*नातं*
ठरवुनही तुला टाळणं,
मला कधी जमलच नाही,
तुला पाहिल्याशिवाय,
जीव माझा कधी रमलाच नाही.
ठरवुनही आबोला तुझ्याशी,
कधी धरता आलाच नाही,
मनमुराद तुझ्याशी बोलल्याशिवाय,
मन माझं कधी भरलंच नाही.
ठरवुनही तुझ्या नयनी पाणी,
मला पाहवत नाही,
तु खळाळून हसल्याशिवाय,
मन माझं कधी फ़ुललच नाही.
ठरवुनही तुझ्यावर माया न करण,
मला कधी जमलंच नाही,
तुझ्याच मायेने मोठा कधी झालो,
मला कधी कळलंच नाही.
नातं आपलं बहीण-भावाचं,
इतकं प्रेमळ असतं,
मला कधी उमगलच नाही,
सासरी गेल्यानंतर तू,
मला मात्र आता मुळीच,
करमत नाही.....
*------ सुवर्णविलास.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा