मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०१७

कार्यशीलता

🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                     *सुचलेले काही.......*
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                                                            दि.24/10/2017
              
                  जीवनात कोणतेही कार्य करताना प्रामाणिकता, चिकाटी, विश्वास,आस्था नि परिश्रम या पंचसुत्रीचा अंगीकार करा.निश्चित ध्येय ठरवा नि त्या अनुषंगाने सकारात्मक विचाराने कार्यरत व्हा.प्रत्येक क्षणी यशच प्राप्त होईल असेही नसते.अपयशाकडेही सकारात्मक नजरेने पाहा. अपयशही आपणांस खूप काही शिकवून जाते.आपल्यातील उणीवांची जाणीव अपयशातूनच होते. तसेच अपयश आपणांस आपल्या माणसांची ओळख करून देते.तुम्ही कितीही प्रामाणिक प्रयत्न करूनही जेव्हा अपयश पदरी पडते तेव्हा आपल्या प्रयत्नांना जाणून घेणारी व आपणांस धीर देणारी,आपल्या पाठीशी उभी राहणारी व केवळ अपयशाची चर्चा करून आपणांस अप्रामाणिक,अविश्वसनीय असे म्हणणारी अशी दोन्ही प्रकारची माणसे आपणांस जीवनाच्या वाटेवर भेटतात. यांतील दुस-या प्रकारच्या माणसांचा क्षणिकही विचार न करणे हेच आपल्या ध्येयप्राप्तीकरीता हितावह असते.
                       कार्यातील यशाचा केवळ विचार असता कामा नये तर त्यादृष्टिने आपले अखंड प्रयासही तितकेच महत्त्वाचे आहेत.मा.विश्वास नांगरे-पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे,*"मंझिले उन्हीको मिलती हैं जिनके सपनों में जान होती हैं, युही पंख होनेसे कुछ नहीं होता,हौंसलोंसे उड़ान होती हैं|"* हेच यशाचे गमक आहे.

              *शुभदिन*
✍  *सुनील अस्वले.(सुवर्णविलास)*

sunilaswale80@gmail.com

*whatsapp* 9049211785
 
*mob* 8805835959,7219550629
                                      
                                🙂
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
           suvarnvilas.blogspot.com
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा