काळजी घ्या - सुरक्षित राहा.
त्याला काय होतंय ही भावना सोडून द्या....
सकारात्मक विचार जरूर असावेत पण सावधगिरीही महत्त्वाची आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुले कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे...आतापर्यंत राज्यात 3 लाख मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. लहान मुलांची प्रतिकारशक्ती उत्तम असलेने त्यांच्यात लक्षण दिसून येत नाहीत. पण हीच मुले घरातील ज्येष्ठांच्या संपर्कात येऊन घरातील ज्येष्ठांना याची लागण वेगाने होते.लहान मुले कोरोनाची स्प्रेडर(वाहक) ठरत आहेत. मुले एकमेकांच्या संपर्कात येऊ नयेत म्हणून शासनाने शाळा,कोचिंग क्लासेस बंद केले आहेत.पण गावा गावात मुले एकत्र खेळताना दिसत आहेत.याने शासनाचा उद्देश तर असफल होतोच पण आई वडील म्हणून आपणही त्याकडे दुर्लक्ष करून आपल्याच मुलाची /कुटुंबाची विषाची परीक्षा पाहत आहे.त्यातच गेले दोन वर्षे शाळा बंद राहिल्याने मुलांचे शैक्षणिक दृष्टया अतोनात नुकसान झाले आहे. जे पुढे कधीच भरून येणारे नाही.बहुतेक मुलांचे गणित,इंग्रजी या विषयातील मूलभूत ज्ञान याकाळात सातत्याअभावी, सरावाअभावी नाहीसे झाले आहे. कितीही ऑनलाइन शिक्षण म्हटले तरी प्रत्यक्ष शाळेतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची बरोबरी होऊच शकत नाही. यासाठी घरातील आई- वडिलांनीच आपल्या मुलांचे भवितव्य लक्षात घेऊन दररोज मुलांना घरी अभ्यास करण्याची सवय लावावी. गणिते सोडवणे,सर्व विषयांच्या पुस्तकांचे वाचन करणे(मागील इयत्तेतील पुस्तकांचे वाचन आवश्यकच आहे..कारण त्यावरच पुढील इयत्तेचा अभ्यास असतो) या गोष्टी करून घेतल्या तरच आपले मुल भविष्यातील शिक्षणात टिकून राहील. अन्यथा येणारा काळ खूप कठीण असेल. मुलांना मोबाईल गेम पासून अलिप्त ठेवा. घरच्या घरी करता येणारे शारीरिक व्यायाम (जसे की सूर्यनमस्कार) करून घ्या. खेळातून व्यायाम घडतो,मुलांनी दिवसातून काही वेळ खेळणे आवश्यक आहे. हे जरी खरे असले तरी सध्या ही परिस्थिती नाही.त्यात मुले दिवसभर खेळत असतात..यातून केवळ थकणे होते. *सर्वांना विनंती आहे आपल्या मुलांची काळजी घ्या.आरोग्य ,शिक्षण अनमोल आहे.*🙏🏻
-- आपला हितचिंतक
- *श्री.सुनिल अस्वले.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा