माझ्या मना....
माझ्या मना..
नको होऊ तू अस्वस्थ
ही दुनियेची रितच आहे
करतील जे चिक्कार प्रेम तुझ्यावर
तेच करतील तुझा तिरस्कार..
तुझ्या हळवेपणाची
उडवतील मज्जा
व्यवहाराच्या या दुनियेत
तुझे अस्तित्व शून्य आहे
हे तू लक्षात ठेव...
कुणासाठी करणे विलाप
व्यर्थ आहे तुझे..
इथे क्षणाला बदलणारी
माणसे आहेत अवती-भवती..
कुणाचे बोलणे तू
लावून घेऊ नकोस
तुझ्या मनाला..
इथे शब्दांना देखील
बदलले जाते सोयीनुसार...
तुझ्या चांगुलपणाला
नाही काही किंमत आता
बघ जमले तर कणखर हो..
विंदा च्या कवितेतला *दगड* हो...
हेच बजावतो मी तुला
पुन्हा पुन्हा
माझ्या मना बन दगड...
माझ्या मना बन दगड..
✍© सुवर्णविलास.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा