🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
*सुचलेले काही.......*
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
*मैत्री*
खरं खरं सांग मित्रा एकदा
का केलीस तू मैत्री माझ्याशी
जीवच घ्यायचा होता माझा
तर जीव का लावलास माझ्याशी
दिवस -रात्र तुझाच ध्यास
रमते मन तुझ्याच आठवणीत
तू मात्र सगळं विसरून
रमला आहेस तुझ्याच दुनियेत
तुझी नि माझी मैत्री
जशी कृष्ण - सुदाम्याची
नाही झाली भेट कधी
तरी भेट होते हृदयाची
अंतकरणाचं ऐकुन बघ
आठवण येईल माझी तुला
विसरलास तू जरी मला
विसरणार नाही मी तुला
✍ *सुनील अस्वले.(सुवर्णविलास)*
sunilaswale80@gmail.com
*whatsapp* 9049211785
*mob* 8805835959,7219550629
🙂
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
suvarnvilas.blogspot.com
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा