सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१९

भ्रष्टाचार

भ्रष्टाचार इथला कधी
ना संपला,ना संपणार
असत्याचा बेलगाम वारू
असाच सुसाट धावणार

नाही कुणा तयाची चीड
नाही कुणा तयाची खंत
जे ते आहेत रममाण
इथे आपल्याच स्वार्थात

सर्वांचीच भावना दृढ
माझं काय जातंय इथे
अन् म्हणून उधळतो
वारू बेफाम जिथेतिथे

सत्य-असत्याच्या रणात 
झाला हतबल कृष्णही
नाही राहिला धर्म कुणी
होई ना कुणी अर्जुनही

आजही आठवते मला
कथा ती मनुष्य लोभाची 
धाव धाव धावला परी
गाठली रेषा स्व-अंताची

वारू जरी भ्रष्टाचाराचा
धावला कितीही वेगात
अंतसमयी नसेल काही
लोभी असलेल्या हातात

शर्यत सत्य असत्याची
जिंकतो तोच आयुष्यात
झूल आहे पांघरलेली
सत्याची ज्याने आयुष्यात

✍© सुवर्णविलास
दि.11/02/2019

www.suvarnvilas.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा