ओथंबून आलो अंतरी जरी
तरी मुळीच बरसणार नाही
आसवांनो डोळ्यात माझ्या
तुम्हांला मी येऊ देणार नाही
झाले आघात कितीही
तरी ढळणार मुळीच नाही
संघर्ष येऊ दे कितीही भाळी
हरणार मी मुळीच नाही
दाटला अंधार कितीही
तरी पर्वा मुळीच करणार नाही
दिप अंतरीचा तेवत ठेवीन
आस किरणांची सोडणार नाही
येतील अन जातील वादळे
भीक तया मी घालणार नाही
रोवून पावलांना घट्ट उभारेन
तसूभर देखील हलणार नाही
पसरले शूल वाटेवरती जरी
तरी पावलांना मज रोखणार नाही
दाह झाला कितीही तरी
मार्ग आयुष्याचा मी सोडणार नाही...
✍🏻 © सुवर्णविलास
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा