🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
*सुचलेले काही.......*
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
दि.24/11/2017
*नातेसंबंध लेखमाला..(भाग -2)*
मानवी जीवनातील नातेसंबंध हे हाताच्या मुठीत पकडून ठेवलेल्या फुलपाखरासम असते.या फुलपाखराचे जीवन ज्याने त्याला मुठीत पकडून ठेवले आहे त्याच्या त्या फुलपाखराप्रती असणा-या निष्ठा,प्रेम,आस्था,जिव्हाळा व विचार यांवर अवलंबून असते. ज्याला नाती टिकावयची असतात तो ती मुठ अलगद ठेवतो जेणेकरून आतील फुलपाखराचा श्वास कोंडला जाऊ नये. त्या फुलपाखराच्या आनंदातच त्याचा आनंद सामावलेला असतो.आपण जोडलेल्या नात्यांबाबत हिच भावना असली तर नातेसंबंध जिवंत नि परस्परांना आनंद देणारी राहतात. याऊलट आपल्या नातेसंबंधात अविश्वास,शंका,राग,द्वेष अशी भावना असली तर मुठ घट्ट होऊन आतील फुलपाखराचे अस्तित्व नष्ट होते. कोणतीही नाती मग ती घरातील असो अथवा बाहेरची ती टिकवून ठेवता आली पाहिजेत.मुठ अलगद,हळुवार राखता आली पाहिजे.मनात कितीही राग,गैरसमज,चिड,शंका निर्माण झाली तरी मुठ घट्ट होता कामा नये.मुठीतील फुलपाखरास कोणत्याही परिस्थीतीत आपल्या जीवनाची शाश्वती असली पाहिजे.ज्याने त्याला बद्ध केले आहे त्याच्यावर त्याने बिनधास्त विश्वास ठेवावा नि तो विश्वास ज्याने त्या फुलपाखरास बद्ध केले त्यानेही जपायला हवा.तरच नातीरूपी फुलपाखरे स्वच्छंद आयुष्य जगतील. नात्यांचे फुलपाखरू जिवंत राहिले पाहिजे.यालाच आयुष्याचा आनंद म्हणतात.
*शुभदिन*
✍ *सुनील अस्वले.(सुवर्णविलास)*
sunilaswale80@gmail.com
*whatsapp* 9049211785
*mob* 8805835959,7219550629
🙂
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
suvarnvilas.blogspot.com
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा