व नंतर क्रॉप करा. साईज कमी होते.
8) भरलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करूनच रजिस्ट्रेशन फॉर्म conform करा.
9) जरी काही त्रुटी राहिली तरी 15 नोव्हेंबर पर्यंत बदल करू शकता. त्यानंतर कोणताही बदल करता येत नाही. शक्यतो सर्व माहिती अचूकच भरा.

कोणतीही त्रुटी निर्माण झाल्यास पॅनिक होऊ नका.काही समस्या आल्यास व्हाट्सअप्प ग्रुपवर मांडा.ज्यांना माहीती असते ते ती सोडवण्यास मार्गदर्शन करतात.

मार्गदर्शनासाठी माझ्या 9049211785 या व्हाट्सअप्प क्रमांकावर आपल्या समस्या मांडा. समस्या तत्काल सोडवण्यासाठी नक्की प्रयत्नशील असेन.

फक्त माहितीकरिता सविनय.

----सुनिल अस्वले,पद.अध्या.केंद्र शाळा दळवेवाडी, ता.पन्हाळा.

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

प्लास्टिक बंदीचे करू स्वागत..

प्लास्टिक कचरा रोखायचा कसा? या विषयावर मी मांडलेले माझे विचार महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले..या विचारास आपण सर्व गुरुवर्यांनी मनापासून दाद दिलीत त्याबद्दल सर्वांचे *मनस्वी धन्यवाद!* प्लास्टिक मुक्ती संदर्भात गेल्या 4 वर्षापासूनच मी आमच्या गावातील आम्ही स्थापन केलेल्या शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व जोपासण्याचा प्रयास करत आहे. या माध्यमातून आम्ही व मी स्वतः आजपर्यंत गावात व विविध ठिकाणी जवळपास 1000 हुन अधिक कापडी पिशव्यांचे वाटप केले आहे. *समाज सहभागातून शिक्षण व समाजसेवा* हे ब्रीद घेऊन आम्ही शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात खारीचा वाटा म्हणून सेवेचे कार्य करत आहोत. आपण आपल्या भावी पिढीच्या भविष्याचा विचार करून एकमेव जीवसृष्टी असणाऱ्या या पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या सर्वच घटकांवर मात करण्याचा प्रयास करूयात. प्लास्टिकबंदीचे मनापासून स्वागत करून पर्यावरणास घातक गोष्टी टाळूया..सुरुवात स्वतःपासून करू. 🙏 --✍ सुनिल अस्वले.(सुवर्णविलास) ,पदवीधर अध्यापक-केंद्र शाळा दळवेवाडी, ता.पन्हाळा.