मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१९

प्रश्न माघार घेण्याचा...

कधीच असू नये आपण
कुणाचे तरी..हक्काचे
कधीच नसावी जागा
कुणाच्या तरी डोळ्यात
मग कधीच होणार नाही नजर
अनोळखी अन परकी..
अन मग उरणारच नाही प्रश्न
माघार घेण्याचा...

जपुच नये कुणाला तरी
मनात खोलवर
अन करू नये हवाली अस्तित्व कुणाच्या तरी
मर्जी अन मनावर
मग कधीच जाणवणार नाही
आपल्या अस्तित्वाची बेदखल..
कधीच होणार नाही
बेदखल  त्याच्या भावविश्वातून..अन मग उरणारच नाही प्रश्न
माघार घेण्याचा...

करूच नये कोणत्याच
उत्तरांची अपेक्षा ..मग नाही करून घ्यावे लागणार डं ख
छळणा-या प्रश्नांचे विनाकारण...
अन  मग उरणारच नाही प्रश्न
माघार घेण्याचा...

✍©सुवर्णविलास
www.suvarnvilas.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा