मंगळवार, ६ ऑगस्ट, २०१९

निसर्गाचा आदर करूया..

1989 साली वय वर्ष 9 असताना महापुराची ही स्थिती वडिलांच्या हाताला धरून पाहिली होती. त्यानंतर 2005 साली स्वतः जाऊन पाहिली.पण सध्याच्या इतकी भयावह अवस्था तेव्हा वाटली नाही.3 ते 4 दिवसांत पूर ओसरून जनजीवन पूर्वपदावर येत होते.सायकल वर स्वार होऊन पुराच्या पाण्यातून वाट काढीत कोल्हापूरला जाणे होत होते.पण सध्या हे शक्यच नाही. पुराचे पाणी इतके दिवस अन इतक्या उंचीवर राहत नव्हते.   याहीपेक्षा दमदार पाऊस व्हायचा. पण पाण्याचा असा फुगवटा कधी यायचा नाही.सध्याच्या अशा स्थितीला नेमके जबाबदार कोण?आपण निसर्गावर आक्रमण केले तर तो ते नक्कीच परतवून लावणारच. अजूनही वेळ गेलेली नाही.निसर्गाचा आदर करूया.विकासाच्या नावाखाली त्याच्याशी छेडछाड नको.🙏
✍ सुवर्णविलास
दि.07/08/2019
www.suvarnvilas.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा