मुलगी झाली हो!
मुलगी झाली पेढे घ्या!काय,अवाक झालात ना! मुलीचा जन्म आणि पेढे वाटणे हे समीकरण जरा विचित्र वाटतय ना? आहो! मुलीच्या जन्माबद्दलचे आपले परंपरावादी विचार हे सहज स्वीकारण्यास तयार होत नाहीत ना? पण आज मला मात्र हा सुखद अनुभव प्रत्यक्ष अनुभवण्यास आला.या सुखद बदलाचा 'याची देही,याची डोळा' अनुभव घेता येण हे मी माझं परमभाग्य समजतो.त्याचे झाले असे मी नेहमीप्रमाणे गावातील एका दुग्धजन्य पदार्थ विकणा-या दुकानात दुध घेण्यासाठी गेलो.दुध खरेदी करत असतानाच दुकानदार मुलीने माझ्या हातावर पेढा दिला नि म्हणाली,'दादाला मुलगी झाली!' क्षणभर मीही आवाक होऊन तिच्याकडे पाहीले पण पुन्हा या गोष्टीचे मला मनोमन कौतुक वाटले.तो पेढा आनंदाने खात मी त्या मुलीला,'तुझ्या दादाला अभिनन्दन सांग म्हणालो.हो सांगते असे म्हणून ती मुलगी पुन्हा दुस-या ग्राहकाला वस्तु देऊ लागली.त्याचवेळी ती सर्व ग्राहकांना पेढा देऊन आपल्या भावाच्या मुलीच्या जन्माचे स्वागत हर्षभराने करत होती हे तिचा प्रफुल्लित चेहरा सांगत होता.तो आनंद पाहून व मुलीच्या जन्माचे स्वागत अशा प्रकारे केल्याचे पाहून मलाही मनस्वी समाधान नि आनंद वाटला.
अलीकडील काळात मुलीच्या जन्माचे स्वागत काही ठिकाणी काही प्रमाणात हर्षभराने होते आहे.पण यांतील काही च्या ऐवजी सर्वच ठिकाणी असे होणे गरजेचे नि काळाची गरज बनली आहे.यांत ज्या गतीने बदल होणे गरजेचे आहे तसा अद्याप झालेला नाही ही खंत मनाला लागून राहते.मध्यंतरी माझ्या ओळखीच्या एक सद्गृहस्थांनी त्यांच्या घरी पहिली मुलगी जन्माला आल्या प्रीत्यर्थ आनंदोत्सव साजरा केला.पहिली बेटी ,धनाची पेटी आशा आशयाची पत्रके वाटत सोबत जिलेबीही पाठविली.या गोष्टीचे अत्याधिक कौतुक वाटून मी या पत्रकास जिलेबीच्या फोटोसहित सोशल मीडियावर प्रसिद्धि दिली.माझ्या अनेक मित्रांनी याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या पण मुलगी म्हणून जिलेबी देणे ही मानसिकताही येथे अधोरेखित झाली.
पण तरीही घरी मुलगी झाली ही वार्ता इतक्या हर्षभराने कोणी समाजात सांगते का?हा प्रश्न प्रश्नच राहतो.मुलगा झाल्यावर घराच्या दारात फटाक्यांची आतिषबाजी होते पण मुलगीचा जन्म हा बहुतेक कुटूंबांसाठी एक चिंतेचा विषय बनून राहतो.खुद्द त्या निरागस जीवाला जन्म देणारी माता स्वतः एक स्त्री असुनही मुलगी झाली या वार्तेने व्याकुळ झालेली अनेक उदाहरणे आपण पाहतो.हे मला अनेकदा विचित्र वाटते.याअनुषंगाने मी माझ्या घरी स्त्रीवर्गाशी चर्चा केली तर त्यांच्या तोंडून मला एकच गोष्ट ऐकायला मिळाली नि ती म्हणजे, बाईच्या जातीला काय काय सोसावं लागतं ते आम्हांलाच माहिती.तेच सोसणं तिच्या वाटेला येणार या विचारानं तिचा जन्म नको.त्यांच्या या सांगण्यानं या समाजान आतापर्यंत नि आजही स्त्रीयांच्यावर केलेल्या नि करीत असलेल्या अन्यायाची,अत्याचाराची शृंखलाच डोळ्यासमोर उभी राहते.पूर्वीपासूनच मनुवादी विचारसरणीने प्रभावित झालेल्या पुरुषी मानसिकतेने स्त्रियांचे कार्यक्षेत्र चुल नि मुल इथंपर्यंतच मर्यादित ठेवले.अनेक रुढीवादी परंपरांनी या समाजाने तिला जखडले.हुंडाबळी,सतीप्रथा,केशवपन यांसारख्या अनिष्ट चालीरितींनी स्त्रीयांची भयावह अवस्था या समाजाने केली होती.स्त्री ही देवाने निर्मिलेली केवळ एक उपभोगाची वस्तु याच नजरेने तिला पाहिले गेले नि आजही काही विकृत नजरा याच भावनेने स्त्रीकडे पाहतात.स्त्रियांवर होणा-या अत्याचाराविरूद्ध लढा देऊन अनेक समाजसुधारकांनी स्त्री उन्नतीचे कार्य केले नि यांमुळे आजची स्त्री अबला न राहता सबला नक्कीच बनली आहे.पण अजुनही समाजातील काही विकृत घटक तिच्यावर अत्याचार करत आहेत.स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही म्हणावा तितका समन्यायी झाल्याचे दिसून येत नाही.स्त्रियांच्या सक्षमतेवर शंका घेतली जाते यांमुळेच आरक्षण असुनही कारभारी निराळाच आहे.आज सर्वच क्षेत्रांत स्त्रिया पुरुषांबरोबरीने पूर्ण सक्षमतेने कार्यरत असल्या तरी पुरषी मानसिकता हे स्विकारत असल्याचे अजुनही दिसून येत नाही.कामाच्या ठिकाणी स्त्रियांना जाणीवपूर्वक मानसिक त्रास देणे,विनयभंग करणे,डावलले जाणे इ. अनेक घटनांमधून स्त्रियांकडे पाहण्याचा यांचा निम्न दृष्टिकोन प्रकर्षाने जाणवतो.
इतके असुनही आजची स्त्री ही परुषांबरोबरीने किंबहुना पुरुषांपेक्षा अधिक सक्षमतेने कौटूंबिक नि करियर या दोन्ही स्तरावर कार्य करताना दिसून येते.अंतराळवीर,एवरेस्टवीर ,फायटर पायलट,अनेक शिखर संस्थांचे अध्यक्ष,राष्ट्रपती,पंतप्रधान ,अनेक क्रीडाक्षेत्रे इ.या सर्वच ठिकाणी स्त्रियांनी आपल्या कार्यकर्तुत्वाचा ठसा उमठवाला आहे उमठवीत आहेत.येणारे भविष्य हे स्त्री-पुरुष बरोबरीचे असेल पण हे भविष्याचे स्वप्न सत्यात येण्यासाठी स्त्रीजन्माचे स्वागत हे असेच हर्षभराने होणे गरजेचे आहे.त्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात,प्रत्यक्षात प्रबोधन होणे गरजेचे आहे.'बेटी बचाओ,बेटी पढाओ' अभियान विशेषत्वाने समाजातील उच्चभ्रू सुशिक्षित वर्गापासून तळागाळातील अशिक्षित वर्गांपर्यंत खरेखुरे पोहचले पाहीजे.
हा विचार उतरवत असताना दाराची बेल वाजली.कोण आले आहे हे पाहण्यासाठी मी दार उघडले.दारात उभ्या असलेल्या मनुष्याने माझ्या हाती पेढे दिले नि म्हणाला,.................यांच्या घरी मुलगा झाला आहे.मी मनात हसतंच माझ्या खोलीत गेलो.लगभग एका तासांत अनुभवलेल्या या प्रसंगांचे चिंतन मी केले पण काही प्रश्न शेवटी अनुत्तरितच............!
--------सुवर्णविलास (सुनील अस्वले)

खुप सुंदर सरजी
उत्तर द्याहटवा