*पावसास...*
तृषार्त मनाची हाक ऐकून
जलधारांनी चिंब भिजवित बरसलास तू या तप्त धरेवर
अन हर्ष तयाने झाला मनात
आगमनाने तुझ्या सुखावले सारे
अंकुरले हिरवे स्वप्न मनी
तृप्त झाले कडे-कपारी अन डोंगर सारे
सुखावले सारी जन अन सृष्टी मनोमनी
बघता बघता हे दिस सरले
अन स्वप्न सुखाचे विरले सारे
तुझ्या बरसण्याचा लागेना ठाव
अन वाहून जाऊ लागलेय सुख सारे
नको पाहूस अंत आता
बरसू नकोस थांब आता
विनवितो आम्ही अवघे तुला
घे विसावा थोडा आता...
✍ © सुवर्णविलास
दि.05/08/19
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा