सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१९

बालगीत

नसलेल्या नाकाला
राग तो किती?
बोल ना ग बाहुले
अबोला हा किती?

गोड गुलाबी ते छान
गाल का फुगले?
नको ना ग रुसू अशी
माझे सानुले...

लुकलुकणाऱ्या चांदण्यापरी        
डोळे तुझे छान....
किती गोड दिसतेस परी
माझ्या जीवनाची तू शान...

पाणी का दाटले डोळा
सांग तरी मला ...
देईन तुला बांधून मी
चॉकलेटचा बंगला...

नको करू कट्टी-बट्टी
नको जाऊ दूर
तुझ्यासाठी जीव माझा
होतो चुर चुर...

गोड गाली हस ना जरा
माझ्या सानुल्या फुला
तुझ्यासाठी जीवाचा
करीन मी झुला..

✍ सुवर्णविलास
दि.09/02/2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा