शुक्रवार, १८ जून, २०२१

सुवर्णविचार

*सुवर्णविचार*

ज्या व्यक्तीला आपल्या सभोवती केवळ स्तुतीपाठकांची  गर्दी हवी असते त्या व्यक्तीला स्वतःतील उणिवा कधीच जाणवत नाहीत.अन यामुळे त्या व्यक्तीची कधीच उन्नती होत नाही. सभोवती स्वतःच्या स्वार्थी,मतलबी हेतूने पोकळ स्तुती करणाऱ्यांची गर्दी काही काळापुरते तुम्हांला आनंदी बनवू शकतो पण चिरकाल टिकणारा आनंद मिळवून देऊ शकत नाही. स्तुतीपाठकांच्या गर्दीत स्वतःला हरवणारी व्यक्ती आयुष्यात खऱ्या माणसांना गमावते.  क्षणिक प्रसिद्धी,स्तुती यांना हापापलेल्या माणसांना अशी खरीखुरी माणसं ओळखता येणं देखील दुरापास्तच... आणि जरी ओळखली तरी ती त्यांना नकोच असतात. स्वतःची स्तुती ,प्रसिद्धी या मोहपशात गुंतलेले असे लोक सभोवतालच्या स्वार्थी,मतलबी स्तुतीपाठकांनी आखलेल्या अधोगतीकडे जाणाऱ्या  रस्त्यावरून अंध अन बहिरे होऊन मार्गक्रमण करतात.अशा रस्त्याला परतीच्या वाटा नसतात.

✍🏻© सुवर्णविलास

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा