*जगणे माझे.....*
छंद मला लागला 'स्व' चा
या गर्दित माणसांच्या घुसमटतो मी
जाण ना राहीली आयुष्याची
नादात माझ्या एकटाच जगतो आहे मी
दिप माझ्या अंतरीचा
कधीच मालवला आहे मी
अंध:कारात या राहुन
प्रकाशासाठी चाचपडत आहे मी
बुडाखाली अंधार माझ्याच
जरी मज ठावे आहे
दाखवावयास अस्तित्व माझे
मी स्वतःस जाळतो आहे
साद माझ्या अंतरीची
कधी ऐकलीच नाही मी
'स्व' च्या कोलाहलात या
मुद्दाम बहिरा होऊन गेलो मी
आभासी या दुनियेत रमताना
आपल्याच माणसांतुन दुरावत आहे मी
जाणत असुनही सारे दुरावे
बेभान होऊन जगत आहे मी
वादळात अस्थिरतेच्या
पुरता गुरफटलो आहे मी
ऊर फुटतो आहे तरी
*जगणे माझे धाववत आहे मी.*
*------सुवर्णविलास.*
('स्व' त गुरफटुन आभासी दुनियेत रमलेल्या माणसांवरून मला सुचलेले काही.)
छंद मला लागला 'स्व' चा
या गर्दित माणसांच्या घुसमटतो मी
जाण ना राहीली आयुष्याची
नादात माझ्या एकटाच जगतो आहे मी
दिप माझ्या अंतरीचा
कधीच मालवला आहे मी
अंध:कारात या राहुन
प्रकाशासाठी चाचपडत आहे मी
बुडाखाली अंधार माझ्याच
जरी मज ठावे आहे
दाखवावयास अस्तित्व माझे
मी स्वतःस जाळतो आहे
साद माझ्या अंतरीची
कधी ऐकलीच नाही मी
'स्व' च्या कोलाहलात या
मुद्दाम बहिरा होऊन गेलो मी
आभासी या दुनियेत रमताना
आपल्याच माणसांतुन दुरावत आहे मी
जाणत असुनही सारे दुरावे
बेभान होऊन जगत आहे मी
वादळात अस्थिरतेच्या
पुरता गुरफटलो आहे मी
ऊर फुटतो आहे तरी
*जगणे माझे धाववत आहे मी.*
*------सुवर्णविलास.*
('स्व' त गुरफटुन आभासी दुनियेत रमलेल्या माणसांवरून मला सुचलेले काही.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा