*दोन प्रसंग*
आज कोल्हापूर भटकंती करताना भेटलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी माझ्याशी शेअर केलेले विचार
*पहिला प्रसंग* -- नाश्ता करीत असताना शेजारी खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीने आज शिवजयंतीची शासकीय सुट्टी आहे का विचारले .मी त्यांना नाही म्हणालो..त्याच व्यक्तीने पुन्हा 19 फेब्रुवारी रोजी असते ना? विचारले...मी हो म्हणालो. यावर त्या व्यक्तीने मग एकच शिवजयंती करायची ना... असे मत व्यक्त केले..मी त्याला आताची परंपरेनुसार असल्याचे सांगितले पण तरीही ती व्यक्ती एकदाच करावी या त्याच्या मतावर ठाम होती. काहीच वेळात ती व्यक्ती परदेशातील जीवनशैलीबद्दल सांगू लागली..तेथील लोकांचे प्रश्न आपल्या इथे असतात जसे की,रस्ते,वीज,पाणी असे काही नसतातच मुळी ...दोन वर्षे पाऊस जरी झाला नाही तरी त्यांचे नियोजन तयार असते..हे ती व्यक्ती मला पटवून देत होती.... मी खुणेनेच इथे भ्रष्टाचाराला प्राधान्य देत असल्याचे सांगितले. यावर ...खाऊ देत हवं तेवढं पण लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत अशी ती व्यक्ती म्हणाली..मी हसत माझ्या मार्गी रवाना झालो.
*दुसरा प्रसंग*-- रिक्षातून गावाकडे परतत असताना..एक व्यक्ती मोबाईल वरून आपण कोठे आलो आहोत याची माहिती सांगत होती..यावर दुसऱ्या एका व्यक्तीने मोबाईलचा किती उपयोग होतो.. मोबाईल आहे म्हणून बरे आहे असे म्हटले..पण जी व्यक्ती मोबाईलवरून बोलत होती तीने जे सांगितले ते ऐकून अडाणी माणसे खरेच शहाणी असतात हे अधोरेखीत झाले.. मोबाईल चांगलाच आहे पण फक्त 20 % नाहीतर 80% नुकसानच करतोय..वापर कसा करतो यावर हे सगळं ठरतं.. नाहीतर आजची तरुण पिढी चे नुकसानच होत असल्याचे मत त्या व्यक्तीने मांडले.
(या दोन्ही प्रसंगातून मला जे शिकता येईल ते मी शिकलो...आपणांस जे वाटते अन उपयुक्त ठरते ते आपण ठरवावे)
✍ © सुवर्णविलास
दि.06/05/2019
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा