रविवार, १७ जानेवारी, २०२१

जीवन गाणे

*सहज सुचलेले काही*

*जीवनगाणे*

पहावे सहज केव्हातरी
डोकावून स्वतःच्याच मनी...
लक्ष प्रश्न येतील उफाळून
जे कधीच नव्हते ध्यानी- मनी...

करावी चर्चा मनाशीच आपल्या
द्यावा थोडा वेळ स्वतःला...
जाणवून घ्यावी व्यथा स्वतःची
साद घालावी भावनेला..

मूक रुदन मनातील
कधीतरी मुक्त करावे...
अधीर झाल्या आसवांना
कधीतरी ओघळू द्यावे...

अबोल उगा राहू नये  
 गुंता मनाचा करू नये...
साठले मनी खूपसे जे
निःसंकोच एखादा व्यक्त करावे...

म्हणेल काय दुनिया मला
व्यर्थ आहे चिंता याची...
तुझे आयुष्य अनमोल आहे
कर चिंता तू तयाची...

लाथ मारून साऱ्या चिंतेला
व्यथा साऱ्या पुरून टाक...
एकदाच आहे हा जन्म तुझा
आंनदाने तया उजळून टाक..

हेचि आहे जीवनगाणे
खुशाल तू गात राहा...
आनंदाचे जिणे हे
आंनदाने जगत राहा...

✍️ *©सुवर्णविलास*
दि.17/01/2021
www.suvarnvilas.blogspot.com
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा