गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१८

आम्ही बच्चन वेडे

*बच्चन वेडे कोल्हापुरी - एक आनंदानुभव*

बच्चन वेडे कोल्हापुरी ग्रुप मार्फत आज शालेय मुलांच्या महानायक अमिताभ बच्चन यांचे व्यक्तीचित्र रेखाटन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. बच्चन वेडे असलेल्या या ग्रुप मधील प्रत्येक सदस्यांची अमिताभ बच्चन यांच्या बद्दल असणारी आत्मीयता  क्षणोक्षणी जाणवत होती. उद्घाटन कार्यक्रमापासून अमिताभ बच्चन यांच्या डायलॉग चे सादरीकरण गाण्यावर थिरकत  बच्चन यांचेबद्दलचे उत्कट प्रेम ही मंडळी व्यक्त करताना दिसत होती. अमिताभ बच्चन यांचेवर चित्रित खयके पान बनारसवाला,मच गया शोर ... यासारख्या गाण्यांवर पद,वय विसरून दूरस्थ राहून बच्चनजींबद्दल प्रेम व्यक्त करणारी ही मंडळी पाहून जीवनात आंनदाचे क्षण कसे येत असतात व ते कसे उपभोगायचे असतात याची ही एक अनुभूतीच ठरली. *नित्याच्या जगण्याच्या धावण्यातून उसंत घेऊन स्वतःसाठी काही वेळ देऊन मुळातच आयुष्यात असलेले पण जगण्याच्या खोट्या संकल्पनेत स्वतःला गुरफुटून आंनदाचे क्षण विसरत चाललेले व नित्य नूतन तणावात अमूल्य जीवन व्यर्थ घालवणारे आपण असे क्षण एन्जॉय करू शकलो तर खऱ्या अर्थाने जगलो म्हणता येईल.*
शेवटी  मी या ग्रुप सदस्यांबद्दल इतकेच म्हणेन
बच्चन वेडे कोल्हापुरी तुम्ही
जीवनाचे सच्चे महानायक तुम्ही
वेड पाहून तुमचे
करतो मी सलाम तुम्हांस नि महानायक अमिताभास...

© सुनील अस्वले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा