रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

मनाचे सौंदर्य...

*सुवर्णविचार*
शरीराच्या सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य नेहमीच सर्वश्रेष्ठ असते. तुम्ही दिसता कसे यापेक्षा तुम्ही आहात कसे हे महत्वाचे... बाह्य सौंदर्याला परिस्थिती सापेक्ष मुखवटे लावून तुम्ही समोरच्या व्यक्तीची काही काळ फसवणूक करू शकता पण *अंतरीचे धावे स्वभावे  बाहेरी,धरीता परी आवरेना ...* या उक्तीप्रमाणे माणसाचे मन त्याच्या व्यक्तिमत्वातून केव्हातरी डोकावतेच...यातून तुम्ही कसे आहात याची जाण समोरच्याला निश्चितपणे होते...इतरांविषयी मनात प्रेम,करुणा,जिव्हाळा,प्रामाणिकपणा अन आदर हे गुण ज्याला जपता येतात त्याचे आंतरिक सौदर्य सुर्याप्रमाणे उजळत राहते.मग कटकारस्थानाचा कोणताही ढग तुमच्या या सौदर्याला बाधा आणू शकत नाही.. मनात मळभ  ठेवून तुम्ही बाहेरून स्वतःला कितीही सिद्ध करू पाहत असाल तरी ते शक्य होत नाही.. कारण तुमच्या अंतर्मनाला जाणणारा शेवटी *तो* 👆🏻आहेच... 

✍🏻 *सुवर्णविलास* 16/08/2021
www.suvarnvilas.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा