सर्वच शिक्षकांनी ट्रान्सफर पोर्टल मधून स्वतःचे प्रोफाइल अपडेट कसे तयार करावे.व teacher login करिता स्वतःचा पासवर्ड कसा करावा? Teacher login मध्ये Use Id काय वापरायचा?
--/////------//////------//////--
शासनाच्या नवीन सूचनेनुसार याआधी स्टाफ पोर्टल मध्ये असणारी शिक्षकांची माहिती ट्रान्सफर पोर्टल मध्ये घेण्यात आली आहे. यापूर्वी स्टाफ पोर्टल मध्ये असणाऱ्या सर्व सुविधा आता बंद करण्यात आल्या आहेत. आता आपल्या माहितीतील कोणत्याही तारखेत बदल करण्याकरिता रिक्वेस्ट पाठवणे,जुन्या शाळेतून detach होणे व नवीन शाळेत attach होणे इ.सर्व सुविधा *ट्रान्सफर पोर्टल अंतर्गत टीचर लॉगिन* मध्ये देणेत आलेल्या आहेत.
या नव्याने बदल झालेल्या सर्व सुविधांचा लाभ घेण्याकरिता प्रत्येक शिक्षकाने त्यांचे स्वतःचे लॉगिन तयार करणे अनिवार्य आहे. व याअंतर्गत आपला स्वतःचा User ID (यापूर्वीचा Staff ID) वापरून स्वतःचा स्वतंत्र पासवर्ड तयार करायचा आहे. सदर तयार केलेला पासवर्ड पुढील प्रत्येक कारणासाठी कायमस्वरूपी लक्षात ठेवावा.
आता आपण Transfer Portal मध्ये स्वतःचे लॉगिन कसे तयार करावे हे पाहू.
------------------------------------
➡ सर्व प्रथम गुगल क्रोम अथवा मोझिला फायर फॉक्स या ब्राउझरमधून edustaff.maharashtra.gov.in ही वेबसाईट ओपन करा.आता यातील Transfer टॅब वर क्लिक करा.
➡ आता स्क्रीनवर ट्रान्सफर पोर्टलची लॉगिन विंडो दिसते. इथे 1) Select Roll मध्ये Teacher हा पर्याय निवडावा.2) User ID मध्ये आपला स्वतःचा यापूर्वीचा Staff ID भरावा.(सदर स्टाफ आय डी बदली अर्जात/ बदली आदेशात आपल्या नावाच्या खाली आहे.) 3) Password च्या ठिकाणी प्रथम लॉगिन करताना Guest123!@# हा पासवर्ड भरावा.
4) Captcha code दर्शवल्या प्रमाणे अचूक भरावा व लॉगिन बटनावर क्लिक करावे.
➡ आता तुम्हांला स्क्रीनवर change password ची सूचना येईल त्यास Ok करावे.
➡ यानंतर स्क्रीनवर Mobile no. व त्यापुढे generate otp अशा दोन टॅब व त्याखाली New Password व Confirm Password अशा टॅब दिसतील.यातील मोबाईल नंबर च्या जागी तुम्ही कायमस्वरूपी वापरत असलेला मोबाईल क्रमांक काळजीपूर्वक अचूक नोंदवावा कारण याच क्रमांकावर तुम्हांला तुमचा स्वतःचा नवीन पासवर्ड तयार करण्यासाठी आवश्यक असणारा Otp येणार आहे.
मोबाईल क्रमांक अचूक नोंदवल्यानंतर त्यासमोरील Generate Otp वर क्लिक करा. यानंतर स्क्रीनवर तुम्हांला तुमच्या नोंदवलेल्या मोबाईल क्रमांक otp पाठविल्याचा संदेश येईल त्यास ok करा.
तुमच्या नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर MAHEDU कडून otp चा msg (चार अंकी क्रमांक) आला असेल तो otp च्या जागी अचूकपणे नोंदवा. आता तुम्हांला कायमस्वरूपी लक्षात राहील व जो फक्त तुम्हांलाच माहीत असेल असा पासवर्ड New password च्या ठिकाणी नोंदवा व तोच पुन्हा confirm password च्या ठिकाणी नोंदवून Save टॅब वर क्लिक करा.
➡ आता तुमचे स्वतःचे My profile हे पेज ओपन होईल. इथे My profile- Application - Request -Utility अशा Tab दिसून येतील व त्याखाली आपले स्वतःचे नाव, आपली पूर्वीची शाळा(ज्यांनी अद्याप change school request पाठवलेली नाही त्यांची) अथवा सध्याची शाळा दिसून येईल.
➡ वरील My profile टॅब मध्ये General Details या sub-tab वर क्लिक केले असता यापूर्वी असणारी माहिती व काही नवीन माहिती भरण्यासाठीची विंडो ओपन होते तिथे आवश्यक ती सर्व माहिती अचूक नोंदवून Save करा व खात्री करून Forward करा.
➡ बदलीने नवीन शाळेत हजर झाला असल्यास Request मधील school change request या पर्यायावर क्लिक करा. आता स्क्रीनवर Transfer type हा पर्याय दिसतो त्यातील योग्य पर्याय( जिल्ह्यातच असल्यास Inra- district व जिल्ह्याबाहेरून असल्यास inter -district) निवडा.
आता स्क्रीनवर डाव्या बाजूस तुमच्या यापूर्वीच्या शाळेची माहिती दिसेल व उजव्या बाजूस तुम्ही सध्या कार्यरत असलेल्या शाळेची माहिती अचूक नोंदवायची आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातच बदली असल्यास District- Block- cluster - school या बाबी अचूक निवडा. व खात्री करून Submit बटनावर क्लिक करा.
तुमची Change school request ही पुढील कार्यवाहीसाठी EO लॉगिन ला गेलेली असते.
➡ Eo लॉगिन स्तरावर कार्यरत व्यक्तीला आवश्यक पुराव्यानिशी समक्ष भेटून सदर शाळा बदलण्याची रिक्वेस्ट अथवा इतर माहिती बदलण्याकरिता पाठवलेली रिक्वेस्ट verify करून घ्यावी. तेव्हाच तुमचे कार्य पूर्ण झाले असे समजावे.
➡ तुमचा data वेरीफाय झाल्यानंतर नवीन शाळेत नाव दिसते का हे school login मधून तपासावे.
➡ महत्वाचे - ज्यांची बदली होऊन शाळा बदलली नसेल त्याही सर्व शिक्षकांनी वरील प्रक्रियेनुसार स्वतःच्या Teacher Login करिता पासवर्ड तयार करावा. व general details update(Save - Forward) करावे.
टीप - सदर सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत समजूतीनुसार कामाच्या सुलभतेकरिता देण्यात आली आहे. याप्रमाणे प्रत्येकाने स्वतःच्या जबाबदारीवर कार्यवाही करावी.🙏
---आपला नम्र- श्री.सुनिल वि. अस्वले, पदवीधर अध्यापक केंद्रशाळा दळवेवाडी, ता.पन्हाळा.
Mast
उत्तर द्याहटवाvery nice
उत्तर द्याहटवा