▶मुक्त कविता
उठा मुलांनो....
उठा मुलांनो सज्ज व्हा,
नव्या जगाला,नव्या युगाला सामोरे जा,
मागे वळूनी तुम्ही न पाहा,
पुढे पुढे जातच रहा.
जरी अडखळलात वाटेवरी,
मात करुनी तयांवरी,
नव्या दमाने उभे रहा,
पुढे पुढे जातच रहा.
नसे कोणी कोणासम,
आपणच असे आपल्यासम,
उगाच का कुढावे जे नसे त्यासाठी,
अभिमाने जगावे जे आहे त्यासाठी.
ध्येय जरी असले दूर,
एक-एक पाऊल टाकत रहा,
उगाच नको घाईगडबड,
उगाच नको आक्रंदन.
माय-बाप तुमचे ते,
पाहतात स्वप्ने तुमच्या भाग्याची,
काय चुकते त्यांचे सांगा?
तुम्हीच त्यांची स्वप्ने असता!
साकारण्यास तया तुम्ही,
व्हा मुलांनो सज्ज आता,
नको दडपण,नको भिती,
आत्मघात तर नकोच नको,
आत्मविश्वास तुम्ही बाळगा,
पुढे पुढे जातच रहा.
( शिक्षण, करिअरच्या दडपण/अपयशाने आत्महत्येचा विचार करणा-या कोवळ्या मुलांना उद्देशून दैनिक लोकमत मध्ये प्रकाशित माझी कविता )
----सुनील अस्वले(सुवर्णविलास)
उठा मुलांनो....
उठा मुलांनो सज्ज व्हा,
नव्या जगाला,नव्या युगाला सामोरे जा,
मागे वळूनी तुम्ही न पाहा,
पुढे पुढे जातच रहा.
जरी अडखळलात वाटेवरी,
मात करुनी तयांवरी,
नव्या दमाने उभे रहा,
पुढे पुढे जातच रहा.
नसे कोणी कोणासम,
आपणच असे आपल्यासम,
उगाच का कुढावे जे नसे त्यासाठी,
अभिमाने जगावे जे आहे त्यासाठी.
ध्येय जरी असले दूर,
एक-एक पाऊल टाकत रहा,
उगाच नको घाईगडबड,
उगाच नको आक्रंदन.
माय-बाप तुमचे ते,
पाहतात स्वप्ने तुमच्या भाग्याची,
काय चुकते त्यांचे सांगा?
तुम्हीच त्यांची स्वप्ने असता!
साकारण्यास तया तुम्ही,
व्हा मुलांनो सज्ज आता,
नको दडपण,नको भिती,
आत्मघात तर नकोच नको,
आत्मविश्वास तुम्ही बाळगा,
पुढे पुढे जातच रहा.
( शिक्षण, करिअरच्या दडपण/अपयशाने आत्महत्येचा विचार करणा-या कोवळ्या मुलांना उद्देशून दैनिक लोकमत मध्ये प्रकाशित माझी कविता )
----सुनील अस्वले(सुवर्णविलास)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा