अवतरला श्रावण...
गर्द निळ्या या नाभाखाली,
हिरवाईची शाल पांघरली,
मोद घेऊनी आपुल्या उरी,
पहा अवतरला श्रावण धरतीवरी.
अधून-मधून पहा मेघ अवतरती,
जलाभिषेक करती धरतीला,
क्षणात अवतरती रविराजाची स्वारी,
घेवूनी हाती दोर इंद्रधनुष्याची,
पहा अवतरला श्रावण धरतीवरी.
मुक्त विहंग ते नभी फिरती,
खळाळती जलधारा धरतीवरी,
मयूर पहा तो नृत्य करी,
पाहुनी तया होई हर्ष मनी,
पहा अवतरला श्रावण धरतीवरी.
सुखद क्षण आठवी मनी,
हर्ष दाटती तव लोचनी,
पाहुनी अवघा सोहळा भरजरी,
बेभान हास्य फुलते मुखी,
पहा अवतरला श्रावण धरतीवरी.
--------सुवर्णविलास(सुनील अस्वले)
(श्रावण स्वागताला माझी स्वरचित कविता----सुवर्णविलास)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा