बळ दे माझ्या पंखात....
बळ दे माझ्या पंखात
हे ईश्वरा बळ दे माझ्या पंखात
जगण्याच्या या लढाईत
कदापि न हरण्याचे
सदैव झुंजत राहण्याचे
आत्मविश्वासाने जिंकण्याचे
बळ दे माझ्या पंखात
हे ईश्वरा बळ दे माझ्या पंखात.
करण्या मात या तमावर
भेदण्या हे दुष्काळाचे दुष्टचक्र
करण्या संघर्ष मजला हा
पुरून उरण्या तया या जगात
बळ दे माझ्या पंखात
हे ईश्वरा बळ दे माझ्या पंखात
वेदना असे जरी भयाण ही
मज नसू दे त्याची चिंता
साथ तुझी असता सदा
मज नसे भ्रांत कदा
साथ तुझी राहण्या सदा
बळ दे माझ्या पंखात
हे ईश्वरा बळ दे माझ्या पंखात
मज नसावे भय कदा
जगण्या असावी प्रीती सदा
निर्भय जगणे लाभु दे मजला
आत्मघात ना कधी घडावा
बळ दे माझ्या पंखात
हे ईश्वरा बळ दे माझ्या पंखात
गोठले जरी रक्त तयांचे
परी लढती देश रक्षणास
सांग का हरावे मी
म्हणती 'जय जवान जय किसान'
बळ दे माझ्या पंखात
हे ईश्वरा बळ दे माझ्या पंखात
----सुवर्णविलास (सुनील अस्वले)
(आत्महत्येचा विचार करणा-या माझ्या समस्त बळीराजा ला समर्पित)
बळ दे माझ्या पंखात
हे ईश्वरा बळ दे माझ्या पंखात
जगण्याच्या या लढाईत
कदापि न हरण्याचे
सदैव झुंजत राहण्याचे
आत्मविश्वासाने जिंकण्याचे
बळ दे माझ्या पंखात
हे ईश्वरा बळ दे माझ्या पंखात.
करण्या मात या तमावर
भेदण्या हे दुष्काळाचे दुष्टचक्र
करण्या संघर्ष मजला हा
पुरून उरण्या तया या जगात
बळ दे माझ्या पंखात
हे ईश्वरा बळ दे माझ्या पंखात
वेदना असे जरी भयाण ही
मज नसू दे त्याची चिंता
साथ तुझी असता सदा
मज नसे भ्रांत कदा
साथ तुझी राहण्या सदा
बळ दे माझ्या पंखात
हे ईश्वरा बळ दे माझ्या पंखात
मज नसावे भय कदा
जगण्या असावी प्रीती सदा
निर्भय जगणे लाभु दे मजला
आत्मघात ना कधी घडावा
बळ दे माझ्या पंखात
हे ईश्वरा बळ दे माझ्या पंखात
गोठले जरी रक्त तयांचे
परी लढती देश रक्षणास
सांग का हरावे मी
म्हणती 'जय जवान जय किसान'
बळ दे माझ्या पंखात
हे ईश्वरा बळ दे माझ्या पंखात
----सुवर्णविलास (सुनील अस्वले)
(आत्महत्येचा विचार करणा-या माझ्या समस्त बळीराजा ला समर्पित)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा