बुधवार, १० जुलै, २०१९

खेळातून संख्याज्ञान

खेळातून संख्याज्ञान
इयत्ता - 5 वी
विषय - गणित
घटक - संख्याज्ञान व इतर क्रिया.

साहित्य - 0 ते 9 अंकांच्या कागदी चिठ्या अथवा पत्ते.

कृती - विद्यार्थ्यांना वैयक्तिक अथवा गटाने 0 ते 9 अंकाच्या चिठ्या एकत्रित करून उडवण्यास सांगाव्या.आता यातील कोणत्याही सहा चिठ्या उचण्यास सांगाव्या. ज्या क्रमाने विद्यार्थी चिठ्या उचलतील त्याच क्रमाने त्यांना अंक लिहिण्यास सांगावे. उदा.पहिली चिट्ठी 5 , त्यांनंतर अनुक्रमे 4,7,0,8,3 अशा चिठ्या आल्या तर त्यापासून तयार होणारा अंक 5,47,083 असा होईल. यात एकच अंक पुन्हा यावा याकरिता उचललेली चिट्ठी पुन्हा उडवलेल्या ढिगात मिसळावी.
     यापद्धतीने अंक तयार झाल्यानंतर पुन्हा सर्व चिठ्या एकत्रित करून पहिल्या प्रमाणेच कृती करत राहावी.या पद्धतीने विद्यार्थ्यांना स्वतः  अनेक संख्या तयार करून त्याचे लेखन व वाचन करता येईल व त्यातून संख्या वाचनाचे दृढीकरण होईल.
     या कृतीतून तयार होणाऱ्या नवनवीन संख्यांची काठिण्यपातळी नुसार अंकांची संख्या निश्चित करून त्यांची  बेरीज/वजाबाकी/ गुणाकार अथवा भागाकार या क्रियाही करून घेता येतील.

सात अंकी संख्यांची ओळख,लेखन व वाचन तसेच संख्याचा लहान - मोठेपणा या  घटकाकरिता देखील या कृतीचा वापर करून खेळातून गणिती घटकांचा सराव व दृढीकरण करता येईल.

चिठ्यांच्या क्रमात सर्वात आधी 0 ची चिट्ठी आली तर ती वगळून पुढील चिठ्ठीत येणारी संख्या प्रथम घ्यावी.

चिठ्यांऐवजी पत्ते टाकूनही सदर खेळ घेऊन कृती करता येते.

✍ श्री.सुनिल अस्वले. पद.अध्या. केंद्र शाळा दळवेवाडी,ता.पन्हाळा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा