*'असे दांडगी इच्छा ज्याची,मार्ग तयाला मिळती सत्तर....'*
ऐतिहासिक मसाई पठाराच्या कुशीत, डोंगर कपारीत वसलेलं म्हाळुंगे तर्फ ठाणे. पायथ्यावरून एखाद्या नवख्या माणसास या डोंगरकपारीत गाव आहे, असे सांगितले तर त्याचा विश्वासच बसणार नाही. आजपर्यंत या गावात कधी एसटी बस गेली नाही.
ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पश्चिमेला विस्तीर्ण मसाई पठाराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे म्हाळुंगे तर्फ ठाणे छोटेखानी गाव. पन्हाळगडाला दिलेल्या सिद्धी जोहरच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुटका करून घेण्यासाठी जो खुश्कीचा मार्ग अवलंबला तो शिवकालीन मार्गही याच गावातून जातो. अवघ्या 60 घरांचे अन 345 लोकवस्ती असलेले एकाच गल्लीचे छोट्याश्या या गावात *दळवेवाडी केंद्रातील जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील विद्या मंदिर म्हाळुंगे/ठाणे शाळेत इ.१ ली ते ४ थी चे जवळपास 28 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुख्याध्यापक श्री.गोविंदराव बच्चे व अध्यापक श्री.तिरुपती मुसळे हे गुरुवर्य नियमितपणे शाळेत विद्यार्थ्यांसाठी नवनवीन शालेय व सहशालेय,अभ्यासपूरक उपक्रमांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत.त्यांच्या या प्रयत्नांना गावकऱ्यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभत आहे.*नुकतेच गावातील दानशूर व्यक्तींनी शाळेला संगणक,प्रोजेक्टर, फर्निचर प्रदान करून दातृत्वाचा आदर्श घालून दिला आहे.*
*याच शाळेतील तंत्रस्नेही असणारे,शासनाच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणारे ,सेवेशी प्रामाणिक,कालसुसंगत असणारे आदरणीय गुरुवर्य श्री.तिरुपती मुसळे सर यांनी आज निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत निपुण App मध्ये विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर नोंदविण्यासाठी केलेल्या अविरत प्रयत्नांना नक्कीच सलाम करावासा वाटतो. शाळेत नेटवर्क ची समस्या बारमाही आहे.पण 'असे दांडगी इच्छा ज्याची,मार्ग तयाला मिळती सत्तर....' या उक्तीनुसार विद्यार्थी गुणवत्तेसाठी धडपडणाऱ्या या गुरुजींनी शाळेपासून जवळपास 400 मीटर अंतरावर जिथे नेटवर्क उपलब्ध होते तिथे विद्यार्थ्यांना घेऊन जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन स्तर नोंदणी केली.*
*जेव्हा इच्छा ज्वलंत होते तेव्हा ती गोष्ट साध्य होतेच. आज मुसळे सरांच्या या कृतीतून हेच दिसून आले.*
*शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मा.गटशिक्षणाधिकारी श्री.संदीप यादव, मा.शा.पो.अधीक्षक श्री.शिवाजी मानकर,मा.केंद्रप्रमुख श्री.कैलास वसावे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.*
शाळेचे मुख्याध्यापक श्री.बच्चे सर व अध्यापक श्री.मुसळे सर यांच्या शैक्षणिक कार्यास अखंड हार्दिक शुभेच्छा!👌👌👍👍💐💐
शब्दांकन - श्री.सुनिल अस्वले, पदवीधर शिक्षक -केंद्रशाळा दळवेवाडी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा