मुलांना परीक्षार्थी बनवू नका ,ज्ञानार्थी बनवा. केवळ विविध परिक्षेतील यश म्हणजे जीवनाचे यश नव्हे. लायक जीवन जगण्यास व्यवहारज्ञान ,योग्य निर्णयक्षमता असली पाहिजे.जी लादलेल्या गोष्टीने येत नाही.आपल्या क्षणिक कौतुकासाठी,प्रतिष्ठेसाठी मुलांना जीवघेण्या परीक्षांच्या दावणीला बांधू नका.दावणीला बांधलेले जनावर कितीही धष्टपुष्ट असले व मालकाचे कितीही कौतुक झाले तरी मुक्त नि स्वच्छंदी जनावराची सर त्याला येत नाही. त्याच्या सुखाची अनुभुती त्याला नसते. असेच आपले नि आपल्या मुलाची गत असते.ती होऊ देऊ नका. --✍Sunil Aswale.(मुलांच्या करियर संदर्भातील माझे विचार)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा