🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
*सुचलेले काही.......*
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
दि.12/12/2017
रविवारचा दिवस.अशाच एका शालेय स्पर्धा परीक्षेकरीता मोठ्या मुलास घेऊन नियोजित वेळेत परीक्षास्थळी पोहचलो. परीक्षाकेंद्राबाहेर बरीच गर्दी होती.जितकी मुले परीक्षेस बसली होती तितकेच त्यांचे आई किंवा वडील काहींचे दोघेही असे पालकही हजर होते.परीक्षाकेंद्राच्या आवारात बैठकव्यवस्थेचा फलक लावण्यात आला होता व तिथे कोणाचा परीक्षा क्रमांक कोणत्या क्रमांकाच्या खोलीत आहे तो वर्ग कुठे आहे हे सांगण्याकरीता तेथील एक शिक्षक थांबून होते.ते प्रत्येक विद्यार्थ्यास मार्गदर्शन करत होते.त्यानुसार तो विद्यार्थी व त्याच्यासोबत असणारे पालक हे सर्वचजण परीक्षाकक्षात जात होते. इथे मी गेटवरूनच मागे फिरलो.इतक्यात माझा मुलगा परीक्षाकक्षातुन बाहेर माझ्याकडे आला.त्याच्यकडे त्याच्या इतर मित्रांचे परीक्षा क्रमांक होते ते त्या मुलांना देण्यास सांगु लागला पण त्या मुलांकडे त्यांचे क्रमांक आहेत हे मला समजले पण तरीही ती मुले त्यांच्या परीक्षाकक्षात आहेत का हे पाहत असताना मी परीक्षाकक्षात इतर पालकांचे थोडे अवलोकन केले.आपल्या पांल्याने परीक्षेस आवश्यक सर्व वस्तु सोबत घेतल्या आहेत का? त्या खरेच आहेत का? प्रश्नपत्रिका कशी सोडवायची याचे मार्गदर्शन इ.इ... हे असे सर्व तिथे सुरू होते.परीक्षेची वेळ सुरू होणार होती तरीही पालकवर्ग काही परीक्षाकक्षातून बाहेर येत नव्हता.पर्यवेक्षक पालकांना वारंवार सुचना करुनही त्याकडे या पालकांचे दुर्लक्षच होते.अखेरीस या कक्षातील पर्यवेक्षकाने या पालकांना तुम्हीच परीक्षा दया असे सुनावले तेव्हा एक एक पालक बाहेर पडू लागले.
हे सर्व पाहताना मला माझ्या परीक्षेची आठवण झाली. 10 वी व 12 वी च्या परीक्षांकरीता शहरापासून जवळपास 4 ते 5 कि.मी.अंतरावर असणा-या आसपासच्या गावांतुन आम्ही मित्रमंडळी सायकलच्या प्रवासाने परीक्षाकेंद्राचा पत्ता विचारत विचारत नियोजित वेळेपूर्वी परीक्षाकेंद्रावर पोहचत होतो.इथे स्वतः सर्व माहिती घेऊन परीक्षाकक्षात विराजमान होत होतो.घरातुन निघतानाच परीक्षेसंदर्भातील पूर्वतयारी स्वतःच करत होतो.घरातून एकमेव गोष्ट मिळायची ती म्हणजे आई-वडीलांचे,ज्येष्ठांचे नि परमेश्वराच्या फोटोंचे आशीर्वाद. याच शिदोरीच्या बळावर नि स्वतः व वर्षभर गुरुजनांच्या समृद्ध शिक्षणाने मिळालेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आमची ही परीक्षेची यात्रा निर्भयपणे नि यशस्वी पार पडत होती.आजच्या सारखी इतकी आगतिक परिस्थिती तेव्हा अजिबात नव्हती. *फुलाने कसे फुलावे,त्याने कोणता रंग धारण करावा,त्याने कसा आकार घ्यावा,त्याचा काय उपयोग व्हावा हे आपण ठरवणारे पालक आम्हांस लाभले नाहीत.ऊलट आवश्यक तितके खत-पाणी व योग्य ती जमीन उपलब्ध (चांगली शाळा,शिक्षणाचे आवश्यक साहित्य) करून देऊन आम्हाला आमच्याप्रमाणे फुलण्यास स्वातंत्र्य बहाल केलेले पालक लाभले याचा आजच्या क्षणी मला अभिमान वाटतो.*
काहीजणांच्या मते आजच्या स्पर्धात्मक युगात मुलाच्या उच्च गुणवत्तेकरीता पालकाने अशी काळजी घेणे आवश्यक ठरते.ती जरूर घेतली पाहीजे पण ती एका विशिष्ट मर्यादेपर्यंत असणे नितांत गरजेचे आहे.आपल्या अपेक्षांचे ओझे मुलावर लादणे,आपल्या अहंभावापोटी मुलास झिजवणे,आपल्या मुलाच्या सर्वच बाबींची पुर्तता आपणहुन करणे खरेच आवश्यक आहे का? आपल्या या अशा काळजीने नि अपेक्षेने मुलास आपणच मनाने पंगू बनवत जातो.यांतून योग्य स्वनिर्णयक्षमतेअभावी भविष्यात येणा-या अपयशाला हेच मुल त्याच्या अतिकाळजीने झपाटलेल्या त्याच्या पालकासच जबाबदार धरते.यातून एकतर हे मुल निराशेच्या गर्तेत जाते किंवा बंड करते.अशावेळी आपली चुक मान्य करून वेळीच आपल्या मुलास त्याच्या पद्धतीने फुलू देण्यास आपल्या वृत्तीत पालकाने बदल केला तर मुलाचे पुन्हा फुलणे होईल पण मुलाच्या अपयशाला सर्वस्वी त्यालाच जबाबदार ठरवून त्याच्याच उणीवा पालक दाखवू लागला तर मात्र हे फुल कायमचे कोमेजुन जाईल हे नक्की नि त्यास सर्वस्वी जबाबदार कोण असेल ते म्हणजे तुम्ही स्वतः पालक. म्हणून शिक्षणात मुलास स्वावलंबी राहू दया.बहुत बाबतीत त्याचे त्याला कार्य करण्याची ,काळजी घेण्याची सवय अंगी बाणवू दया.स्वयंप्रेरणा,स्वनिर्णय या गुणांची जोपासना त्याच्यामध्ये करा.आपल्या सर्वच गोष्टी आपले पालक करतात /कराव्या या भ्रामक समजूतीतुन त्याला बाहेर काढा.त्याच्या बाबतीत कोणतेही कार्य अति नसावे हे प्रत्येक पालकाने लक्षात घेतले पाहिजे. तरच ख-या अर्थाने एक सुदृढ तरुण या देशाचे भविष्य घडवण्यास निर्माण होईल.
✍ *सु.वि.अस्वले.*
sunilaswale80@gmail.com
*whatsapp* 9049211785
*mob* 8805835959,7219550629
🙂
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
suvarnvilas.blogspot.com
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा