*सुचलेले सहज काही*
🍁🍃🍂🍁🍃🍂🍁🍂🍃
उधळणे शब्दसुमने खोटी
जमलेच नाही मला कधी
म्हणून काहींचे माझ्याशी
जुळलेच नाही फारसे कधी...
रचावे फसव्या शब्दांचे इमले
अन करावी नाहक वाहवा
चढवून हरभऱ्याच्या झाडावर
उगा का कुणाला फसवा.…
सत्यापासून भरकटत जावे
स्तुतीपाठक उगा व्हावे
असत्याला आलिंगन देऊन
मुखी उगा का व्यर्थ वदावे...
दुरावले जरी कोणी
हरकत न घ्यावी कधी तया
वैखरीत जपतो जो सत्य सदा
समाधान जीवनी लाभते तया..
✍️ सुवर्णविलास
दि.16/01/2021
www.suvarnvilas.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा