मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

नाती नि मन

🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                     *सुचलेले काही.......*
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                                                दि.04/12/2017
                      *नाती नि मन*

मनात असुनही मनासारखं न वागता येणं याला मनाची घुसमट म्हणतात. माणसाने आपल्या स्वतःच्या मनासारखं वागलं पाहिजे.आपल्या मनात ज्या ज्या गोष्टी असतात त्या त्या वेळोवेळी पूर्ण कराव्यात. *आपल्यासोबत इतरांच्या मनाचा जरूर विचार करावा पण आपले मनही तितकेच जपावे.* आपले स्वतःचे मन आनंदी,उत्साही,निरोगी,स्वच्छंदी असेल तरच आपले दैनंदिन जीवन आनंदी,उत्साही,निरोगी,स्वच्छंदी राहील.स्वतःस योग्य वाटेल त्या सर्वच गोष्टी आपण मनापासून केल्या पाहिजेत.आपल्या इच्छा-आकांक्षा,स्वप्न यांची पुर्तता व्हावयाची असेल तर आपले मनच तयार असले पाहिजे.स्वतःच्या मनाने केलेल्या गोष्टीतच यश सामावलेले असते.मानवी जीवन हे जरी एकट्याने जगायचे नसले तरी अनेक नाती हीसुद्धा मनाचीच एक अवस्था आहे.नात्यांतील आनंद,सुख या बाबी आपल्याच मनावर अवलंबून आहेत.
कुटुंबातील अथवा बाहेरची नाती व *नात्यांतील आपुलकी,स्नेह,विश्वास या बाबी अखेरीस आपल्या स्वतःच्याच मनावर आधारलेल्या असतात.*या नात्यांकडे आपण आपल्या मनात जसा विचार आणतो तशी ही नाती ठरतात.आपल्या *जीवनातील प्रत्येक नात्यात आपण दृढ़ विश्वास,आपुलकी,स्नेह मनापासून जोपासायला हवा.*प्रत्येक नात्यांमध्ये या गोष्टी अंतर्भूत असतील तर स्वतःच्या मनाचा कोंडमारा नक्कीच होणार नाही.इथे प्रत्येक ठिकाणी आपण मनमोकळेपणाने संवाद करू शकतो.यात परस्पर संशय,राग,चिडणे,रागावणे असे अजिबात होत नाही.निर्मळ,नि:संशयी,निकोप मनाने जोपासलेले प्रत्येक नाते हे दृढ राहते.अशा नात्यांत परस्परांबद्दल आदर,स्नेह,विश्वास हा आजन्म टिकून राहतो.हेच माणसाचे आयुष्य असते जे मनाच्या अवस्थेवर अवलंबून असते.स्वतःचे मन मारून जगण्याला काहीच अर्थ नसतो.असे जगणे म्हणजे एकप्रकारे स्वतःचे आयुष्य रेटणे होय. *दुस-यांकरीता जगता-जगता प्रत्येकाने स्वतःकरीताही जगायलाच हवे.*तरच आयुष्य अर्थपूर्ण नि आनंदी ठरते.मित्रांनो, असे आयुष्य जगा की इतरांनाही आपला हेवा वाटावा.जीवनात लाभणारा प्रत्येक क्षण स्वतःच्या मनाने आनंदी राहून जगा.आपले कुटुंबीय,नातेवाईक,मित्र-मैत्रिणी यांचेशी असलेले आपले नाते निर्मळ,विश्वासाचे,निस्वार्थ,स्नेहपूर्ण मनाने जपा.कोणत्याही नात्यांत कोणत्याही कारणांनी अंतर पडू देऊ नका. *जीवनात प्रत्येक नाते अनमोल असते.* कारण आयुष्याच्या या प्रवासात आपण सोबत काहीच घेऊन जाणार नाही आहोत.ऊलट *आपण प्रत्येकजण मागे ठेऊन जाणार आहोत नि ती एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे आपली *आठवण.*  ही आपली आठवण प्रत्येकाने मनापासून काढावी अशी नाती मनापासून तयार करा नि ती अखंडपणे जोपासा.जोपर्यंत जीवन लाभले आहे तोपर्यंत प्रत्येकाशी मनमुराद बोला.एकक्षण असा येतो की सर्वजण आपल्याबद्दल बोलत राहतात पण आपण बोलू शकत नाही.किंवा याउलटही घडते.बरेच काही बोलायचे राहूनच जाते. म्हणून लाभलेला प्रत्येक क्षण सर्वांशी मिळून-मिसळुन मनापासून जगा! बघा पटतंय का!

              *शुभदिन*
✍ *सुनील अस्वले.(सुवर्णविलास)*

sunilaswale80@gmail.com

*whatsapp* 9049211785
 
*mob* 8805835959,7219550629
                                      
                                🙂
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
           suvarnvilas.blogspot.com
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा