स्टाफ पोर्टल मध्ये तारखा तपासून पाहणे .
सर्वप्रथम http://edustaff.maharashtra.gov.in/Education/users/login ही लिंक ओपन करा.
आता येणाऱ्या लॉगिन विंडोमध्ये Login As -Headmaster
User ID ---तुमच्या शाळेचा U dise no.
Password --शाळेचा जो असेल तो.
Capcha code -- जो दिसतो तो तसाच भरा.
आता लॉगिन बटनावर क्लिक करा.
यापुढे ओपन होणाऱ्या page मधील सर्वात पहिल्या Tab वर क्लिक करा.. व यातील पॉप डाऊन ऑप्शनमधील teaching details वर क्लिक करा.
यापुढे ओपन होणाऱ्या विंडो मध्ये select teacher हा पर्याय दिसेल व त्यापुढे submit बटन दिसेल.
सर्वप्रथम select teacher वर क्लिक करा.इथे तुमच्या शाळेत attach असणाऱ्या सर्व शिक्षकांची नावे दिसतील. यातून तुमचे नाव निवडा व त्यापुढील submit बटनावर क्लिक करा.
यानंतर उजव्या बाजूस दिसणाऱ्या उभ्या कॉलम मधील सर्वात पहिल्या पर्यायावर (Personal details) क्लिक करा. व यातील बेसिक व पोस्टिंग या पर्यायावर क्लिक करा.
या नंतर स्क्रीनवर processing सुरू होईल व त्यानंतर cluster head द्वारा डेटा already verify झालेला मेसेज दिसेल त्यास ok करा.
इथे आपणांस तुमच्या सर्व तारखा (नोकरी सुरू, सध्याचे व्यवस्थापन (current मॅनेजमेंट) ,जिल्हा परिषद दि.तालुका दि.शाळा हजर दि. दिसून येईल.
---✍ सुनील अस्वले. पद.अध्या.वि.मं. पोहाळे/आळते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा