गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०१६

बेभान पावसास.....

*बेभान पावसास*

भेट घेण्या अवनीची
आसुसलास तू वरुण
अलगद येऊन बिलगलास
ऊर अवनीचा आला भरून.

कोसळल्या जलधारा बेभान
शहारली बघ ती धरा
नखशिखांत भिजली मनमुराद
तृषार्थ जीव सुखावला सारा

कोसळल्या सरीवर सरी
जलमय झाली सृष्टि सारी
नटली -सजली वसुंधरा
दिसती जणू नववधू ती साजिरी.

आगमनाने सर्वदूर तुझ्या
चिंब झाले जनही सारे
चिंता सरली मनीची
हर्ष बहुत सर्वत्र पसरे.

हर्ष तो असाच राहु दे
चिंता पुन्हा आता लावू नको
अवनिच्या प्रीतीखातर
बेभान आता बरसू नको.

-----सुवर्णविलास (स्वरचित)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा