शनिवार, ९ मे, २०२०

वेबिनार 09/05/20

आज दि.09/05/2020 रोजी आयोजित कोविड 19 च्या कालावधीतील केंद्रप्रमुख शैक्षणिक नेतृत्व कार्यक्रम या वेबिनार मध्ये महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त मा. विशाल सोळंकी साहेब यांनी मांडलेले प्रेरणादायी, चिंतनात्मक व अनुकरणीय विचारातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे,

*येणारी 20-25 वर्षे आव्हानात्मक*

*येणारे शैक्षणिक वर्षात सध्याच्या कोरोना संकटामुळे पालकांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते त्यामुळे शैक्षणिक फी देऊन शिकवणे जमणार नाही म्हणून जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित शाळांकडे विद्यार्थी घालणे वाढू शकते.यातून पटसंख्या वाढ होईल पण निधीची कमतरता असलेने आव्हानात्मक परिस्थितीत कार्य करावे लागेल.*

*शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करावा पण विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने दिवसभरात दोन तासापेक्षा अधिक काळ स्क्रीन डोळ्यासमोर नको*
 
*ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण असायला हवे. आई वडिलांना मदत करणे,भावंडांचा सांभाळ करणे हेही शिक्षण असू शकते*

*कोरोना परिस्थिती सुधारली नाही व येत्या जून -जुलै मध्येही शाळा उघडल्या नाहीत तर त्यादृष्टीने शैक्षणीक उपक्रम राबवावे लागणार, मात्र निधीचा पाठींबा देता येणार नाही.*

*दोन वर्षे फेस टू फेस प्रशिक्षणे होणार नाहीत.*

*पदभरती नसेल त्यामुळे आव्हाने वाढणार*

*आव्हाने वाढल्यामुळे स्वतःला सक्षम करावे लागणार.वयाचा विचार करून नकारात्मकता नको.*

*सर्व कामे टीमवर्क म्हणून करावयाची आहेत.*

*आव्हानात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि इतर गुणात्मक वाढीचे प्रयत्न केले पाहिजेत.*

*मूलभूत कौशल्ये ,अध्ययन निष्पत्ती या बाबी प्रत्येक विद्यार्थी शिकला की नाही हे पहिले पाहिजे.*

*21 व्या शतकातील कौशल्ये विद्यार्थ्यांना देणे आवश्यक*

*समाज व देशाविषयीची संवेदनशीलता हवी केवळ पुस्तकी शिक्षण नको*

*येत्या 1 - 2 महिन्यात घरबसल्या ऑनलाईन माध्यमातून चांगली कौशल्ये शिका.*

 *विद्यार्थ्यांना आपण तेच देऊ शकतो जे आपल्यात आहे.*

*शाळा किती दिवस उघडेल हे सांगता येत नाही. 150 दिवसदेखील नाही*

*दिक्षा app चा वापर 100 पट करणे आवश्यक. स्वतः च्या आवडीनुसार ऑनलाइन मटेरिअल वापर गरजेचा*

*सर्व शिक्षकांनी तंत्रज्ञान कौशल्य शिकले पाहिजे*

*PGI मध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावरून पहिल्या तीन क्रमांकात*

*आत्मपरीक्षण करून स्वतःत जे कमी आहे ते सुधारण्याचा प्रयत्न करा*

*स्वतःचे ,कुटूंबाचे आरोग्य जोपासा, कुटूंबाला वेळ द्या.*

*शिक्षणातून लायक बनतील ,नालायक बनू नयेत असे शिक्षण द्या  ही अपेक्षा एका आई-वडिलांनी व्यक्त केली.*

*विद्यार्थ्यांची सुरक्षा ही प्राधान्याची बाब. शालेय पोषण आहार सर्वांपर्यंत पोहचवा यातून अन्नसुरक्षा होईल.*

*विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक शक्य होईल तेव्हा ऑनलाइन नोंदणी करावी. शाळा सुरू झाल्यानंतर आधार कॅम्प होतील.*

*एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये*

*सध्याच्या वातावरणात आई-वडील निराश आहेत.हालाखीच्या परिस्थितीमुळे शाळा हाच मुलांचा भविष्यात आधार आहे.प्रत्येकजण शाळेत असेल याची काळजी घ्या.पटसंख्या टिकवायची नाही तर वाढवायची आहे*

*विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक,भावनिक सुरक्षितता महत्त्वाची.*

*आव्हाने मोठी असतात पण माणूस आव्हानांपेक्षा मोठा आहे*
📲  💻   📡    📞   ☎

मा.विकास गरड यांनी केलेले मार्गदर्शन पुढीलप्रमाणे-

*बालरक्षक चळवळ महत्त्वाची ठरेल. स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे.म्हणून सजग राहणे गरजेचे*

*85% पाठयपुस्तक छपाई पूर्ण ...परवानगी घेऊन वितरित केली जाणार.*

*Study from home* *करिता पालक जागृती करा. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षक पालक समिती,माता पालक समिती सदस्यांचे सहकार्य घ्या. मुख्य पालकांचा उपयोग करावा.पाल्य-पाल्य, पालक -पालक सम्पर्क करा.*

*DD सह्याद्री वाहिनीवर रोज सकाळी 10.00 वाजता गली गली सिम सिम हा शैक्षणिक कार्यक्रम*

*फोन,व्हाट्सअप्प,सर्वेक्षण करणारे शिक्षक यांच्यामार्फत पालकांशी,विद्यार्थ्यांशी सम्पर्क ठेवा.शिक्षणाविषयी आश्वासक वातावरण ठेवा.*


  एकंदरीत वरील वेबिनार मधून भविष्यातील शिक्षणाची नांदी ही बहुतांश तंत्रज्ञानावर आधारित असेल हे जाणवते. यासाठी आपण सर्वांनी स्वतःला सकारात्मक विचाराने कालसुसंगत ठेवले पाहिजे हे प्रकर्षाने समजते.

*सदर वेबिनार विना अडथळा  सलग दोन तास सुरू होते. याचा मला लाभ मिळाला*

 
---✍👆 श्री.सुनिल अस्वले,पदवीधर अध्यापक,केंद्र समन्वयक -केंद्र शाळा दळवेवाडी, ता.पन्हाळा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा