माणसाच्या आयुष्यात नियती हा फार मोठा गुरू आहे.तो कधीकधी माणसाला क्रूर वाटतो.पण तो कधीच क्रूर असत नाही. तो वेळोवेळी माणसाने केलेल्या,करत असलेल्या कर्मावर लक्ष देतो अन त्यानुसार त्याच्या जीवनाच्या वर्तमानास व भविष्यास आकार देतो.आकाशात उंच भरारी घेण्यास साहाय्य करणारा हा गुरू जमिनीचे भानही राखायला शिकवतो. जमिनीचे भान विसरून बेभानपणे अहंकाराचे पंख धारण करून अवकाशात विहार करणाऱ्यास क्षणात खाली खेचणारा हाच गुरू असतो.तो वेगवेगळ्या स्वरूपात त्याच्या अस्तित्वाची जाणीव माणसाला करून देतो.त्याची ही जाणीव आपल्या सापेक्ष नसते तेव्हा तो आपणांस क्रूर वाटतो.नम्रतेने ,'मी' पणाचा अहंकार न बाळगता,कृतज्ञतेने जो आयुष्याचे मार्गक्रमण करतो ,नियतीरुपी हा गुरू हरएक क्षणी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्याचे आयुष्य सुखकर,समाधानी,आनंदी बनवतो. या गुरूचा आदर ,त्याच्या अस्तित्वाची जाणीव मनात बाळगून माणसाने आपले आयुष्य जगणे यातच त्याचे भले असते.
✍🏻 सुवर्णविलास दि.07/07/22
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा