सोमवार, २१ मार्च, २०२२

सहज सुचलेले काही

सहज सुचलेले काही...

झेलावे आघात अगणित
खचून कधी न जावे...
वाट असली बिकट जरी   
तया तुडवत पुढे जावे ...

मनासारखे कधी न घडले
निराश कधी न व्हावे...
आयुष्यातील आव्हानांना 
हसत सामोरे जावे...

करु नये फिकीर कधी
साथ नसली जरी कुणाची....
ध्येयासाठी चालत राहावे
वाट आपण एकटाची.…

निंदा करतील सारेच
क्षणिक अपयश पाहून...
द्यावे तयांना उत्तर
यशास गवसणी घालून...

✍🏻सुवर्णविलास
www.suvarnvilas.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा