शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९

हे मेघराजा

हे मेघराजा...

होती कोरड घशाला
अन होता घोर जीवाला
म्हणून तर हे मेघराजा
आर्त हाक मी दिली तुला..

विनविता तुला तू
आलास धावून
अन सुखावले तेव्हा
माझे  मन

जलधारांनी तुझ्या मी
अवघा तृप्त नहालो
अन खर सांगतो मनात
मी खूपदा हसलो..

आनंदाचे तोरण बांधिले
आषाढ-श्रावण मासाला
आनंदाचे उधाण आले
अवघ्या माझ्या मनाला

पण तू काहीच नाही जाणले😔

मोह तुझ्या बरसण्याचा
वाटतो उगाच मी केला
हर्ष तुझ्या आगमनाचा
उगा मनी माझ्या झाला...

उगाच केले तुझ्या
स्वागताचे सोहळे उरात
उगाच बांधले आनंदाचे
तोरण मना-मनात...

वाहून नेलीस सारी स्वप्ने
अन रोविलेस दुःख उरात
शिरलास तू घराघरात
अन पाणी साऱ्या नयनात

पण सांगतो तुला ऐक माझे

ढासळल्या जरी घराच्या भिंती
ढासळलेल्या नाहीत इथे
माणुसकीच्या भिंती

आहे लढण्याची जिद्द
अजून माझ्या हृदयात
राहीन उभा पुन्हा मी
अन करेन पुन्हा तुझे
स्वागत

अन करेन पुन्हा तुझे
स्वागत ......

✍ सुवर्णविलास दि.09/08/19
www.suvarnvilas.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा