[3/31, 11:56 AM] सुवर्णविलास: *सुवर्णविचार*
एखाद्या गोष्टीचे किती अवडंबर माजवावे यालाही काही मर्यादा असाव्यात. मग ते एखाद्या विषयीचे प्रेम असो,ओढ असो अथवा जिव्हाळा... जिथे या गोष्टींचा अतिरेक होतो मग तिथे अवमानाची,अवेहलनेची सुरवात होते हे जाणत्याने वेळीच जाणावे.
✍🏻 सुवर्णविलास
*सुवर्णविचार*
तू मला खूप आवडतोस कारण तू माझ्या सर्व गोष्टी जपतोस म्हणून...हे प्रेम नसून हा व्यवहार आहे... जिथे असा स्वार्थ असतो तिथे प्रेम कधीच असत नाही.
✍🏻 सुवर्णविलास
*सुवर्णविचार*
माणसां-माणसांतील प्रेम,जिव्हाळा,आपुलकी,ओढ या सर्व गोष्टी प्रयोरिटीवर अवलंबून असतात.माणसांच्या प्रोयोरिटीज बदलल्या की याही गोष्टी बदलतात,दुर्लक्षित होतात.तिथे खरी संघर्षाला सुरुवात होते.
✍🏻 सुवर्णविलास
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा